Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा
Showing posts with label संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ. Show all posts
Showing posts with label संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ. Show all posts

Friday, 18 February 2022

February 18, 2022

संस्कारमोती- 19 फेब्रूवारी दैनंदिन शालेय परिपाठ



सुविचार - • इतिहास घडवणारी माणसे थोर मनाची, उदात्त अंतःकरणाची व खंबीर मनगटाची असतात. ● Where there is a will there is a way (इच्छा तेथे मार्ग) 


 कथाकथन- 'राजे शिवाजी - (जन्म- वैशाख शुध्द द्वितीया शके १५४९ (१९ फेब्रुवारी १६३०) - मृत्यू - ३ एप्रिल १६८०, दुपारचे बारा): ज्यांचे ज्यांचे या भारतावर व भारतीय संस्कृतीवर प्रेम आहे, अशा व स्फूर्तिस्थान असलेल्या छत्रपती शिवरायांची आज तारखेप्रमाणे जयंती आहे. जवळ जवळ साडेतीनशे वर्षांच्या त्या काळ्याकुट्ट कालखंडात धर्मवेड्या अशा परधर्मीय राज्यकर्त्यांनी व त्यांच्या हस्तकांनी इथल्या जनतेवर केलेल्या अत्याचारांची ती भयानक चित्र मनःचक्षूसमोरून सरकू लागली की, आजही अंगावर काटा उभा राहतो. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मोगलशाही, गोव्याची पोर्तुगीजशाही आणि जंजिऱ्याची सिद्दिशाही अशा चार-पाच जुलमी राजवटीखाली एकदर जनता चिरडली-भरडली जात होती. देवळे पाडली जात होती, मूर्ती फोडल्या जात होत्या, बाटवाबाटवी शिगेला पोहोचली होती. लोकांची लुटालूट करून गावेच्या गावे बेचिराख केली जात होती आणि स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांना तर सीमाच उरली नव्हती. पण आपल्या धर्माच्या व संस्कृतीच्या बंधु-भगिनींवर असे पाशवी अत्याचार चालू असतांनाही त्या वेळचे शूर, बुद्धिमान पण स्वत्व हरवून बसलेले बरेचसे मराठे त्या शाह्यांच्या सरदारक्या स्वीकारण्यात व त्यांची राज्ये दृढमूल करण्यात भूषण मानीत होते. याला एकच ज्वलंत अपवाद निघाला तो म्हणजे शिवनेरीवर जिजामातेच्या उदरी सन १६३० शके १५४९ मध्ये जन्माला आलेला शिवबा ! या शिवबाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन, त्याच्या साक्षीने आपल्या सवंगड्यांना सांगितले. यापुढे हे अत्याचार कायमचे थांबविण्यासाठी स्वराज्य स्थापन केले पाहिजे तेव्हा स्वराज्य स्थापनेसाठी यापुढे आपण जिवाच रान केलं पाहिजे.' शिवरायांचा हा तेजस्वी संदेश ऐकून त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगात वीरश्रीचे वारे संचारले. म्हणूनच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणागड घेतला आणि त्यानंतर शत्रूचे गडामागून गड व प्रदेशामागून प्रदेश जिंकून, त्यांनी स्वराज्याचा केवढातरी विस्तार केला. या झंझावाती वीराला मारण्यासाठी पैजेचा विडा उचलून विजापूरहून आलेला अवाढव्य अफझलखान हाच त्या वीराच्या बिचव्याला बळी पडला. मोगलातर्फे पुण्यास आलेला शाहिस्तेखान एका हाताची बोटे गमावून दिल्लीस परत गेला आणि कपटी औरंगजेबाने या वीरश्रेष्ठला बोलावून घेऊन आग्य्रास नजरकैदेत ठेवले असता, हा युक्तिबाज वीर आपल्या मुलासह मिठाईच्या पेटाऱ्यांतून पसार झाला. महाराजांच्या अंगी धाडस, चातुर्य, शौर्य, मुत्सद्देगिरी, गरिबांविषयी कणव, धर्मनिष्ठा, परधर्माच्या बाबतीत सहिष्णुता, मातृ पितृभक्ती, संतांविषयी आदर, अन्यायाची चीड असे सर्वच सद्गुण त्यांच्यात होते.


दिनविशेष -

 • गोपाळ कृष्ण गोखले स्मृतिदिन - १९९५ : गोपाळ कृष्ण गोखल्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कातलक या गावी एका गरीब कुटुंबात झाला. बी.ए. झाल्यावर सरकारी नोकरी न स्वीकारता त्यांनी देशसेवेचे व्रत घेतले व फर्ग्युसन महाविद्यालयात ते प्राध्यापक झाले. सुधारक या पत्राचे ते संपादक झाले. १९०५ साली वाराणसी येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९०६ मध्ये पुणे येथे भारत सेवक समाजाची त्यांनी स्थापना केली. लोकशिक्षणाच्या मार्गाने समाजजागृती करण्याचा व राजकीय सुधारणांसाठी सतत प्रयत्न करून | मिळणाऱ्या सवलतींचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ते न्या. रानडे यांना गुरू मानत. म. गांधी, नामदार गोखले यांनाही गुरू मानत. ते जसे धोर राजकारणी व व्यासंगी वक्ते होते, तसेच ते थोर समाजसुधारकही होते. अस्पृश्यता व जातिव्यवस्था या समूळ नाहीशा व्हाव्यात यासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केले. स्त्रीस्वातंत्र्य व स्त्री शिक्षण याचा त्यांनी हिरिरीने पाठपुरावा केला. प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळावे व ते मोफत असावे हा विचार त्यांनी मांडला. सरकार व लोक या दोघांनीही प्रशंसा करावी असे गोखले यांचे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. 

मूल्ये - • शुचिता, समता, स्वाधीनता. 

अन्य घटना - • गोळवलकर गुरुजी यांचा नागपूर येथे जन्म १९०६ • आचार्य नरेंद्र देव यांचा मृत्यू - १९५६. • गणितज्ज्ञ, केशव लक्ष्मण दप्तरी यांचा मृत्यू - १९५६. • प्रसिद्ध गायक पंकज मलिक यांचे निधन-१९७३. 

उपक्रम • ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिक्षणविषयक विचार संकलित करणे व दैनंदिन परिपाठात


सामान्यज्ञान

महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले 

१. पुणे - सिंहगड, पुरंदर, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रचंडगड. 

२. रायगड - रायगड, मुरूड-जंजिरा, कर्नाळा, कुलाबा, लिंगाणा, द्रोणागिरी. 

३. कोल्हापूर - पन्हाळगड, विशाळगड, भुदरगड, गगनगड. 

४. सातारा -प्रतापगड, मकरंदगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, वसंतगड. 

५. औरंगाबाद - दौलताबाद - देवगिरी किल्ला 

६. नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, अलंग-कुलंग, मार्किडा, अंकाई-टंकाई. 

७. सिंधुदुर्ग-सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड, यशवंतगड, पद्मगड. 

८. ठाणे -वसई, अर्नाळा, भैरवगड, गोरखगड, माहुली.


Tuesday, 6 July 2021

July 06, 2021

7 जुलै- संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

       दैनंदिन शालेय परिपाठ


श्लोक
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। कोटी कोटी सूर्याचे तेज असलेल्या महाकाय आणि वक्रतुण्ड श्री गणेशा, सर्व कार्यामध्ये मला निर्विघ्न कर (कसलीही विघ्ने-संकटे बार: येऊ देऊ नकोस.)
चिंतन
जो संपन्नावस्थेत तसेच बिपन्नावस्थेत दोन्ही वेळी पूर्णपणे साथ देतो व सारखाच प्रतिकार करतो, तो मित्र समजावा आर्य चाणक्य मित्राची एक चांगली व्याख्या आपल्याला वरील वाक्यात मिळते. एखाद्या व्यक्तीच्या ऊर्जितावस्थेत, चांगल्या परिस्थितीत सगळेजण त्याच्याशी चांगले वागतात; पण परिस्थितीमुळे जर त्याला वाईट दिवस आले तर लोक त्याला सोडून जातात. अशांना कोणी मित्र म्हणत नाहीत. संकटकाळात, विपन्नावस्थेत जो मदत करतो, साथ देतो. तसेच जर चूक असेल तर तोंडावर चूक म्हणून सांगतो तोच खरा मित्र होय. 'व्यसने (संकटे) मित्रपरीक्षा, हे लक्षात ठेवले पाहिजे.

कथाकथन - वि. का. राजवाडे' : महाराष्ट्रातील विख्यात इतिहास संशोधक इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म कोकणात वरसई गावी १२ जुलै १८६४ साली झाला. बी. ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले, तरुणपणातच पत्नीचे निधन झाल्यामुळे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. ज्ञानसाधना, संशोधन करण्यात त्यांनी आपले सारे आयुष्य खर्च केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. यानंतर राजवाडे इतिहास संशोधनाकडे | वळले. पानिपतविषयक अनेक जुनी कागदपत्रे त्यांना वाई येथे सापडली. इंग्रज लेखकांनी लिहिलेली पुस्तके किंवा बखरी या वर विश्वास ठेवण्यापेक्षा अस्सल || कागदपत्रे शोधण्यास फार महत्त्व आहे, असे राजवाड्यांचे मत होते. अशा जुन्या कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी राजवाडे गावोगावी भटकत राहिले. जुन्या लोकांच्या घरी जुने ऐतिहासिक कागद असत. ते अगदी जीर्णशीर्ण झालेले, फाटलेले वाळवी लागलेले, वाचता न येणारे असत. राजवाडे यांनी अपार कष्ट करून असे हजारो कागदपत्र जमा केले. त्यासाठी त्यांना पदरमोडही करावी लागली. १८९६ ते १९२६ अशी तीस वर्षे राजवाड्यांनी महाराष्ट्राचा इतिहास व मराठी भाषा यांच्या संशोधनात व लेखनात खर्च केली. 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' नावाचे बावीस खंड प्रसिद्ध केले. प्रत्येक खंडाला राजवाड्यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. यातून त्यांचे इतिहास संशोधनाबद्दलचे प्रेम, तीव्र जिज्ञासा दिसून येते. राजवाड्यांना इंग्रजी भाषा उत्तम येत होती, पण त्यांनी आपले सर्व लेखन मराठी भाषेतच केले आहे. यावरून त्यांचा मराठी भाषेचा अभिमान दिसून येतो. राजवाड्यांनी एकनावपूर्व ज्ञानेश्वरीचा शोध लावला व ती छापून प्रसिद्ध केली. इतिहास संशोधनाला व्यवस्थित रूप यावे, यासाठी त्यांनी १९१० मध्ये पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ नावाची संस्था काढली. राजवाडे यांना भारत, महाराष्ट्र व मराठी भाषा यांचा अतिशय  अभिमान होता भारतीयांनी जुनी देवभोळी वृत्ती सोडून विज्ञानाची कास धरावी, असा त्यांचा आग्रह होता. अशा या धोर इतिहासाचार्याचे ३० डिसेंबर १९२६ रोजी धुळ्यात निधन झाले.

सुविचार
'भाव, भाषा आणि जीवन यांचा नीट मेळ म्हणजेच शिक्षण रविंद्रनाथ टागोर
• जुना इतिहास घोकण्यापेक्षा, नवा इतिहास निर्माण करणे गरजेचे आहे. सामर्थ्य हा मनुष्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे. प्रेमचंद

दिनविशेष
भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना १९१० पुणे: इतिहासाचार्य राजवाडे आणि सरदार तात्यासाहेब मेहेंदळे या दोघांनी | इतिहास संशोधनास दिशा आणि प्रेरणा मिळण्याच्या हेतूने भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. पुढच्या काळात मंडळाने चांगले बाळसे धरले. आजपर्यंतच्या काळात भारत आणि महाराष्ट्र यांच्या इतिहास आणि संस्कृतीविषयक सर्वांगीण आविष्कारासाठी सामग्री जमा करणे, तिचा अभ्यास करणे, त्याचे प्रकाशन करणे हे कार्य अखंडित निष्ठेने चालू आहे. अनेक अभ्यासू निष्ठावंतांनी तळमळीने हे काम चालू ठेवले आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी अनुदान देऊन या कार्यास हातभार लावला आहे. मंडळाचे सुसज्ज ग्रंथालय, पुरातन वस्तूंचे संग्रहालय, अभ्यासेच्यूंची स्वतंत्र सोय इत्यादी मुळे मंडळाला मोठीच कीर्ती लाभली आहे. मंडळाची आजवर प्रसिद्ध झालेली शंभराहूनही अधिक प्रकाशने अव्वल दर्जाची आहेत.
→ मूल्ये
अभ्यासूवृत्ती, चिकाटी, दृढनिश्चय
→ अन्य घटना
दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिश पार्लमेंटची निवडणूक जिंकली- १८९२
→ उपक्रम भारत इतिहास संशोधन मंडळाच्या कामाबद्दल माहिती सांगावी. तुम्हाला आवडणाऱ्या खेळाबद्दलची माहिती गोळा करा.

समूहगान
धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं....

सामान्यज्ञान
आपले प्राचीन ग्रंथ व त्यांचे लेखक • रामायण वाल्मिकी ● अष्टाध्यायी पाणिनी • पंचसिद्धांतिका वराहमिहिर अर्वाचीन काळातील प्रमुख संत • श्री दासगणू महाराज • महाभारत व्यास • ब्रह्मसूत्र शंकराचार्य • ब्रह्मस्फुटसिद्धांत ब्रह्मगुप्त ● श्री तुकडोजी महाराज • श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी श्रीचक्रधरस्वामी ● श्री गोंदवलेकर महाराज गुलाबराव महाराज ● कौटिलीय अर्थशास्त्र आर्य चाणक्य आर्यभटीय आर्यभट पहिले ● स्वामी स्वरूपानंद • संत गाडगे महाराज, • गजानन महाराज

Monday, 5 July 2021

July 05, 2021

6 जुलै- संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

 




श्लोक
मना सज्जना भक्तपंथेचि जावे तरी श्रीहरि पाविने तो सभाये ॥ जनी सर्व सोडून द्यावे जनी ते सर्व भावे करावे ।। बार हे सज्जन मना, तू भक्तीच्या मार्गाने जा. परमेश्वराची भक्ती कर त्यायोगे तुला परमेश्वराची कृपा प्राप्त हाईल. समाजात जे निंद्य (निंदा करण्यास योग्य म्हणजे वाईट असेल ते सारे सोडून दे. समाजात जे (चंदन करण्यास योग्य म्हणजे चांगले असेल त्याचे मनापासून आवरण करावे.

चिंतन
आपण जर कर्तव्यावर जोर देत गेलो तर आपले हक्क आणि अधिकार आपल्याकडे आपोआप चाहत येतात स्वामी रामानंद तीर्थ माणूस स्वतःच्या हक्कांबद्दल आणि अधिकारांबद्दल खूप जागरूक असतो; पण स्वतःच्या कर्तव्याकडे मात्र तो सोयिस्करपणे डोळे झाक करतो. पण असे करणे चुकीचे आहे. आपण आपले कर्तव्य पार पाडले की हक्क आणि अधिकार आपोआपच प्राप्त होतात. त्यांच्यासाठी भांडायची वेळ येत नाही. तेव्हा आपण कर्तव्यदक्ष बनण्याचा प्रयत्न करू या.

कथाकथन
'आंतरिक आवाज' ज्या लोकांना तुमच्याबद्दल असूया वाटते अशांना आपल्या जीवनात स्थान देऊ नका. शांतपणे पण जाणीवपूर्वक त्यांना आपल्या जीवनातून वजा करा. त्यांचे अस्तित्व विसरून जा. तुम्हाला ज्यात आनंद मिळतो, त्या पद्धतीने हवे ती उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी स्वतःच्या प्रश्नांना महत्व था. लोक कळत नकळत आपल्याला अस्वस्थ करीत आपली ऊर्जा कमी करतात अशांसाठी वेळ देऊ नका. अशा लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका किंवा परिस्थिती काय होती त्यामागचे कारण काय होते सांगण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका. तो विषय आणि विचार सोडून द्या. ज्या शब्दांनी किंवा वागण्याने आपल्या जीवाची घालमेल होते अशांना महत्व देऊ नका. त्यांच्याशिवाय सभोवती चांगले लोक आहेत. त्यांच्या सहवासात आपला वेळ खर्च करा. मनाचा मोकळेपणा कायम ठेवा. जगातील नवनवीन गोष्टी समजावून घेण्याला स्वतःच्या ज्ञानकक्षा रुंदावण्याला महत्त्व या जीवनाचा अर्थ अधिक चांगला खोलवर समजेल अशा रीतीने काही गोष्टी अंगीकारण्यास शिका. अभ्यास करा, चर्चा करा, समजावून घ्या | आणि अनुभव घ्या. यापुढे तुमची कार्यक्षमता आणि सहनशीलता परी आणि कामाच्या ठिकाणी दोन्हीकडे वाढेल. भविष्यातील जीवन अधिक समरसून निकोपपणे जगता येईल, असे बदल स्वतःमध्ये घडवा. आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे याचा शांतपणे विचार करा. पैसा, समाज, कुटुंब या पैकी सर्वात महत्त्वाचे काय आहे ते तपासा. त्याचप्रमाणे दिनक्रमामध्ये बदल करा अनेक गोष्टी राहून गेल्या हे लक्षात आल्यावर आतातरी त्या पैकी काही गोष्टी करण्यास सुरुवात करा. आपण मोठे झाल्यावर काय व्हायचे होते? आपण कोठे आहोत... ? आपली ओळख काय? आपली आवड काय? स्वतःबद्दलची खरी ओळख काय? आता आपण जसे आहोत तसे आपल्याला व्हायचे होते काय?
सुविचार
सतशील चारित्र्य व कर्तबगारी हेच खरे चिरंतन सौंदर्य'
'संधीची वाट पाहू नका; स्वतःच संधी शोधा व कामी लावा.'
• माणसाचे जीवन संमृद्ध करायला एखादाही प्रभावी विचार उपयोगी पडतो. म्हणून चांगल्या विचारांचा सतत प्रसार करीत असावे.
• तुमच्या कामावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटतो. म्हणून आपली कृती श्रेष्ठ दर्जाची, बिनचूक, परिपूर्ण, सुंदर राहील अशी करा

दिनविशेष
बाबु जगजीवन राम यांचा स्मृतीदिन १९८६ स्वतंत्रता संग्रामातील अजेय योध्दा, शोषणाच्या विरुध्द जनसंघटनेच्या प्रेरणास्त्रोत, ओजस्वी वक्ता, विरळ संसद पटु, नेतृत्व आणि प्रशासनमान्य अव्दितीय क्षमतेचे धनी जगजीवन राम जाती, संप्रदाय, धर्म तसेच क्षेत्राच्या भेदभावातून मुक्त होऊन समतेचा संदेश देत. बिहार राज्यातील भोजपुर जिल्ह्यातील चांदवा गावात त्यांचा जन्म संत शोभीराम आणि वासतीदेवीच्या पोटी ५ एप्रिल १९०८ रोजी झाला. ते बाल्यावस्थेमध्ये असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. ते प्रथम श्रेणीमध्ये मॅट्रिकची परीक्षा पास झाले. उच्च शिक्षणासाठी बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी आई.एस.सी.ची पदवी घेतली हरिजन सेवक संघाच्या माध्यमाने त्यांनी शोषितांसाठी संघर्ष केला. बिहारमधल्या भूकम्प पीडित लोकांच्या मदतीसाठी ते धावून गेले. १९३५ मध्ये भारतीय दलित वर्ग संघाची स्थापना केली आणि दलितांना राष्ट्रीय मुक्ती संग्रामात जोडले. १९३६ ला बिहार विधान परिषदेचे सदस्य बनले. दक्षिण शाहाबाद ग्रामीण विकास मंत्रालयात सांसदीय सचिव बनले. १९४६ च्या अंतरिम सरकारमध्ये ते श्रममंत्री झाले. त्यांनी सामाजिक न्यायाला महत्व दिले. श्रममंत्री असताना श्रमिकांसाठी नवीन श्रमनीती आणि कायदे तयार केलेत. १९५२ - ५६ मध्ये संचार मंत्रालयात हवाई वाहतुकीचे राष्ट्रीयकरण, इंडियन एअर लाइन्स कॉपोरेशन आणि एअर इंडियाची स्थापना आणि डाक सुविधा गावो गावी पोहचविली. १९५६-५७ मध्ये परिवहन आणि रेल्वेमंत्री असताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या १९६७-७० खाद्य आणि कृषी मंत्री बनलेत आणि भारताला अन्नाच्या दुष्काळातून बाहेर काढले आणि हरितक्रांतीचे अग्रदूत बनून देशाला आत्मनिर्भर केले. १९६९ मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष बनले आणि पार्टीला सशक्त केले. १९७०-७४ मध्ये ते संरक्षण मंत्री होते त्या काळात त्यांनी पूर्व | पाकिस्तान जिंकून बांगला देश निर्माण केला आणि राष्ट्राला गौरव मिळवून दिला. पूर्व पाकिस्तानच्या एक लाख सशस्त्र सैनिकांचे आत्मसमर्पण करवून घेऊन जगातील अभूतपूर्व घटना घडविली १९७४-७७ कृषी आणि पाटबंधारे मंत्र्याचा कार्यभार सांभाळला. जनता पार्टीच्या सरकारमध्ये उपप्रधानमंत्री बनलेत. १९३६ ते १९८६ पर्यंतचा त्यांचा सांसदिक काळ हा विश्वात किर्तीमान आहे. ते ६ जुलै १९८६ ला त्यांनी आपली जीवनयात्रा पूर्ण केली..
मूल्ये
कर्तव्यनिष्ठा, चिकाटी, साहित्यप्रेम.

अन्य घटना
• संत गुलाबराव महाराज जन्मदिन १८८१ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म १९०१ • अर्थशास्त्रज्ञ प्रा. विनायक महादेव दांडेकर यांचा जन्म १९२० • व्यंकटेश मांडगूळकर यांचा जन्मदिन १९२७ • आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांचा मृत्यू १९४४ उपक्रम व्यंकटेश माडगूळकरांच्या साहित्याची ओळख करून द्यावी • गुलाबराव महाराजांचे अभंग मिळवून सांगावेत.
समूहगान
इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके....
सामान्यज्ञान
भारतातील लोक हात जोडून नमस्कार करतात. • कांगो लोक स्वागत करताना एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालतात. • आफ्रिकन लोक स्वागत करताना कमरेत वाकतात.

Sunday, 4 July 2021

July 04, 2021

5 जुलै- संस्कारमोती, दैनंदिन शालेय परिपाठ

 





सुविचार
'जे सदैव कष्ट करतात, त्यांनाच भाग्य लाभते.
एखादे कार्य हाती घेतले तर आपण आपले अंतःकरण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे.
• जो माणूस सारखा कामात असेल, तोच नवीन कामांना सुरुवात करून ते पुरे करू शकतो..
● आळशी, दुर्बळ, गर्विष्ठ, लोकापवादाला भिणारे आणि नेहमी वाट पाहणारे दीपसूची, अशांना इष्टप्राप्ती होत नाही.

श्लोक
भुजंतो कम्म फलं कुणड्ण रायं दोसंच तो संज्यि विणासह अहिणायकम्पण बंधेई
जो जीव कर्माचे फळ भोगीत असताना सुध्दा रागही करीत नाही व देवही करीत नाही तो पूर्वसचित कर्माचा नाश करतो आणि नवीन कर्म बांधीत नाही.
चिंतन
गमावलेले धन थोडया काटकसरीने आणि परिश्रमाने मिळवू शकू विसरलेले ज्ञान पुनः अध्ययन केल्याने प्राप्त होईल गेलेले आरोग्य औषण आणि संयम यांच्या मदतीने मिठेठ, परंतु गमावलेली ही पुन्हा परत मिळविता येत नाही. जगात काळ ही गोष्ट अशी आहे की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा परतून तुमच्याकडे येत नाही. तुम्हाला ती मिळविता येत नाही हे काळाचे महत्व ओळखून माणसाने वागले पाहिजे काळाचा सदुपयोग पाहिजे. त्यासाठी नियोजन केले पाहिजे नियोजन केल्यामुळे योड्या काळातही अनेक गोष्टी करता येतात. धन, ज्ञान, आरोग्य या गोष्टी पलांनी पुन्हा मिळविता येतील. पण गेलेला काळा मात्र पुन्हा मिळविता येणार नाही.
कथाकथन
श्रमे लक्ष्मी: प्रतिष्ठिता
: सतत उद्योगी असणारा सुसंपन्न, सुशिक्षित असा एक शेतकरी होता त्याची तिन्ही मूर्ख आळशी आणि अविवेकी होती पानी केलेला उपदेश ती ऐकत नसत त्यामुळे तो नेहमी दुःखी, खिन्न आणि चिंताक्रांत असे. काही काळानंतर तो शेतकरी परण पावता वडिलोपार्जित मालमत्तेचा वाटा मिळावा या लोभाने मुलानी बडितांनी लिहून ठेवलेली यही उघडती. त्यामध्ये त्यांना हा लोक मिळाला खरोखर सावलीतूनच जावे (जाणे योग्य) त्याप्रमाणे सावलीत परत यावे. मिष्टान्नाचे सेवन करावे. तेव्हा लक्ष्मी मिळेल. तेव्हा वडिलानी उन्हात जाण्याचा निषेध केला. असे मानून त्या मुलांनी शेतात जाणे सोडून दिले. त्याचप्रमाणे साध्या जेवणाचा त्याग करून त्यांनी रोज मिष्टान्नाचे जेवण सुरू केले त्याच्या पा उपहासास्पद आवरणामुळे वडिलांनी मिळविलेले धन संपले आणि लवकरच दारिद्रय आले. त्यामुळे सर्व मुळे चिंतातूर झाली. एकदा वडिलांच्या वार्षिक श्राद्धाच्या वेळी मुलानी पुरोहिताला विचारले 'आपण आशीर्वाद दिला आहे की. लक्ष्मीवान का आमच्या वडिलांनीसुद्धा वहीत तेच लिहिले आहे; परंतु लक्ष्मी दिसतच नाही. जी होती तीसुद्धा गेली याबाबतीतचे कारण काय? कृपया आम्हाला सांगावे" पुरोहित म्हणाला. "वडिलांची वही दाखवा" मुलानी, रेशमी वस्त्रात गुंडाळलेली गंधमाला इत्यादींनी पूजिलेली ती यही पुरोहितासा समर्पित केली त्यानंतर ते जसे जसे वागले होते. ते सुद्धा सर्व त्यांनी सांगितले. वही वाचल्यानंतर पुरोहित उपहासाने म्हणाले, अरे मुलांनो, वडिलांनी तर योग्यतेच लिहिले आहे. परंतु अभिप्राय न जाणता केवळ शब्दश: अर्थ घेतल्यामुळे तुम्ही उलटच आचरण केले आहे. अशा केवळ पूजेने लक्ष्मी कशी मिळेल?" मग याचा अभिप्राय काय आहे?" असे मुलांनी आदराने विचारले पुरोहित म्हणाला 'सावलीतूनच जावे याचा अर्थ असा सूर्यादयापूर्वीच शेतात जावे तसेच येणे योग्य याचा अर्थ असा कि, 'सूर्यास्त झाल्यानंतरच परत यावे अशा प्रकारे भरपूर श्रम केल्यावर साधे अन्न सुध्दा स्वादिष्ट व गोड लागेल, असे आवरण जो करील तो धनवान होईल; यात थोडीही शंका नाही. दुसऱ्या वर्षी पुरोहिताच्या सांगण्यानुसार आपल्या बायकामुलांसह त्यांनी शेतात भरपूर श्रम केले चार महिन्यातच धान्यरूपाने लक्ष्मी आती गावकऱ्यांनी विचारल्यावर मुलांनी सांगितले. स्वतःच्या आळशीपणामुळे दारिद्रय आले, परंतु श्रमामुळे श्रीमंत झालो. खरोखरच लक्ष्मीने श्रमात निवास केला आहे.

दिनविशेष
आझाद हिंद सेनेची स्थापना १९४३ १९४२ च्या फेब्रुवारीत ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील सिंगापूरचे हिंदी सैन्य जपानला शरण गेले. या सैन्याच्या साहाय्याने हिंदुस्थानने ब्रिटिशांविरुध्द लढून स्वतंत्र व्हावे या गोष्टीस जपानने मान्यता दिली. १९४३ च्या जूनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस टोकियोला गेले. तिथे त्यांचे हिंदी आणि जपानी लोकांकडून प्रचंड स्वागत झाले. त्यांच्या संघटनकौशल्यामुळे, अलौकिक वक्तृत्वामुळे अनेक लोक सैन्यात दाखल झाले आणि नेताजींनी आझाद हिंद सेनेची ५ जुलै १९४३ ला स्थापना केली. सैनिकांचे स्वागत करताना ते म्हणाले, "ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडापासून भारताची सुटका करणारे हे सैन्य आहे. हिंदुस्तान स्वतंत्र झालेला पाहण्यासाठी आपणापैकी कोण जिवंत राहणार याला महत्व नाही. तो स्वतंत्र होणारच!" २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्ट्रप्रमुख झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदि अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली.
मूल्ये
जिद्द, चिकाटी, स्वातंत्र्यप्रेम, शौर्य,
अन्य घटना
जलसंपत्ती दिन मुंबई येथे हिंदू मिशनरी सोसायटी' या संस्थेची स्थापना १९१७ • राष्ट्रीय डाक तिकीट संग्रहालयाचे उद्घाटन १९६८ (नवी दिल्ली) • गिनिज बुकमध्ये नोंद झालेले बाबूराव अर्नाळकर यांचे निधन १९९६
उपक्रम
स्वातंत्र्य चळवळीतील सुभाषबाबूंशी संबंधित घटना गोष्टीरूपाने सांगाव्यात. • जलसंपत्तीचे महत्त्व सांगाये
समूहगान
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे....
सामान्यज्ञान
भूदलातील अधिकाऱ्यांचे हुद्दे सेकंड लेफ्टनंट लेफ्टनंट • कॅप्टन मेजर • लेफ्टनंट कर्नल • कर्नल • ब्रिगेडिअर मेजर जनरल • लेफ्टनंट जनरल जनरल

Saturday, 3 July 2021

July 03, 2021

4 जुलै- संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

           दैनंदिन शालेय परिपाठ





सुविचार
आधी कामाला प्रारंभ करा, म्हणजे तुमच्यामधीत प्रचंड शक्तीया तुम्हाला प्रत्यय येईल. ● कोणत्याही उदात्त कल्पनेने किंवा उद्दिष्ट जाणे, हेच जीवनाचे सार आहे तेच जीवनातील अत्युत्तम क्षण असतात

श्लोक
णोकम्म हि ओ केवठणाणा गुणसमिठो तो सोह सिद्धो-सुडो णिचो एक्को निरालंबो ॥
जो शरीरादि कर्म, ज्ञानवर्णादि द्रव्यकर्म व राग-द्वेषादी भाव कर्माने रहित आहे. केवल ज्ञानादि अनंत गुणांनी समृद्ध आहे. शुद्ध सिद्ध एक व निरालंब आहे तोच मी आहे. जैन तत्वातून 


चिंतन
उठा जाने का नि ध्येयपूर्तीवाचून बांबू नका स्वामी विवेकानंद माणसाने आयुष्यातून कंटाळा आळस या शब्दांना पळवून लावले पाहिजे. आणि मोठ्या उत्साहाने, आनंदाने कामाला लागले पाहिजे स्वतःपुढे काही एक निश्चित ध्येय ठेवले पाहिजे आणि मग ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अविश्रांत श्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. भारतमातेला स्वतंत्र करण्याचे ध्येय अनेक तरुणांनी आपल्यासमोर ठेवले आणि त्यासाठी प्रसंगी आत्मबलिदानही केले. माणसाच्या आयुष्यात कोणतेच ध्येय नसेल, तर त्याचे आयुष्य म्हणजे दिशाहीन भटकणे होईल. तेव्हा आपल्या मनात ध्येय निश्चित करा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

कथाकथन
'स्वामी विवेकानंद'
: पाश्चात्त्व व पौर्वात्य राष्ट्रांत भारताच्या संस्कृतीची व विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा हिंदू धर्माची फडकविणारा, आध्यात्मिक नेता म्हणून जगभर विवेकानंदांचे नाव घेतले जाते. भारतात त्यांनी आपल्या बक्तृत्वाने भारताचे भवितव्य घडविणान्या युवा | पिढीतील अनेक नेत्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या साहित्यात तेज आहे, ओज आहे. मानवजातीच्या कल्याणाची मंगल भावना आहे. १८९० मध्ये त्यांनी सर्व | भारतभर प्रवास केला. लोकांचे दैन्य पाहिले, अस्मिता गमावलेली मुकेकंगाल जनता पाहिली आणि या समाजात जागृतीची ज्योत पेटविली. १८९३ च्या जागतिक धर्मपरिषदेतील भारतीय प्रतिनिधी म्हणून केलेले भाषण, वैदिक याङ्मयातील, उपनिषदांतील तत्त्वज्ञान व विश्वाबंधुत्ववादी धर्म | यांचे सांगोपांग विवेचन करणारे भाषण सान्याच धर्मवेत्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे ठरले. विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. अत्यंत बुद्धिमान असूनही त्यांचे लहानपण गरिबीत, उपासमारीत गेले. त्यांचा जन्म १८६२ साठी कलकत्ता येथे झाला. तेथे पदवीधर झाल्यानंतर अध्यात्माचा, वैराग्याचा महासागर श्रीरामकृष्ण परमहंसांची व त्यांची भेट झाली. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला. त्यांच्या जीवनाचे सोने झाले. त्यांची आनंदसाधना सुरू झाली. ६ ऑगस्ट १८८६ रोजी आपले सारे तपस्याफल विवेकानंदांना देऊन रामकृष्ण परमहंसांनी इहलोक सोडला. विवेकानंदांनी उदारमतवादी सहिष्णुतेने भूतवादी पुस्तके लिहिली. हजारो व्याख्याने दिली. हर्बट स्पेन्सर हा त्यांचा आवडता तत्त्वज्ञ होता. कर्मयोग, राजयोग, प्रेमयोग, भक्तियोगसारखी व्यासंगपूर्ण पुस्तके लिहिली, रामकृष्ण मिशन' या संस्थेमार्फत जनसेवेचे व शिक्षणाचे काम सुरु केले. अमेरिका-इंग्ल अनेक विचारवंत त्यांच्या विचारांनी भा गेले. सिस्टर निवेदिता या त्यांच्या निष्ठावंत विदुषीने 'राष्ट्रीय हिंदुधर्म' नावांचे एक पुस्तकही लिहिले आहे. इंग्लंड, अमेरिकाच नव्हे, तर जगभर रामकृष्ण, विवेकानंदांचे शिष्य मिशनचे कार्य सेवावृत्तीने करीत आहेत. ४ जुलै १९०२ साली तत्त्वज्ञाने या जगाचा निरोप घेतला.

.
दिनविशेष
मादाम मेरी क्युरी स्मृतिदिन १९३४जन्म ७ नोवेंबर १८६७ रोजी झाला. त्या पोलंडच्या रहिवासी. पॅरिसमध्ये अनेकअपेष्टा सोसून त्यांनी उम्र शिक्षण पूर्ण केले. अध्ययन आणि संशोधन यांची त्यांना अतिशय आवड होती. त्यांचे पती पिअर क्यूरी आणि मेरी या दोघांनी प्रयोग करून रेडियमचा शोध अपनाया शोधाने अणुयुगाचा पाया घातला गेला. १९०३ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाया सन्मानविण १९११ मध्ये रसायनशास्त्रातील संशोधनाबद्दल त्यांना पुन्हा हा सन्मान मिळाला अमेरिकन जनतेने न्यूयॉर्क नगराये स्वातंत्र' हा सर्वोच्य बहुमान त्यांना अर्पण केला विज्ञानात खूप सौंदर्य आहे, असे मानणान्यांपैकी मी आहे. एखाद्या अद्भुत क्षेत्रमाणे निसर्ग आपके अंतरंग उलगडून
दाखवून स्तंभित करतो.' असे त्या म्हणत.

 
मूल्ये
संशोधनवृत्ती, ज्ञानलालसा, विश्वबंधुत्व, राष्ट्रप्रेम.
अन्य घटना-
• मराठ्यांच्या आरमारातील शूरवीर दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचे निधन - १७२९. • अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन - १७७६ • स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन १९०२ ● पृथ्वी क्षेपणास्त्र चौथी चाचणी यशस्वी झाली - १९९१ • पाथ फाइंडर हे यान मंगळावर उतरले १९९७, → उपक्रम स्वामी विवेकानंदांचे सुविचार संग्रहित करायला सांगा. • किरणोत्सारी मूलद्रव्यांची माहिती गोळा करायला सांगा. 


समूहगान
हिंद देश के निवासी, सभी जन एक हैं....

सामान्यज्ञान
• घड्याळातील ज्युवेल्स एक अतिशय कणखर, गुळगुळीत व जवळ जवळ न झिजणारा पदार्थ होय. हात लावल्यास तो काचेसारखा वाटतो. रंगाने लालसर असतो. मनगटी घड्याळात कमीत कमी १५ व जास्तीत जास्त २१ इतके ज्युवेल्स वापरले जातात. ज्युवेल्समुळे घड्याळातील फिरत्या चाकांचे घर्षण जवळ जवळ नाहीसे होते. त्यामुळे चाकांची झीज खूप कमी होते. साहजिक अशा घड्याळांची कार्यक्षमता, टिकाऊपणा अधिक वाढतो.

Friday, 2 July 2021

July 02, 2021

3 जुलै, संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

              दैनंदिन शालेय परिपाठ




सुविचार
संत महात्म्यांनी समाजपरिवर्तनाचे महान कार्य केले आहे.
• मनातील विचारांचा सुंदर आविष्कार म्हणजे काव्य.
• जो माणूस स्वतःसाठी जगतो तो लहान, जो दुसऱ्यांसाठी जगतो तो महान, वेळ ही आपल्याला मिळालेली अत्युच्च देणगी आहे.

श्लोक
तम्हा अम्मत तथा मोतूर्ण राय दोस वा मोहे। झापड णिय अप्पाण जइ इच्छह सायं सोक्ख जर शाश्वत सुखाची इच्छा नसेल तर राग, द्वेष, मोहादी सर्व विकार भाव सोडून निजशुद्धी आत्म्याचे ज्ञान करण्याचा सदैव अभ्यास कर जैन तत्वातून
चिंतन
पक्षपातीपणातून अनेक अडचणीचा उगम होतो. एकाशी अधिक स्नेह दाखविला आणि दुसऱ्याची उपेक्षा केली, तर भावी वाईट प्रसंगाचे आपण - बीजारोपण करीत आहोत हे लक्षात ठेवावे. खरे कार्य करण्यासाठी कार्यामध्ये खरोखर यशस्वी होण्यासाठी निःपक्षपातीपणे काम करणे हे न्यायाचे आहे स्वामी विवेकानंद.

कथाकथन
संत नामदेव'
शके १२७२ च्या आषाढ वद्य १३ या दिवशी पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीचा प्रसार करणारे प्रसिद्ध भगवद्भक्त श्री हे समाधिस्य झाले. तेराव्या शतकामध्ये महाराष्ट्रात भक्तीचा जो डांगोरा पिटला जात होता त्याचे बरेचसे श्रेय नामदेवाकडे आहे. नगर जिल्ह्यातील नेवासे गावी याच काळी ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी अवतरली होती. पांडुरंगाचा निस्सिम सद्गुणभक्त नामदेव नामदेव यांच्यासह आपण तीर्थयात्रा करावी. अशी प्रेरणा ज्ञानदेवांना झाली आणि 'तुझिये संगतीचे नित्य सुख घ्यावे सार्थक करावे संसाराचे॥ असे नामदेवांना विनवून ज्ञानदेवादी मंडळींनी उत्तर हिंदुस्थानची तीर्थयात्रा पूर्ण केली. भागवत धर्माचा प्रसार साऱ्या भारतात झाला; परंतु नामदेवाची थोरवी आणखी एका दृष्टीने मोठी आहे. ज्ञानदेवादी | भावंडाचे प्रयाण झाल्यावर नामदेव काहीसे उदास झाले. उत्तरेस म्लेच्छ राज्य होऊन धर्माचा व्हास होत होता. ते पाहून नामदेव पाचपन्नास वारकऱ्यांसहित परत उत्तरेत गेले. पंजाबपर्यंत त्यांनी विठ्ठलभक्ती पोचविली | हिंदी भाषेत कवने केली. त्या पैकी काही शीखांच्या ग्रंथसाहेबा त संग्रहित केलेली आहेत. पंजाबात गुरुदासपूर जिल्ह्यात 'घोमान' गावी नामदेवांच्या पादुकांची पूजा आज सहाशे वर्ष चालू आहे. बाबा नामदेवायी म्हणून त्याच्या अनुयायांना नामाभिधानही प्राप्त झाले. जुनागडचे नरसी मेहता आणि शीख पंथाचे प्रवर्तक नानक यांनी नामदेवांच्या भक्तीची आणि अभंगवाणीची प्रशंसा केली आहे. आजही पंजाबात या नामदेवांचे अनुयायी हजारोंनी दिसतात. तेव्हा तेराव्या शतकातील 'भोळ्याभाबड्या वारकरी संताची ही कामगिरी अपूर्व आहे. नामदेवांचे पूर्वज यदूशेट हे शिंपी जातीतील होते. यांच्यापासून पाचवा पुरुष दामाशेटी यांच्या बायकोचे नाम गोणाई. याच दांपत्यास शके ११९२ मध्ये जे पुत्ररत्न झाले तेच प्रसिद्ध नामदेव होत. बालपणापासून नामदेव विठ्ठलभक्तीत रंगून गेले. याच दिवशी मराठी वाङ्मयात प्रसिद्ध असलेली 'नामयाची दासी जनी' हिनेसुद्धा समाधी घेतली.

दिनविशेष
● भारतात कायदेशिक्षणाचा प्रारंभ १८५५ : भारतात इंग्रजी राजवट स्थिरावू लागल्यानंतर इंग्रजी उच्च शिक्षण भारतीय नागरिकांना ||मिळण्याची निकड भासू लागली. बॅ. ऑस्किन पेरी हे भारतीयांबद्दल जिव्हाळा बाळगणारे चोख न्यायाधीश १८५३ मध्ये निवृत्त झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ॐ मुंबईकर नागरिकांनी २५००० रुपयांचा निधी जमवून कायद्याचे अध्यासन सुरू करण्याचे ठरविले. या अध्यासनास 'पेरी प्रोफेसरशिप ऑफ ज्युरिनुइन्स' असे नाव दिले. हा निधी ५०,००० रु. पर्यंत गेला. त्यात सरकारने भर टाकून पुढे बॅ. रोड हे कायदेतज्ज्ञ ३०० रु. द. म. पगारावर प्राध्यापक नेमले. ३ जुलै १८५५ ला संध्याकाळी एलफिन्स्टन कॉलेजात बॅ. रोड या कायदेतज्ज्ञांच्या व्याख्यानाने प्रत्यक्ष वर्गास प्रारंभ झाला. या वर्गास १०० विद्यार्थी हजर होते. बॅ. रीड यांच्या अध्यापन कौशल्याने व प्रभुत्वाने वर्ग अत्यंत लोकप्रिय झाला. पुढे १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली व १४ एप्रिल १८६० ||पासून अधिकृत वकिलीची सनद विद्यार्थ्यांना मिळाली. भारतात अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम होता कायद्याचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक | कायदेतज्ज्ञांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिले.

- मूल्ये
• श्रद्धा, मानवता.

अन्य घटना
• संत नामदेव समाधीदिन १३५० • राणोजी शिंदे स्मृतीदिन १७४५ • महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली १८५२ • जोशुआ स्लोक्रम या खलाशाने एकट्याने जहाजातून ११६६ दिवसात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली १८९८

उपक्रम
• नामदेवांचे चरित्र मुलांना वाचायला सांगावे. ज्ञानेश्वरांचे 'पसायदान' पाठ करायला शिकवावे.

समूहगान
• बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो....

सामान्यज्ञान
• शिखांच्या प्रत्येक सणातील धार्मिक भाग सर्वसाधारणपणे सारखाच असतो. सणाच्या पूर्वी ४८ तासांपासून गुरुद्वारात किंवा अन्य सोयीच्या ठिकाणी 'ग्रंथसाहेबा'चे अखंड पठण होते. त्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन व कथा होते. समारंभाच्या अखेरीस 'गुरुका लंगर' म्हणजे मुक्त अन्नदान असते. वंश, पंथ, जात असा भेद न करता सर्व जण एकाच पंक्तीत बसतात. शिखांचे महत्त्वाचे सण म्हणजे गुरुनानक जयंती आणि बैसाखी हे

Thursday, 1 July 2021

July 01, 2021

2 जुलै, संस्कारमोती, शालेय दैनंदिन परिपाठ

 




प्रार्थना
आई माझा गुरू, आई कल्पतरू सुखाचा सागरु आई माझी ... मोरया यो उन्माणाणं णमो लोग चाहूर्ण ॥ जैन तत्त्वातून आरिङ्गताना नमस्कार असो. सिद्धांना नमस्कार असो. आचार्यांना नमस्कार असो. उपाध्यायांना नमस्कार असो. जगातील सर्व साधूंना नमस्कार असो. 


चिंतन
लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक टोप आईनस्टाईन लहान मुलांना आपल्याभोवती असणान्या साध्या गोष्टीविषयी कुतूहल असते. जिज्ञासा असते, दिसणाऱ्या गोष्टींचा कार्यकारणभाव जाणून घ्यायची इच्छा असते. म्हणूनच ती घरीदारी, शाळेत, आई वडिलांना आणि शिक्षकांना नाना प्रकारचे प्रश्न विचारीत असतात. अशा वेळी त्यांना गप्प बसायला न सांगता त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत. आपल्याला काही उत्तरे येत नसतील तर तो उत असतील अशी पुस्तके त्यांना वाचायला सांगावीत, → कथाकथन
'श्यामची आई' लहानग्या श्यामवर त्याच्या आईने फार सुरेख असे संस्कार केले होते. श्यामची आई अगदी सहजपणे बोलायची आणि त्यातून ती चिमुकल्या श्यामला असे काही सुंदर तत्त्वज्ञान सांगून जायची की श्यामवर त्याचा दीर्घकालीन परिणाम व्हायचा. एक दिवस काय झाले की श्याम घराजवळच्या बागेत खेळायला गेला होता. गुलबक्षीचे झाड कळ्यांनी फुलून आले होते. अजून फुले उमलून आली नव्हती. श्यामने काय केले तर गुलबक्षीच्या मूठभर या तोडल्या आणि तो घरी आला. श्यामच्या आईने त्या तोडलेल्या कळ्या पाहून श्यामला म्हटले की, 'अरे श्याम, तुला सांगते की झाडांवर आणि वेलीवर लगडलेल्या कळ्या कधी तोडू नयेत. कळ्या या बिचाया मुक्या असतात. त्यांना काही आपल्यासारखे बोलता येत नाही. दुसरे एक सांगते तुला श्याम, झाड काय किंवा वेल काय ती फुलांची आईच असते. त्या कळ्या आपल्या आईच्या मांडीवरच छानपणे फुलून येतात, कळ्यांना तोडणे म्हणजे त्या मुक्या लेकरांना आईच्या मांडीवरून खेचून घेणे आहे... 'श्यामची आई श्यामला इतक्या समजुतीच्या सुरात सांगत होती, की श्यामच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. श्याम चटकन् आईच्या कुशीत शिरला आणि म्हणाला, 'आई, मी झाडावरच्या कळ्या ह्यापुढे कधीच तोडणार नाही. मला तू क्षमा कर श्यामचे हृदय अतीव दुःखाने भरून आले. आईने त्याला प्रेमाने कुरवाळले म्हणाली, 'श्याम, माणसाच्या हातून नेहमी अनवधानानेच चुका होतात. आपण काय लक्षात ठेवायचे, तर त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायची...' श्यामने मान डोलावली. मग आई त्याला म्हणाली की, 'श्याम, बंब तापलेला आहे. खेळल्यामुळे तुझ्या अंगाला खूप माती लागली आहे. चल, मी आंघोळ घालते. मग तू देवाला नमस्कार करून अभ्यासाला बस.' श्यामच्या आईने श्यामला गरम-गरम पाण्याने आंघोळ घातली. कोरड्या पंचाने अंग पुसले, तेवढ्यात श्याम आईला म्हणाला की, 'आई माझ्या तळव्याला अजून आलं आहे. पंचासुद्धा आता ओला झाला आहे. तुझा पदर पसर मी त्यावर पाय ठेवतो. म्हणजे माझ्या पायाला पुन्हा माती लागणार नाही.' श्यामच्या आईने पदर पसरला. श्यामने आपले ओले पाय त्यावर ठेवले आणि ते कोरडे केले. आई चटकन श्यामला म्हणाली, 'श्याम पायाला घाण | लागू नये म्हणून एवढे जपतोस. त्यापेक्षा मनाला घाण लागणार नाही याची काळची घे. प्रथम मनाला जप हो...' अशा पद्धतीचे जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान श्यामची आई सांगायची.

सुविचार 

(आईआ म्हणजे आत्मा + ई म्हणजे ईश्वर होय.) प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार, अमृताची धार आई माझी. ● एका आदर्श मातेची बरोबरी शंभर शिक्षकही करू शकत नाहीत. गुरुपेक्षा श्रेष्ठ, आकाशापेक्षा उंच, सागरापेक्षा अर्थाांग आईवे वात्सल्य असते. • आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर असतात. • आचारात हवी शुचिता, बाणीत हवी मृदु मधुरता, वृत्तीत हवी सात्त्विकता, मनात हयी कृतज्ञता, उधारात हवी विनम्रता कृतीत हवी क्षमाशीलता.

दिनविशेष

पुरुषोत्तमदास टंडन यांचा स्मृतिदिन १९६२ : राजर्षी पुरुषोत्तम टंडन यांचा जन्म अलाहाबाद येथे १८८२ मध्ये झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही दिवस वकिली केली; परंतु १९२० पासून बकिती सोडून कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेऊन, राजकारणात प्रवेश केला. ते हिंदी भाषेचे कट्टर पुरस्कर्ते होते. १९५१ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. साधी राहणी, उच्च विचारसरणी, निःस्पृह आचार व निर्भय विचार यांमुळे ते मोठ्या गौरवास पात्र ठरले. स्वातंत्र्याच्या वयात त्यांना अनेक वेळा तुरूंगवास भोगावा लागला. १९५० साली नाशिक येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. नेहरुवे पाकिस्तानविषयक धोरण त्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदही सोडून दिले. अहिंसा व्रताचे ते काटेकोरपणे पालन करीत. ठार मारलेल्या जनावरांच्या कातड्यांची पादत्राणे ते वापरीत नसत ते राष्ट्रभाषा हिंदीचे निष्ठावंत प्रचारक होते. म. गांधी त्यांचा राजर्षी असा उल्लेख करीत. अशा या थोर नेत्याचा १९६१ साली भारत सरकारने 'भारतरत्न' हा सन्मान देऊन बहुमान केला. २ जुलै १९६२ | रोजी राजपी टंडन यांचे निधन झाले.

मूल्ये 

देशप्रेम, ज्ञाननिष्ठा,

अन्य घटना 

घोर शास्त्रज्ञ चार्लस् डार्विन यांनी उत्क्रांतिवादाचा सिद्धांत जाहीरपणे सर्वांपुढे मांडला १८५८ • भारत पाकिस्तान दरम्यान सिमला करार १९५२ • तामिळनाडूमधील कल्पक्कम येथे अणुऊर्जा केंद्राची स्थापना १९८३ 


उपक्रम 

'भारतरत्न' पदवी मिळालेल्या ५ व्यक्तींची नावे मुलांना लिहायला सांगावीत. समूहगान सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तों हमारा

सामान्यज्ञान
आपला तिरंगी ध्वज हे ऐक्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग प्रकाशाचा, सत्याचा साधेपणाचा निदर्शक आहे. केशरी रंग त्यागाचा अनु नम्रतेचा निदर्शक आहे. हिरवा रंग जीवनातील चैतन्य, समृद्धी आणि शांती दाखवितो. ध्वजाच्या मध्यभागी असलेले चक्र सांगते गतिमान व्हा, गतिशील राहा. त्याचा निळा रंग काल दर्शवितो. काल अनंत आहे, असे सांगतो.

Wednesday, 30 June 2021

June 30, 2021

1 जुलै- संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

          दैनंदिन शालेय परिपाठ


सुविचार
जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे परिश्रम, चिकाटी, जिद्द.
• योग्य दिशेने इष्ट होणारे परिवर्तन म्हणजे शिक्षण होय. जे थोर तत्त्वज्ञ होते ते शिक्षक होते.
• केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठविणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे विद्या. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णान्
• शिक्षणाला शुद्ध चारित्र्याची बैठक नसेल तर त्या शिक्षणाची किंमत शून्य आहे. त्या शिक्षणाला सत्यनिष्ठेवा व शुद्धतेचा भरभक्कम आधार नसेल तर ते कुचकामी ठरेल. आपल्या जीवनातील व्यक्तिगत शुद्धता, पवित्रता याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमचा नाश होईल. केवळ तुमच्या पांडित्याला काही किंमत नाही. महात्मा गांधी
श्लोक
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवगोसादयेत । आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः || स्वतःचा उद्धार करावा, चित्त अन्य किरकोळ गोष्टीमध्ये न गुंतवता आपले मन हेच आपला मित्रही आहे आणि याची जाणीव ठेवावी. श्रीमद्भगवतगीता शत्रूही आहे
चिंतन
हातांनी जे पेरावे, तेच उगवून हाती पडते, पाप-पुण्य भलेबुरे, हातांनीच सदैव पडते, हात म्हणजे हात, त्यांना जातपात मुढी नसते, श्रमणाच्या हातांनीच जीवनाला वैभव चढते साने गुरुजी १ जुल बार: माणसाला आयुष्यात वैभव प्राप्त करायचे असेल, काही कर्तृत्व गाजवायचे असेल तर माणसाने प्रथम कष्ट करायला, श्रम करायला शिकले पाहिजे. स्वतः श्रम करण्याचे अनेक फायदे आहेत. माणसाला एकदा श्रमाचे महत्त्व कळले, पटले की त्याच्या मनातील उच्च-नीच, जात-पात हे सारे भेदभाव नष्ट होतील. प्रत्येक भारतीयांच्या श्रमातूनच उद्याचा वैभवशाली भारत निर्माण होणार आहे. → कथाकथन
अध्यापक मित्रांनो आपण आपल्या शिष्यांना या शाश्वत सत्याची जाणीव करून या की, जरी जगात लोक न्यायनिष्ठ किंवा सत्यप्रिय नसतात, तरीसुद्धा या सृष्टीत जसे केवळ स्वार्थपरायण दुष्ट पुरुष आहेत तसेच सत्पुरुषही, चारित्र्यसंपन्न, परोपकारी सत्पुरुषही आहेत. ज्याप्रमाणे |दुसऱ्यांच्या उणिवा शोधणारे शत्रू आहेत. त्याचप्रमाणे हिताची इच्छा करणारे (हितचिंतक) असे मित्रही आहेत. आपल्या शिष्यांनी हे ज्ञान करून घ्यावे की, "सृष्टी हेच श्रेष्ठ तत्व आहे आणि सगळे प्राणीमात्र म्हणजे तिचेच अंश आहेत. सृष्टीच्या सत्य, शिव आणि सुंदर या तत्त्वांचा अनुभव घेणारे आपले विद्यार्थी सृष्टीत खुशाल रममाण व्हावेत. त्यांना अनंत अशा आकाशात स्वैरपणे विहार करणारे पक्षी, हिरवे वृक्ष, सुंदर रंगाची फुले आणि फुलातील मध प्राशन करणारे भुंगे आनंदित करोत.' आपणच आपल्या शिष्यांना हे समजू द्या की ग्रंथ म्हणजे आपले शाश्वत वैभव आहे. आपणच विविध ग्रंथांचा परिचय (त्यांना) करून द्या. कारण आपल्याशिवाय दुसरा कोण विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथाबद्दल आवड निर्माण करण्यास समर्थ असू शकेल? अध्यापक मित्रांनो, आपल्या शिष्यांनी मनात हे निश्चित करावे की, त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याने आणि बुद्धिचातुर्याने पुष्कळ धन प्राप्त करावे. परंतु स्वतःच्या अंतःकरणात राहणाऱ्या ईश्वराला साक्षी ठेवून आपल्या शिष्यांनी मनात हे पक्के धारण करावे की, घामाच्या थेंबांनी मिळालेले थोडेसे सुद्धा धन मौल्यवान असते. श्रमाच्या शिवाय जे पुष्कळ धन मिळते त्याच्या तुलनेत त्यांनी मनात हे योग्य धारण करावे की, अपराजित मनाने पराजयाचा सुद्धा स्वीकार करावा आणि शांत मनाने विजयाचा सुद्धा स्वीकार कराया. अध्यापक मित्रांनो, आपल्या विद्यार्थ्यांनी सजनांशी सज्जनांसारखे वागावे आणि लबाडाशी लबाडासारखे वागावे. त्यांनी दुर्जनांना कधीही भिऊ नये. कारण खरोखर दुर्जनच भित्रे असतात. अध्यापक मित्रांनो, विद्यार्थ्यांवर अवश्य प्रेम करादे. परंतु कधीही अति लाड करू नयेत, आपण हे जाणताच की अग्नीत शेकडो वेळा टाकलेले सोनेच सोन्याच्या गुणाच्या अतिरेकाने प्रकाशते. विद्यार्थ्यांना जगात चांगले-वाईट लोक असतात हे ज्ञात करवून द्यावे, त्यांनी सृष्टिसौंदर्याची ओळख करवून द्यावी, ग्रंथवाचनाची आवड निर्माण करावी, आचार-विचारांच्या बाबतीत त्यांच्यावर योग्य ते संस्कार करावेत, परंतु हे सर्व करत असता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की, विद्यार्थ्यांवर प्रेम अवश्य करावे परंतु प्रमाणाबाहेर त्यांना डांबून न ठेवता त्यांना प्राप्तपरिस्थितीचा सामना करायला शिकवावे.

दिनविशेष
गणेश कृष्ण खापर्डे यांचा स्मृतिदिन १९३८ : गणेश खापर्डे हे विदर्भातील प्रसिद्ध सार्वजनिक कार्यकर्ते होते. राष्ट्रीय सभेचे ते मोठे कार्यकर्ते होते. विद्वान वकील आणि सुप्रसिद्ध वक्ते म्हणून ते ओळखले जात. खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. १९०८ साली लोकमान्य टिळक यांना कारावासाची शिक्षा झाल्यावर अपील करण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतला होता. इ. स. १८९२ मध्ये नागपूर येथे भरलेल्या सामाजिक परिषदेचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तसेच १८९७ मध्ये अमरावती येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेचे ते स्वागताध्यक्ष होते. त्यांचे मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, संस्कृत, गुजराथी या भाषांवर प्रभुत्व होते. कौन्सिल ऑफ स्टेट' मध्ये ते निवडून आले होते. त्यांची भाषा भारदस्त होती. उपरोध, खुमासदारपणा व विनोद यामुळे त्यांची भाषणे रंगत असत. वक्तृत्वगुणांमुळे त्यांना हिंदी मार्कट्वेन' म्हणत. तसेच त्यांच्या औदार्यपूर्ण वागणुकीमुळे व भारदस्त व्यक्तिमत्वामुळे त्यांना 'वन्हऱ्हाडचे नबाब' असे म्हणत. → मूल्ये
राष्ट्रप्रेम, आदरभावना, श्रमप्रतिष्ठा.
अन्य घटना
• मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन याची हत्या केली १९०९.
• महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना १९६१.
• यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापना १९८९
• बालगीते लिहिणारे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ ग. ह. पाटील स्मृतीदिन १९८९ लक्ष्मी'

उपक्रम
'कराग्रे वसते या श्लोकाचा अर्थ मुलांना समजावून सांगा.
● 'अनंतहस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने' याचा कल्पनाविस्तार करायला सांगा.
समूहगान
बहू असोत सुंदर संपन्न की महा ...
सामान्यज्ञान
• भारतातील लोक हात जोडून नमस्कार करतात.
• कांगो लोक स्वागत करताना एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालतात.
• आफ्रिकन लोक स्वागत करताना कमरेत वाकतात.

Tuesday, 29 June 2021

June 29, 2021

30 जून संस्कारमोती- शालेय दैनंदिन परिपाठ

 




सुविचार:

 जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे परिश्रम चिकाटी, जिद्द.

श्लोक
श्रध्दावान् लभते ज्ञान तत्परः संयतेन्द्रियः । ज्ञानं लब्बा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ 1 | श्रध्दावान मनुष्याला ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान अतःकरणात उसके की शांती प्राप्त होते आणि आत्मबोध होतो.

चिंतन
तनू त्यागिता कीर्ती मागे उरावी.  जन्मलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जुन्या कपड्याप्रमाणे हे शरीर सोडून जायचे आहे. मरण कुणाला टळले आहे. पण कोण किती जगता यापेक्षा तो कसा जगला हे जास्त महत्वाचे! त्याचे जीवन दुसऱ्याच्या कामी किती आले हे महत्वाचे स्वत:साठी जगणारी माणसे मरतात पण दुसन्यासाठी मरणारी मात्र मरूनही तो | रूपाने या जगात राहतात. त्याचा देह जातो पण कीर्ती राहते.
कथाकथन
संत कबीरांच्या साहित्यातील सामाजिक जाणीव-कवीराच्या काळामध्ये खूप मोठी परकीय आक्रमण झालेली दिसतात हे आक्रमक हिस्त्र प्रवृत्तीचे होते, तसेच भोगविलासीही होते. या धर्मातील उच्चवर्णीय लोक कनिष्ठ लोकांचे विविध मार्गांनी शोषण करत होते. तत्कालिन सामाजिक क्षेत्रामध्येही खूप मोठा भेदाभेद माजलेला होता. हिंदू मुस्लिमांमधील भेदाभेद तर होताच, परंतु त्याचबरोबर हिंदू धर्माच्या अंतर्गतही खूप मोठी भेदाभेदाची दरी होती, या धर्मातील उच्चवर्णीय लोक कनिष्ठ वर्णीय लोकांचे विविध क्षेत्रातील सल्लास्थानी असलेले लोक अत्यंत स्वार्थी आणि भोगवादी बनलेले होते म्हणून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माणुसकी पायदळी तुडविली जात होती. म्हणून सामान्य माणूस अत्यंत दुःखी जीवन जगत होता. संत कबीर हे निर्भीड मनोवृत्तीचे असल्यामुळे त्यांना सत्ताधारी लोकांच्या भोगविलासी प्रवृत्तीला तीव्र विरोध केला. विविध प्रकारच्या धार्मिक कर्मकांडानी काहीही साध्य होत नाही, असे कबीराचे स्पष्ट मत होते. तीर्थयात्रा करणे, गंगेमध्ये स्नान करण माळा गळ्यात घालून भक्त म्हणून मिरविणे अशा सर्वच गोष्टी निरर्थक असल्याचे कबीर सांगतात विविध ठिकाणच्या तीर्थस्थानी देवाच्या नावाने तिथील ऐतखाऊ पुजारी लोक भोळ्याभाबड्या जनतेचे खूप मोठे शोषण करतात अशा शोषणाला समान्यजनांनी बळी पडू नये जत्रेमध्ये दगड असतो आणि तीर्य म्हणून चमचाभर पाण्याचा एकेक रुपया वसूल केला जातो अशा गोष्टींना बळी पडणे हा वेडेपणा आहे संत कबीर, संत रविदास आणि संत तुकाराम यांच्या विचारांमध्ये खूप मोठे साम्य दिसून येते. या संदर्भात संत तुकारामही तीथी घोडा पाणी देव रोकटा सनी असे म्हणतात तीर्थस्थानी नदीमध्ये स्नान केल्याने आपली सर्व पापे धुवून जातात आणि आपणाला मोक्ष मिळतो. असाही खुळा समज समाजामध्ये प्रचलित आहे. या संदर्भामध्ये संत कबीर एक मार्मिक प्रश्न उपस्थित करतात तीर्थक्षेत्रातील | नदीमध्ये स्नान केल्याने माणसाला मोक्ष मिळत असेल तर राबंदिवस त्या पाण्यातच राहणाऱ्या बेडकांना का मोक्ष मिळत नाही. तसेच मुस्लीम धर्मातील बकऱ्यांचा बळी देण्याच्या प्रथेलाही त्यांनी विरोध केला कबीरांना मानवता हा धर्मच महत्त्वाचा वाटत होता. प्रत्येक धर्मातील कर्मकांड माणयांना अंधश्रध्दाळू बनवणारे असते. गळ्यात माळा घालणे, गंध/टिळा लावणे, डोक्याचे केस कापणे, असे केवळ बाढ़ा सांग, ढोंग केल्याने माणूस साधू, संत किंवा सज्जन होत नाही, तर त्यासाठी आधी आपले मन शुद्ध करणे महत्त्वाचे आहे. टिळक, माळा परिधान केल्याने किंवा शाळीग्रामच्या पूजेने मन शुद्ध शीतल होत नाही, तर त्यासाठी आधी मनाची प्राती दूर झाली पाहिजे आणि माणसाचे वर्तन नैतिक बनले पाहिजे. संत कबीरांनी आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामध्ये सत्य, अहिंसा, सद्भाव, सदाचार, परोपकार, शील या गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. यासारखी मानवतावादी नैतिक मूल्ये आचरणात आणण्याचा आग्रह कबीरानी आपल्या साहित्यातून धरलेला आहे. प्रेम हा तर मानवी जीवनाचा गाभा असल्याचे कबीर सांगतात. पोथी पढपढ जग मुआ, पंडित मया ना कोय कई आधार प्रेम का पड़े सो पंडित होय 'प्रेम' या शब्दाची अशी जबर माणसांच्या आचरणात आली तर मानवी जीवनातील अनेक प्रश्न सहज सुटतील.
हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेशही संत कबीरांनी अनेक ठिकाणी दिले आहे. हिंदूरक दुई महिएकै कड़े कचौर पुकारी असे म्हणतकवीरांनी हिंदू-म मधील कृत्रिम भेदभाव निरर्थक आहेमांनी आपापसातील भेदभाव विसरून माणूस म्हणून एकत्र आहे पाहिजे असा आग्रह धरता म्हणून संत कबीर हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्हीही समान गटांमध्ये अत्यंत मोठा वाटते त्यांनी आपल्या गुरु साहिया मध्ये कबीरच्या समावेश केला. सर्व प्रकारच्या भेदभावाला विरोध करणारे कधीर हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या उच्च नीचतेलाही प्रखर विरोध करवात सर्वच माणसांची उत्पत्ती एकर ज्योतीतून झाली असेल तर ब्राह्मण सूड असा भेदभाव कशासाठी करायचा? असा खडा सात कधीर विचारतात आणि मानवी समाजामध्ये उच्चनीचतेचे कृत्रिम स्तर निर्माण करणाऱ्या जातीयता मूठमाती देण्याचा प्रयत्न करतात.

दिनविषेश
'दादाभाई नवरोजी' (जन्म ४ सप्टेंबर १८२५ मृत्यू ३० जून १९१७ ) गृहन्मुंबईत फोर्ट विभागात दादाभाई नवरोजी मार्ग 'टाइम्स ऑफ इंडिया या भव्य इमारतीला शोभा देत आहे व त्यांचा पुतळा नवभारताची प्रगती पाहत उभा आहे. ४ सप्टेंबर १८२५ साठी पारशी त्यांचा जन्म झा १८४५बी.ए.संडनला गेले. भिकाजी कामा यांच्या कार्यात सामील झाले उद्योग शिरले. इंग्लंडमधीन भारतीयांची संघटना बांधली. इंडियन सोसायटीची स्थापना केली. त्यांच्या या सनदशीर विधायक कार्यामुळे से लोकप्रिय झाले. इंग्लंडच्या पार्लमेंटचे सदस्य म्हणून ते निवडून आले. भारताचा सम्माननीय श्रेष्ठ सदस्य म्हणून जनता त्यांना ओळखू लागली. दादाभाई राष्ट्रीय समेत सामील झाले तेव्हा भारतीय जनतेच्या समस्या इंग्रज प्रशासनाच्या उपाय सुचविणे एवढेच मर्यादित स्वरुपाचे कार्य ती संस्था करीत होती. दादाभाई हे अत्यंत लोकप्रिय व मधुर मायेये सम्राट होते. १८९६ १९०६ या दोन ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

मूल्ये
स्वाधीनता बंधुता, समता, राष्ट्रप्रेम, निर्भयता

अन्य घटना
दादाभाई नवरोजी स्मृतिदिन १९१७ महान संत कबीर यांची जयंती- १३०९ • भारत पाकिस्तानात कच्छ करार मिझोराम या राज्याची निर्मिती १९८६ ● रॅले जॉन विल्यम्स स्टुट स्मृतीदिन १९८६

सामान्य ज्ञान
• महाराष्ट्रात सर्वात जास्त लोखंड देऊळगाव (चंद्रपूर)
महाराष्ट्रात सर्वात जास्त मँगेनीज रामटेक (नागपूर)
• महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळसा कामठी (नागपूर)
महाराष्ट्रात सर्वात जास्त बॉक्साईट (कोल्हापूर)
महाराष्ट्रात सर्वात जास्त अभ्रक (नागपूर)
महाराष्ट्रात एक प्रचंड विद्युत प्रकल्प कोयना (सातारा)

Monday, 28 June 2021

June 28, 2021

29 जून, संस्कारमोती- शालेय दैनंदिन परिपाठ

        शालेय दैनंदिन परिपाठ



सुविचार
'विनोदी वृत्ती जीवरक्षक ठरु शकते, शिवाय तिच्यामुळे आयुष्यातील परिस्थिती हाताळणे सोप जातं.' 'जी गोष्ट शस्त्राने होणार नाही ती कधीकधी एका मनमोकळ्या हास्याने होते.
• जो समाजास नेत्राने, मनाने वचनाने व आवरणाने खूष करतो त्याच्यावर समाज खूप असतो.

श्लोक
अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहंकारः समदुःख सुखःक्षमी ॥ श्रीमद्भगवतगीता
जो कोणाचाही व्देष करीत नाही, सर्वांशी मैत्रीपूर्ण वागतो आणि ज्याला अहंकार स्पर्श करीत नाही व सुख दुःखांविषयी जो उदासीन असतो जो क्षमाशील असतो तो सदैव संतुष्ट असतो.
चिंतन
जेवणात जसे मीठ तसेच जीवनात विनोद असावेत. जेवण मिठाविना शक्य नाही पण त्याचेही काही प्रमाण असते. नुसते कोणी मीठ खाऊ शकत नाही आणि भरपूर मीठही पदार्थात घालून चालत नाही. ते जेवढे लागते तेवढेच टाकावे लागते. विनोदाचे तसेच आहे. विनोदामुळे रोजच्या कंटाळवाण्या जीवनात लज्जत येते. ते शरीराचे अन् बुध्दीचे उत्तम टॉनिक आहे. पण म्हणून माणूस सारखाच विनोद करू लागला तर विनोदास पात्र होईल. विनोदाची मर्यादा व शक्ती ओळखून विनोद केला तर आयुष्य रंगतदार व चवदार होईल.

कथाकथन
'विनोद युध्दी'
:- स्वतः खूप हसा आणि इतरांना हसवा. तुमच्यात विनोदबुध्दी असेल तर स्वतःच्या वैगुण्यावर हसण्याची क्षमता तुमच्यामध्ये येईल. विनोदी माणूस सर्वांना आवडतो आणि हवाहवासा वाटतो. काही लोकांना विनोदाचं वावडं असतं. विनोदाकडे पाठ फिरवून ते जगतात. हे काय जगणं म्हणायचं ? स्वतःवरही विनोद करुन हसायला शिका. कारण असा विनोद कुणालाच दुखवत नाही. आघातातून पुन्हा उठण्याचं बळ विनोदातून मिळतं. हसणं हे नैसर्गिक वेदनाशामक औषध आहे. विनोदाने परिस्थितीत बदल करता येत नाही परंतु त्याने वेदनेची तीव्रता कमी व्हायला मदत होते. विनोदात जखमेवर फुंकर घालण्याची शक्ती आहे. प्राणांतिक आजारातून माणूस स्वतःला कसं 'बरं' करु शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'अॅनाटमी ऑफ अॅन इलनेस' या पुस्तकाचे लेखक डॉ. नार्मन कझिन्स. एका गंभीर आजाराने त्यांना ग्रासलं होतं. त्यांची प्रकृती सुधारण्याची शक्यता केवळ ०.००२ टक्के म्हणजे जवळपास शून्यच होती. शरीरापेक्षा मनाची शक्ती मोठी असते असं कझिन्सला वाटलं आणि त्यांनी ते सिध्द करुन दाखवायचं ठरवलं. त्यांच्या मनात आले की नकारात्मक किंवा वाईट विचारांनी जर शरीरात नुकसान करणारी रसायनं निर्माण होत असतील तर याच्या उलटही होत असलं पाहिजे. आनंद आणि हसणं यासारख्या सकारात्मक भावनांमुळे आपल्या शरीरात आरोग्यकारक रसायनं निर्माण होऊ शकतील. हॉस्पिटल सोडून ते एका हॉटेलात राहायला गेले. तिथं त्यांनी विनोदी चित्रपट पाहाण्याचा सपाटा लावला आणि आश्चर्य म्हणजे हसण्यातून स्वतःला बरं केलं. अर्थात डॉक्टरी औषधोपचार महत्वाचे असतातच. परंतु आजारी माणसाची जगण्याची इच्छासुध्दा तेवढीच महत्वाची असते.

दिनविशेष
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा जन्मदिन १८७१: मराठी माणसाला 'सुदाम्याचे पोहे' खाऊ घालून हसत ठेवणारा हा विनोदसम्राट २९ जून १८७१ साली नागपूर येथे जन्मला. मातृसुखाला पारख्या झालेल्या श्रीपाद कृष्णांना नवव्या वर्षीच अर्धांगवायूसारखा भयंकर आजार झाला होता. औषधोपचार व चुलत्यांची सेवा यामुळे ते बरे झाले पण या आजाराची काही चिन्हे जन्मभर राहिलीच. यामुळे बालपणापासून हेटाळणी झाली अन् ते एकांतप्रिय आणि पुस्तकवेडे झाले. विनोदपूर्ण टीकेचा बाण लक्ष्यावर बसतोच पण जखम मात्र होत नाही हे त्यांनी चांगले ओळखले होते. अशा तऱ्हेने विनोदाचा ललित वाङ्मयात त्यांनी प्रथमच उपयोग केला, म्हणून त्यांना विनोदी वाङ्मयाचा जनक असे म्हणतात. गडकऱ्यांनी विनोदी लेखनाच्या बाबतीत त्यांना गुरु मानले होते. 'कोल्हटकरांनी महाराष्ट्राला हसायला शिकवले' असे आचार्य अत्रे म्हणतात. अण्णासाहेब किर्लोस्करांनंतर मराठी रंगभूमीला कोल्हटकरांनीच आधार दिला. वीरतनय, मूकनायक, प्रेमशोधन, मतिविकार, वधूपरीक्षा या त्यांच्या नाटकांनी रंगभूमी गाजविली. 'बहु असोत सुंदर' हे महाराष्ट्र गीत त्यांनीच रचले. अनेक अभ्यासपूर्ण समीक्षणेही त्यांनी लिहिली. १९२७ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १ जून १९३४ रोजी त्यांचे निधन झाले.
मूल्ये
समता, खिलाडू वृत्ती
अन्य घटना महालनोबिस प्रशांतचंद्र जन्मदिन १८९३ प्रसिध्द साहित्यीक रंगा मराठे जन्म १९१३ • प्रसिध्द नट विष्णुपंत जोग यांचे निधन १९९३
उपक्रम
विनोद सांगण्याची स्पर्धा घ्या. व्यंगचित्रांची कात्रणे जमवून चिकटवहीत लावा.
समूहगान -
• पेड़ों को क्यों काटते हो, दो पेड लगाके देखो ना...
सामान्यज्ञान
• जगात सर्वात मोठे द्वीपकल्प भारत जगात सर्वात मोठे गोडे पाण्याचे सरोवर कॅनडा अमेरीका.

Sunday, 27 June 2021

June 27, 2021

28 जून, संस्कारमोती: दैनंदिन शालेय परिपाठ

         दैनंदिन शालेय परिपाठ



सुविचार
जो विचारी आहे तो तत्वज्ञ आहे, जो विकारी आहे तो बेकार आहे.
• आत्मचिंतन, आत्मपरिचय, आत्मविश्वास, आत्मसंयम, आत्मसन्मान, आत्मनिर्भय, आत्मामान, आत्मभिमान, आत्मनिष्ठा, आत्मज्ञान ही व्यक्तिमत्व विकासाची महत्वाची अंगे आहेत.
● उद्योगाने कार्य सिध्द होते, मनोरथांनी नाही.

श्लोक -

सुमित्रार्युदासीनमध्यस्थ व्देष्यबन्धुषु । साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ।

: मनुष्याची आणखी अधिक प्रगति झाली असे तेव्हा समजावे की जेव्हा तो सर्वांशी म्हणजे प्रामाणिक, हितैषी, मित्र आणि वैरी, हेदेखोर, राजन, दुर्जन आणि जे उदासिन व निःपक्षपाती आहेत त्यांच्याशी समयुद्धीने वागतो. श्रीमद्भगवतगीता

चिंतन
कोणताही सद्विचार किया कल्पना तुमच्या चित्तात उगम पावली तर तिथा पाठपुरावा केल्याशिवाय राहू नका. या कामी धरसोड उपयोगाची नाही, अशा परसोडीने दानत बिघडते. आपल्या विचारांना सदासर्वदा एकसारखे चिकटून रहावे. मोठ्या धीराने ही उठाई एकसारखी चालविती पाहिजे, यात केव्हाही मागे तोंड फिरवू नये अशा निश्चयाने आणि धीमेपणाने, धीराने तुम्ही चालता तर आज ना उद्या ज्ञानरवीचा उदय झाल्यावाचून राहणार नाही स्वामी विवेकानंद

कथाकथन
व्यक्तिमत्व विकास'

: ज्या गोष्टी आपण पाहतो, ऐकतो, वाचतो त्याचा परिणाम मनावर होत असतो. त्यातून उत्तम से घ्यावे' हे मनाला शिकवावे लागते. चांगले व बाईट यातला फरक आपण बुध्दीने ओळखतो. त्यातील 'चांगुलपणा' मनावरीत परिणाम म्हणजे संस्कार होय. अशा संस्कारांनीच 'व्यक्तिमत्व विकास होत असतो. संस्कार या शब्दाबरोबर विकार हा शब्द ऐकतो, विकार म्हणजे व्यक्तिमात्राच्या ठिकाणी जे असू नये ते 'भाव' । राग, व्देष, मोह, मद, लोभ, मत्सर हे मनाचे विकार आहेत. ते वाढू न देणे, त्यांना आवर घालणे, मनावर संयम ठेवणे इ. व्यक्तिमत्व विकासाला पोषक ठरणाऱ्या गोष्टी आहेत. 'अभिमान ही देखील मनाची एक प्रवृत्ती आहे. स्वभाषेचा, स्वदेशाचा आपले म्हणून जे आहे त्याचा अभिमान असावा, स्वाभिमान असावा, पण कोणत्याही प्रकारे दुराभिमान असू नये, प्रेम, सहानुभुती, दया, माया इ. मनोधर्माची प्रवृत्ती आहे. दुसऱ्याच्या सुख, दुःखात सहभागी होणे, गरजूंना मदत करणे, समाज-देशावर संकट आले असता धावून जाणे, त्याग भावना असणे, उदार दृष्टीकोन असणे इ. व्यक्तिमत्व विकासाची अंगे आहेत. निर्भपता, कर्तव्यदक्षता, उद्योगशीलता ह्या गुणामुळे व्यक्तित्व अधिक प्रभावी बनते. या उलट आळस, अंधश्रद्धा, अकर्मण्यता, केवळ चैन करण्याची प्रवृत्ती ह्या गोष्टी व्यक्तिमत्व विकासाला बाधक ठरतात. तेव्हा चांगल्या गुणांचा स्वीकार व बाईटाला नकार देण्याची सवय मनाला लावायला पाहिजे. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात आपल्या स्वभावाला मनाला चांगले वळण लागावे म्हणून आपल्याला खालील बाबी महत्वाच्या वाटतात (१) उत्तम ध्येय समोर ठेवावे ते साध्य करण्याकरता सतत प्रयत्नशील असावे. २) उत्तम पुस्तकांचे विशेषतः ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, चरित्रात्मक पुस्तकांचे नियमित वाचन करावे. ३) एखादा नियम करावा व निश्चयाने त्याचे पालन करावे, ४) सुसंगति सदा घडो' यातले मर्म ओळखून चांगल्या मित्रांच्या संगतीत रहावे. ५) आपली चूक असेल तर ती मान्य करावी, केवळ दुसऱ्यावर दोषारोपण करून समाधान मिळवू नये. ६) चांगल्या गोष्टींचे, सवयींचे अनुकरण करावे, वाईटाकडे धावणाऱ्या मनाला आवर घालावा. ७) दुसऱ्याची चूक असेल तर ती चांगल्या भाषेत समजाऊन सांगावी. ८) आपली अभिरुची (आवड) संपन्न असावी. त्या करिता चांगल्या वाईटातला फरक ओळखायला शिकावे. ९) एखादा सुंदर छंद जोपासावा. (१०) काही नित्य पाठाची सवय लावावी.

दिनविशेष


महालनोबिस प्रशांतचंद्र स्मृतीदिन १९७२
या प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञाचा जन्म २९ जून १८९३ रोजी झाला. यांचे शिक्षण कलकत्ता विद्यापीठात झाले. पुढील शिक्षणासाठी ते कब्रिज येथे गेले. सन १९१५ ते १९२२ या काळात कलकत्ता विद्यापीठात पदार्थ विज्ञान या विषयाचे त्यांनी अध्यापन केले. १९२२ नंतर ते या विभागाचे प्रमुख झाले. इंडियन स्टॉटस्टिकल इन्स्टिट्यूटचे प्रमुख म्हणूनही सन १९३१ साली ते काम पाहत १९४५-१९४८ या काळात कलकत्याच्या प्रेसिडेंसी कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. १९४९ पासून भारत सरकारचे संख्याशास्त्रविषयक सल्लागार म्हणून ते काम पाहत असत. भारत सरकारच्या नियोजन मंडळाशीही यांचा संबंध होता. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे ते अध्यक्ष होते. अनेक जागतिक संस्थांचे ते सभासद होते. १९४४ साली त्यांना ऑक्सफर्ड विद्यापिठाने वेल्डन पदक व पारितोषिक देऊन गौरव केला. १९५७ साली कलकत्ता || विद्यापिठाचे सर्वाधिकारी पद त्यांना मिळाले. भारत सरकारने १९६८ मध्ये त्यांनी पद्मविभूषण हा किताब दिला. भारतीय सांख्यिकीय संशोधनात अग्रगण्य म्हणून मानण्यात येणारे 'संख्या' हे नियतकालीक १९३३ मध्ये त्यांनी सुरु केले आणि तेव्हापासून त्याचे सातत्याने संपादन करून आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय क्षेत्रात त्याला मानाचे स्थान प्राप्त करून दिले. अशा अनेक सन्मान्य पदे व मानसन्मान मिळवलेल्या या श्रेष्ठ भारतीय संख्याशास्त्रज्ञाने २८ जून १९७२ रोजी या जगाचा निरोप घेतला.

मूल्ये

कर्तव्यदक्षता, श्रमनिष्ठा, विज्ञाननिष्ठा अन्य घटना प्रसिध्द साहित्यिक व समीक्षक थोर विचारवंत गंगाधर पानतावणे यांचा जन्म १९३७ • कर्मवीर औंदुबर कोंडीबा पाटील स्मृतीदिन २००० • भारत व पाकिस्तानमध्ये सिमला करार झाला १९७२ • रत्नप्रभादेवी मोहीते पाटील स्मृती २००२

उपक्रम
मराठीतील विज्ञान मासिकांची माहिती मिळवा. • मराठीतील विज्ञान मासिकांचे वाचन करा.


समूहगान
आम्ही बालक या देशाचे, शिकू पडे सारे विज्ञानाचे....

सामान्यज्ञान
माणसाला हसण्यासाठी १७ स्नायू वापरावे लागतात. पण रागावण्यासाठी ४३ स्नायू वापरावे लागतात. • जगात सर्वात जास्त वेगाने उडणारी चिमणी स्वीटर होय. तिचा वेग ताशी २०० मैल असतो.

Saturday, 26 June 2021

June 26, 2021

27 जून, संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

           दैनंदिन शालेय परिपाठ


सुविचार
'श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल.' • 'जुलमाने विचार मरत नाहीत, उलट ते सुदृढ होत राहतात मॅझिनी

श्लोक
प्रकाश च प्रवृतिंच मोहमेव च पाण्डव न देष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानी कांक्षति ।। उदासीनवदासीनो गुणयों न विद्याल्यते । गुणा वर्तन्त इत्येष योऽयतिष्ठति नेगते ॥ बार समृदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः । तुल्यप्रियाधियो धीरस्तुत्यनिन्दात्म संस्तुतिः || मानापमानयोस्तुल्यस्तुत्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्चते ॥ श्रीमद्भगवतगीता
- प्रकाश, प्रवृत्ति आणि मोह (म्हणजे अनुक्रमे सत्व, रज व तम या गुणांची कार्ये किंवा फले) प्राप्त झाली तरी त्यांचा जो व्देष करीत नाही, आणि प्राप्त न झाली तरी त्यांची आकांक्षा करीत नाही. (कर्म फलाबद्दल) जो उदासीनसारखा राहणारा, सत्व, रज व तम हे गुण ज्याला विचलित करीत नाहीत, गुण (आपापले) काम करीत आहेत एवढेच मानून जो स्थिर राहतो, विचलित होत नाही. म्हणजे विकार पावत नाही, जो सुखदुःखांना समान समजतो, जो स्वस्थ म्हणजे आपल्याच स्वरुपाच्या ठिकाणी स्थिर झाला. माती, दगड व सोने यांच्याकडे जो समान दृष्टीने पाहतो, प्रिय व अप्रिय आपली स्तुती ही ज्याला समसमान वाटतात सदा धैर्याने युक्त ज्याला मान व अपमान मित्र व शत्रुपक्ष तुल्य म्हणजे एकसारखे, आणि (प्रकृति सर्व करते असे समजल्यामुळे त्याने सर्व सकाम क्रमांचा त्याग केला, त्या मनुष्याला गुणातीत असे म्हणतात.

चिंतन
'धैर्यवान लोक मशालीप्रमाणे असतात.' धैर्यवान लोकांच्या जीवनाचे एकच ध्येय असते व ते म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर स्वार होणे अन्यायाच्या अंधारात मशाल होऊन घुसणे, घरातल्या थोड्याशा अंधाराला दूर करण्यासाठी दिवा लावता येतो पण त्यापेक्षा भयंकर अंधार दूर करायचा तर पाजळती मशाल हवी. मशाल उलटी घरली तरी ज्वाळा वरच झेपावते त्याप्रमाणे धैर्यवान लोकांना कितीही प्रतिकार झाला तरी त्यांचे धैर्य कधीही खालावत नाही. ते सदैव तळपतच राहते.

कथाकथन
'लोभी शेतकरी'
: रशियातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. एकदा त्याला राजाकडून असे वचन मिळाल की तो एका दिवसात जेवढं चालेल तेवढी जमीन त्याची होइल. त्यासाठी अट अशी होती की जिथून तो सुरुवात करेल त्या ठिकाणी त्याने सूर्यास्तापूर्वी परत यायचे. दुसऱ्या | दिवशी भल्या पहाटेच त्या श्रीमंत शेतकऱ्याने वेगात चालायला सुरुवात केली; कारण जास्तीत जास्त जमीन त्याला मिळवायची होती. दुपारी तो दमला तरी चालत राहिला; कारण अजून श्रीमंत व्हायची आयुष्यात एकदाच मिळणारी ही संधी त्याला घालवायची नव्हती. दुपार सरत आल्यावर घातलेली अट त्याला आठवली. जिथून सुरुवात केली तिथ सूर्यास्तापूर्वी त्याला परत जायचं होते जास्तीत जास्त जमीन मिळवायच्या लोभामुळे तो आता दूर आला होता. त्यान परतीचा प्रवास सुरु केला. त्याचं लक्ष सूर्यास्ताकड होत. सूर्यास्त जवळ येऊ लागला तसा तो अधिक जोरात पळू लागला. पळता पळता तो पूर्णपणे थकला, त्याला श्वास घेता येईना. तरीही सर्व शक्ती पणाला लावून तो पळत राहिला आणि सुरुवातीच्या ठिकाणी येऊन पोहोचला. पण तिथंच तो खाली पडला आणि मेला. तो सूर्यास्तापूर्वी मूळ जागी तर पोहोचला. राजाने त्याला सर्व जमीन दिली. त्याला पुरण्यात आलं त्यासाठी त्याला फक्त साडेतीन हात जागा लागली.

दिनविशेष
• 'शिवराम परांजपे यांचा जन्मदिन १८६४ शि.म.परांजपे यांना त्यांच्या नावापेक्षा लोकांनी ओळखले ते 'काळ' कर्ते म्हणूनच ते | राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक, पत्रकार व फर्डे वक्ते होते. महाराष्ट्रात 'काळ' या वृत्तपत्राव्दारे देशाभिमानाची धगधगती ज्योत त्यांनी जनमानसात पेटविली. || शुध्द स्वातंत्र्याचे प्रतिपादक म्हणून त्यांनी 'काळ' या वृत्तपत्रातून आपला ठसा उमटविला. काळमधील लेख इतके प्रक्षोभक असत की इंग्रज सरकार ते जप्त करीत असे. त्यांचे निवडक लेख 'काळातील निवडक लेख' या नावाने प्रसिध्द आहेत. मानाजीराव हे नाटक; विंध्याचल, गोविंदाची गोष्ट या कादंबऱ्या आणि |'मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास' हा ग्रंथ असे त्यांचे सकस साहित्य आहे. ब्रिटिश सरकारने 'काळ' वृत्तपत्रावर जामीनकीची कुऱ्हाड चालवून ते बंद पाडल्यामुळे या प्रतिभावंताची प्रतिभा कुस्करली गेली. पुढे त्यांनी 'स्वराज्य' वृत्तपत्र काढले पण त्यात काळाचा आवेश आणि आग नव्हती. लो. टिळकांच्या निधनानंतर म. गांधींच्या मार्गाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण त्यात ते मनापासून रमले नाहीत. १९२९ साली बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. नंतर प्रकृती खालावत गेली व २७ सप्टेंबर १९२९ साली ते कालगत झाले. काळातील तेजस्वी निबंधाचे जनक म्हणून त्यांची कती मात्र काळावर मात करून अजरामर झाली आहे.

मूल्ये
स्वाधीनता, कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम, बंधुता, निर्भयता.

अन्य घटना
शूर मराठा सेनापती धनाजी जाधव स्मृतिदिन १७१०.
• महाराजा रणजीतसिंहाचे निधन १८३९ • अंधत्वावर मात करून महान कर्तृत्व गाजवणारी अमेरिकन महिला हेलन केलर हिचा जन्म १८८०

समूहगान
बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू या...

उपक्रम

→ महाराष्ट्रातील वेगवेगळी वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या दाखवणारा तक्ता तयार करा.

सामान्यज्ञान
• सर्वात मोठा खंड आशिया.
• सर्वात मोठे बेट ग्रीनलँड.
• सर्वात मोठा सागर पॅसिफिक
• सर्वात मोठे वाळवंट सहारा,
• सर्वात मोठा ग्रह ज्युपिटर
• सर्वात लांब नदी नाईल.

Friday, 25 June 2021

June 25, 2021

26 जून, संस्कारमोती, दैनंदिन शालेय परिपाठ

            दैनंदिन शालेय परिपाठ

  सुविचार
शील घडविणारे, मनाची शक्ती वाढविणारे, बुद्धीचा विकास करणारे आणि मनुष्याला स्वावलंबी बनविणारे, असे शिक्षण आपल्याला हवे शिक्षण त्यालाच म्हणावे की प्राप्त झाल्याने लोक विनम्र, परोपकारी, सेवाभावी आणि कार्यतत्पर होतात.

श्लोक:
   आयुः सत्यवतारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः । रस्याः स्थिराः हयाः आहाराः सात्विकप्रियाः ॥ कट्ठयणात्पुष्तीण रुक्ष विदाहिनः आहारा राजसस्पेष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ तरपितं य यत् । उच्छिष्टमपि चामेप्यं भोजन तामसप्रियम् ॥ श्रीमद्भगवतगीता  सात्विक मनुष्यांना, आयुष्य वाढविणारे सत्वशुध्दि करणारे व आरोग्य, सुख आणि सृप्ति देणारे, रसयुक्त स्निग्ध, स्थिर राहणारे आणि मनाला आनंद देणारे आहार आवडतात राजस मनुष्यांना कडु, आंबट, खारट, अति उष्ण, तिखट, रुक्ष म्हणजे शुष्क आणि दाहकारक असे हे दुःख, शौक आणि उत्पन्न करणारे आहार प्रिय असतात तामस मनुष्याना, तीन तासांपूर्वी शिजवलेले बेचव, दुर्गंधीयुक्त उष्टे आणि अपवित्र अन्न आवडणारे असते. 


चिंतन:
वेळेवर पातलेला एक टाका नंतरचे दहा टाके वाचवतो. कुठल्याही गोष्टीत काळजीपूर्वक काम करणे जरुरीचे असते. बेजबाबदारपणाने वागल्याने आपले भरून न येण्याइतके नुकसान होते. जर अंगातील कपडा थोडासा फाटलेला असला तर त्याला एक टाका घातला नाही तर मग तो कपडा अधिक फाटत जातो आणि दहा टाके घालायची वेळ येते. पालकांनी आपल्या मुलांच्या वागण्याकडे असेच काळजीपूर्वक लक्ष दिले तर नंतर तो बाईट मार्गाला लागल्याचे दुःख त्यांना भोगावे लागत नाही. कवाकचन छत्रपती शाहू महाराज' (सर्व सद्गुणांचा उपासक) छत्रपती शाहू महाराज आणि भारताचे स्वातंत्र्य यांचे अतूट नाते आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ मध्ये कागल थोरली पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात झाला ते छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीने त्यांना दत्तक घेतले. राजकोट येथील संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले तेथील फ्रेझर या गुरूच्या शिक्षणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. एप्रिल १८९४ मध्ये त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेती: २६ जुलै १९०२ बहुजनांसाठी शाहू महाराजनांनी आरक्षण लागू केले २८ वर्षांचा कालावधी त्यांनी कोल्हापूरचा कायापालट करण्यात चालविला १९२२ साली त्यांनी इहलोक सोडला. त्या काळात देशभर कड़वे क्रांतिकारक थंड करण्याच्या तयारीत होते. इंग्रज सशस्त्र होते. विवेकानंदांची व्याख्याने अमेरिकेत गाजत होती. पण हा छत्रपती गोरगरिबांचा, दीनदलितांचा राजा होता. विद्वानांचा चाहता होता कलावंतांचा वाला होता, समाजसुधारकांचा दाता होता, शिक्षणाचा भोक्ता होता. स्थिर चित्ताने धोरण आखणारा नेता होता. उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरीबांना मुक्त करणारा सत्ताधीश होता. त्याने क्षात्रजगद्गुरूचे धर्मपीठ स्थापन किले. कुलकर्णी वतन नष्ट करून तलाठीपद निर्माण केले. बलुतेपद्धती नष्ट केली. पूर्वाश्रमीकाच्या गुन्हेगारांना मुक्त केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. ठिकठिकाणी वसतिगृहे उभारली. तळगाळातील लोकांना मायेचा स्पर्श दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशातून परत आले तेव्हा या दलित विद्वानाच्या भेटीसाठी उत्सुक असलेला हा राजा परळला सिमेंटच्या त्याळीत त्यांना भेटायला गेला. कोल्हापुरात बोलवून त्यांचा त्यांनी मोठा सत्कार केला. त्याचे व्यक्तिमत्त्व लोकोत्तर होते. कलाप्रेम अगाध होते. माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, बाल गंधर्व, बाबूराव पेंटर, गोविंदराव टंबे, मालजी पेंढारकर, केशवराव भोसले, अब्दुल करीम खाँ, शंकरराव सरनाईक अशा गुणसंपदेचा मेळा कोल्हापुरात महाराजांनी निर्माण केला. त्यांच्या सर सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद केंब्रीज विद्यापीठाने घेतली. त्यांना एल. एल. डी. ही सन्माननीय पदवी बहाल केली. राजाचे नाव जगभर झाले. ६ मे १९२२ हा स्मृतिदिन.

- दिनविशेष
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन जगात जसजशी भौतिक सुखाची रेलचेल झाली तसतसे माणसाचे मन अधिकाधिक सुखाकडे कले. एकीकडे पैसे मिळवण्याची कसा वाढली, तर दुसरीकडे सुखाचा उपभोग विकृत पध्दतीने घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. या सापडलेल्या जगातील अनेक तरुणांची सुटका करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था जिवापाड परिश्रम करीत आहेत. वेगवेगळ्या शहरात केल्या जाणान्या अशा अंमली पदार्थ निषेध प्रयत्नातून २६ हा जागतिक अंमली पदार्थ निषेध दिन म्हणून पाळला जाण्याची कल्पना पुढे आली. या दिवशी सरकारी तसेच खाजगी संस्था ज्या व्यसनमुक्तीचे काम करीत आहेत. वेगवेगळी पथनाट्ये, समूहनाट्ये, समूहगीते अशा माध्यमातून लोकांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम प्रभावीपणे समजावून सांगतात व त्यांना दारू, परस गांजा, ब्राऊन शुगर अशा अंमली पदार्थांच्या भयानक आकर्षणापासून दूर राहण्याचे आवाहन करतात. पुण्यात येरवडधानजीक पाठविली जाणारी 'मुक्तांगण' ही संस्था डॉ. अनिता अवचट यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे समाजोपयोगी काम अनेक वर्षे करीत आहे. 


मूल्ये:
बंधुता, समता, निर्भयता • राजर्षी शाहू महाराज जयंती १८७४

अन्य घटना
राजर्षी शाहू महाराज जयंती १८७४• बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म १८८८ रसायन शास्त्रज्ञ डॉ. प्रफुलचंद्र राय यांचे निधन १९४४. • युनोची स्थापना १९४५. पुणे महापालिकेला कारभार मराठी भाषेतून करण्याच्या ठरावाला मंजुरी दिली गेली १९५८. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन १९६८ • पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली १९७५. • एअर इंडियाचे बोइंग विमान गौरीशंकर कोसळले. १९८२. 


उपक्रम
आपल्या आसपासच्या वस्त्यांमधून अंमली पदार्थाचे दुष्परिणाम दाखवणारी पथनाट्ये सादर करा. • आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी अशा प्रकारचे एक छोटेसे नाटक सादर करा.

  समूहगान
ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा तो नारा...
सामान्य ज्ञान :
●सूर्य मंदिर कोणार्क(ओरिसा)
● गुलाबी शहर जयपूर (राजस्थान)
●अफू अफूच्या झाडांना आलेल्या कच्च्या बोंडांना पाडलेल्या चिरांतून पाझरलेल्या व वाळून घट्ट झालेल्या रसाला 'अफू' म्हणतात. हा एक मादक विषारी पदार्थ आहे. नशेसाठी अफू सेवन केल्यावर पुनः पुन्हा तिची इच्छा होऊन मनुष्य व्यसनात गुरफटला जातो.

Thursday, 24 June 2021

June 24, 2021

25 जून- संस्कारमोती- शालेय दैनंदिन परिपाठ

         शालेय दैनंदिन परिपाठ



श्लोक:
वंदे मातरम् ।
सुजलां दिया सुफलाम् महशीतलाम सत्यशामा मातरम् । वंदे मातरम् ॥ शुभज्योत्तनां पुतकीत यामिनीम् फुस्तकुसुमित मदत शोभिनीम् ॥ सुहासिनी, सुमपुर भाषिणीम् सुखद, वरदां मातरम् । वंदे मातरम् ॥ बंकीमचंद्र चटोपाध्याय
- हे भारत माते, तुला आम्ही वंदन करतो. तू उत्तम जतांनी संपन्न असलेली, उत्तमोत्तम फळांनी समृद्ध बनलेली मतपगिरीवरीत चंदनाच्या बनातून वाहात येणान्या सुगंधीत यान्यांनी शांत शीतल झालेली आणि सर्व प्रकारच्या पिकांनी सतत हिरवीगार दिसणारी आहेस हे मातृभूमि तुला आम्ही वंदन करतो. हे भारतमाते रात्रीच्या शुभ्रधवल चांदण्याने तू रोमांचित होत असतेस फुलांनी डवरलेल्या वृक्षराजीमुळे तू शोभायमान दिसतेस तू नेहमीच प्रसन्न राहतेस. तू मधुर भाषण करणारी आहेस. तू आम्हाला सदैव सुख देत असतेस: आमच्या सर्व आशाआकांक्षा पूर्ण करतेस हे माते, तुला आम्ही चंदन करतो

चिंतन
वेदमंत्राहून आम्हा बंध वंदे मातरम्' स्वातंत्र्य हा एकच ध्यास लागलेल्या क्रांतिकारकांच्या तोंडी अत्यंत पवित्र दोनच शब्द होते ते म्हणजे वंदे मातरम्, माझ्या मातृभूमीला मांझे चंदन असो. बेदमंत्र उच्चारताना माणसाचे मन जितके एकाग्र होत असे तितक्या एकाग्रतेने भारतीय क्रांतिकारकांनी देशभक्तीचे व्रत पाळले. या व्रताच्या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणांचीही प्रसंगी आहुती दिली. या दोन शब्दांचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांनी आपल्या छातीची ढाल केली. आज अभिमानाने हे गीत म्हणत असताना त्या अभिमानास्पद भूतकाळाची आठवण हृदयात जागी ठेवायला हवी.

कथाकथन
आपल्यावरून जग ओळखावे सुमारे पाच सहाशे वर्षांपूर्वी मुसलमान आणि ख्रिस्ती लोक यामध्ये कडाक्याचे युद्ध चालले होते. एका सवाईत तुर्क लोकांचे ५०० शिपाई ख्रिस्ती लोकांनी कैद केले आणि त्यांना बाजारात नेऊन गुराप्रमाणे विकून टाकले, अशा लोकांना गुलाम म्हणतात त्यांपैकी अहमद नावाच्या गुलामास एका ख्रिस्ताने शंभर होनास विकत घेतले. तो मनुष्य अहमदाला आपल्या घरी बैलाप्रमाणे राबवीत असे धनी देईल ते वयाचे आणि सांगेल ते काम करावयाचे काम करण्यास चुकले की चाबकाचे फटके खावयाचे असा राक्षसी छळ त्याने म्हातारपणापर्यंत सोसिता पुढे त्याच्याच्याने काम होईनासे झाले. म्हणून धन्याने त्याला दुसऱ्या एका ख्रिस्त्यास विकले. तेथेही त्याच्या नशिबी तेच त्याला त्या गुलामगिरीचा जाच सहन होईनासा झाला. रोज तो धाय धाय रडे आणि परमेश्वराची प्रार्थना करी, की 'हे देवा, असली खडतर गुलामगिरी तू कोणाच्याही नशिबी लिहू नकोस ।" अशा स्थितीत काही दिवस लोटल्यावर एका दयाळू मनुष्याला अहमदचा कळवळा आला तेव्हा त्याने त्याला विकत घेतले आणि उत्तर त्याच्याजवळ ५०० होन देऊन त्याला सोडून दिले. अहमदाने त्या मनुष्याच्या उदारपणाबद्दल त्याचे मनापासून आभार मानले आणि त्याच्या पाया पडून तो घरी निघाला. तो जो निघाला तो प्रथम बाजारपेठेत गेला, तेथे एका दुकानात पोपट, मैना, काकाकुवा वगैरे अनेक पशुपक्षी पिंजऱ्यात घालून विकण्याकरिता ठेवले होते. दुकानदाराजवळून त्याने सर्व पक्षी विकत घेतले आणि लागलीच त्यांना सोडून दिले हे त्याचे चमत्कारिक दिसणारे कृत्य पाहून दुकानदार त्यास विचारतो. काय हो, तुम्ही या पक्ष्यांना हौसेने पाळण्यांचे सोडून देऊन त्यांना सोडून का वरं दिले? अहमद म्हणाला, 'शेटजी तुम्हाला गुलामगिरीचा खडतर अनुभव नाही म्हणून तुम्ही असं विचारता, मी गुलामगिरीत संबंध जन्म काढला आहे. तुम्ही या पक्ष्यांचा जन्मसिद्ध हक्क हिरावून घेत आहात, हे मलापहावेना. म्हणून मी त्यांना सोडून दिले ! हे ऐकून दुकानदाराचे तोंड बंद झाले → सुविचार सत्य आणि न्याय याहून कोणताही धर्म मोठा नसतो. म. गांधी ● जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वतःला स्वांतत्र्यात राहण्याचा अधिकार नाही अब्राहम लिंकन • दिव्याने दिवा लावत गेलां कि दिव्याची एक माळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं कि फुलांबी माळ तयार होते. माणसाला माणूस जोडत गेलं कि माणूसकीचं एक सुंदर जग तयार होते. आणि शब्दाला शब्द जोडत गेलं कि साहित्यकृती तयार होते उत्तम.

दिनविशेष
'वंदेमातरम' चे जनक बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन १८३८ बंकिमचंद्र चटर्जी आजही ओळखले जातात ते 'वंदेमातरम' या आपल्या राष्ट्रगीताचे जनक म्हणून बंकिमचंद्रांनी लिहिलेली ही एकमेव कविता, त्यांच्या आनंदमठ कादंबरीत शब्दांकित झाली आहे. बंकिमचंद्र आधुनिक बंगाली साहित्याचे एक प्रवर्तक होते. विद्यार्थीदशेतच सुरु झालेले त्यांचे लेखन जीवनाच्या अखेरपर्यंत सतत सुरु होते. ते एक अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. १८५८ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून जे पहिले दोन पदवीधर बाहेर पडले. त्यात बंकिमचंद्र होते. त्यानंतर डेप्युटी मॅजिस्ट्रेट झाले व सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी विविध सरकारी हुद्यांवर काम केले. १८७२ साली त्यांनी बंगदर्शन हे बंगाली नियतकालीक सुरु केले. सुशिक्षितात स्वातंत्र्यप्रेम आणि राष्ट्राभिमान जागा करण्याच्या हेतूने सुरु केलेल्या या नियतकालिकामुळे बंगाली नियतकालिकाचे प्रभावी पर्व सुरु झाले. अनेक नवे लेखक यामुळे उद्यास आले. रवींद्रनाथांनाही बंकिमचंद्रांनी साहित्यसाधनेसाठी प्रोत्साहन दिले शुध्द भाषा व बोली भाषा याचा सुंदर संगम करुन बंकिमचंद्रांनी बंगाली गधाला नवे वळण लावले व सामर्थ प्राप्त करून दिले आपली पहिली कादंबरी इंग्रजीत लिहीली. पहिली बंगाली कादंबरी दुर्गेशनंदिनी ही असून नंतर त्यांनी कुंड मृणलिनी, विषवृक्ष, चंद्रशेखर आनंदमठ इ. अनेक कादंबऱ्या लिहील्या बंगाली साहित्यात विनोदही बंकिमचद्रांनीच आणला कमलकातेर दप्तर म विनोदगर्भ वैचारिक लेखही प्रसिद्ध आहेत. २५ जून १९३८ रोजी त्यांची जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये साजरी केली गेली होती. (मृत्यू ८ एप्रिल १८९४)

मूल्ये स्वाधीनता, कर्तव्यदक्षता → अन्य घटना • इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने विश्वचषक जिंकला - १९८३
उपक्रम
सुप्रसिद्ध बंगाली लेखकांची व त्यांच्या पुस्तकांची नावे मिळवून फलकावर लिहा. समूहगान जहाँ डाल डाल पर सोने की चिडीयाँ करती हैं बसेरा

सामान्यज्ञान
• राम गणेश गडकरी- गोविंदाग्रज
• कृष्णाजी केशव दामले- केशवसुत
• वि.वा. शिरवाइकर- कुसुमाग्रज,
• प्रल्हाद केशव अत्रे- केशवकुमार ●त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी
●नारायण मुरलीधर गुप्ते. बी.

Wednesday, 23 June 2021

June 23, 2021

24 जून,संस्कारमोती, दैनंदिन शालेय परिपाठ

         दैनंदिन शालेय परिपाठ


→ सुविचार 

शूर माणसानं नम्र, पनिक माणसानं निगर्वी, ज्ञानी माणसानं शांत, तपस्व्यानं क्षमाशील, धार्मिक माणसानं सज्जन आणि उदार माणसाने विवेकी असणं हे त्यांचं भूषण आहे. तेव्हा सर्व माणसांच्या बाबतीत चरित्र्य किंवा सदाचार हे सर्वश्रेष्ठ भूषण आहे.' (शीलं परं भूषणम्- भर्तृहरि) 

• ‘चित्र ही हाताची कृती आहे तर चरित्र ही मनाची कृती आहे.' 'आपले काम जवाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानांचा मार्ग आहे. शेक्सपिअर 

श्लोक 

मोदमस्तपः शीचं शान्तिरार्जवमेव च । ज्ञानविज्ञानमास्तिक्यं ब्रम्हकर्म स्वभावम शौर्य तेजो धृतिर्दा युध्दै चाप्यपलायनम् । दानमीश्वरमावश्व क्षात्रकर्म स्वभावजम् ।। २४ जून चार : कृषिगोरक्ष्यवाणिज्य वैश्वकर्मस्वभावजम् । परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्थापि स्वभावजम् ॥ श्रीमद्भगवद्गीता - मनाची शांती, इंद्रियनिग्रह, पवित्रता, सहिष्णुता, सरळपणा किंवा सत्यनिष्ठा, अध्यात्मज्ञान, विविधज्ञान श्रध्दा या गुणांनी युक्त अशी ब्राह्मणांची • स्वाभाविक कर्मे असतात. पराक्रम, तेजस्विता, धैर्य किंवा मनाचा दृढनिश्चय, युध्दातून पळून न जाणे, दान, औदार्य आणि प्रजेचे नेतृत्व है। क्षत्रियांच्या कर्माचे गुण आहेत हे क्षत्रियाचे स्वाभाविक कर्म होय. तर शेतकी, गुरे बाळगणे, व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म होय, आणि तसेच दुसऱ्यांची सेवा करणे हे शूद्राचे स्वभावजन्य कर्म होय.


 → चिंतन 

प्रयत्न करा यश मागे येईलच. महर्षी कर्वे आपल्या संस्कृतीने नेहमीच कर्माचे महत्त्व सांगितले आहे. कर्म म्हणजे काम किंवा प्रयत्न प्रयत्न करत राहणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य करणाऱ्याला त्याचे योग्य ते फळ जरूर मिळते. आजवर जगाला आधुनिक युगात येईपर्यंत जे साहाय्य लाभले असे निरंतर प्रयत्न करणाऱ्या माणसांकडूनच! अशा संशोधकांनी सतत प्रयत्न करून नवे शोध लावले अथक प्रयत्न करून कलाकारांनी यशाचे उंच मजले गाठले. भीमसेन जोशी, जयंत नारळीकर, शिल्पकार करमरकर हे अशा प्रयत्नशील माणसांपैकी काही, ज्यांच्या अपार प्रयत्नांवर प्रसन्न होऊन यशश्रीने त्यांना माळ घातली. 


कथाकथन

 'चारित्र्य': सचोटी, निस्वार्थीपणा, आत्ममान, निश्चित मत, धैर्य, निष्ठा आणि आदर या गुणांचं मिश्रण म्हणजे चारित्र्य. 

उत्तम चारित्र्यसंपन्न प्रसन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींची अनेक वैशिष्टये सांगता येतात. असे लोक कुठेही उठून दिसतात. असे लोक कोणत्याही प्रसंगात आपला तोल ढळू देत नाहीत. शांत, आश्वासक, आकर्षक, आत्मविश्वासपूर्ण परंतु संयमित असं त्यांचं वर्तन असत. या लोकांचा आत्मविश्वास जबरदस्त असतो. पण त्यात उद्धटपणा नसतो. हे लोक दुसऱ्याच्या भावना समजवून घेतात. असे लोक सबबी सांगत बसत नाहीत. • असे लोक सभ्य असतात, शिष्टाचार पाळतात. त्यासाठी अनेक छोटे मोठे त्याग करायला तयार असतात. हे लोक आपल्या आधीच्या चुकांपासून घडे घेवून त्या चुका सुधारतात. असे लोक संपत्ती किंवा जन्मजात वारसा अशा गोष्टींची पर्वा करीत नाहीत. असे लोक कधीही दुसऱ्याचे वाटोळे करून स्वतःचा फायदा करून घेत नाही. असे लोक उच्चपदी असले तरी सर्वांशी मिळून मिसळून राहातात. असे लोक सामान्यांप्रमाणे राहूनही प्रतिष्ठितांच्यात सहज वावरतात. असे लोक ढोंगी या दांभिक नसतात. असे लोक मृदुभाषी व प्रेमळ असतात. हसतमुख असतात. जुलमाविरुध्द उभे राहण्यास ते सदैव सिध्द असतात. हे म्हणजे तुमच्या कामगिरीला विजय प्राप्त करून देणारा सुवर्णस्पर्श. हे लोक किमया करुन दाखवतात. हे लोक सहज ओळखता येतात, पण त्यांची व्याख्या करणं अवघड असतं. हे लोक लीलया जबाबदाऱ्या स्वीकारतात. हे लोक म्हणजे मूर्तिमंत नम्रपणा. असे लोक जय आणि पराजय या दोहोंनाही सारख्याच उमदेपणानं सामोरे जातात. हे लोक नावलौकिक आणि संपत्ती यांच्या मागे धावत नाहीत. हे लोक म्हणजे शोभेची वस्तू नाही. हे लोक कणखर असतात. • तकलादू नसतात. • यांच्या व्यक्तिमत्वाची प्रसन्न अनुभूती पूर्णपणे शब्दात वर्णन करणं अशक्य असतं. • हे लोक विनयशील असतात. पण, अगतिक वा दीनवाणे नसतात. हे लोक उच्च अभिरुचीचे असतात. छचोर वा उच्छृंखल नसतात. हे म्हणजे मूर्तिमंत स्वयंशिस्त आणि सौजन्य असे लोक स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर असतात. हे लोक विजयातही नम्र असतात आणि पराभवातही अविचल व धीरगंभीर असतात.

चांगल चारित्र्य म्हणजेच यश असतं. मुलांनो वरील वैशिष्टये अंगी जोपासा व उत्तम चारित्र्यसंपन्न व्हा.

दिनविशेष 

भारताचे माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा स्मृतिदिन १९८० : गिरींचा जन्म १० ऑगस्ट १८९४ रोजी झाला. ते शाळेत | शिकत असतानाच ना. गोखले यांनी राष्ट्रीय निधीची व लो. टिळकांनी पैसा फंडाची योजना सुरु केली होती. या कार्यात छोट्या गिरीने हिरिरीने भाग घेऊन मदत मिळवून दिली. आपल्या मुलाने नामांकित वकील व्हावे म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना आयर्लंडमधील डब्लिन विद्यापीठात बॅरिस्टर होण्यासाठी धाडले. चुकूनही मांसाहार करणार नाही.' हे आईला दिलेले वचन त्यांनी निग्रहाने पाळले. आयर्लंड हा देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपड करीत होता. तेथील तरुण सशस्त्र उठावाच्या हालचाली करीत होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर भारतात सुध्दा सशस्त्र उठाव झाला पाहिजे, हे जाणून भारतीय तरुणांनी आयर्लंडमध्ये गुप्त संघटना उभारली. यात गिरी क्रियाशील कार्यकर्ते होते. बॅरिस्टर होऊन गिरी भारतात परत आले पण त्यांनी फक्त पाचच वर्षे वकिली केली. गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकाराच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. स्वातंत्र्यानंतर निरनिराळ्या घटक राज्यात | मिळून ११ वर्षे ते राज्यपाल होते. १९६७ साली उपराष्ट्रपती पदावर त्यांची निवड झाली. तर १९६९ साली ते राष्ट्रपती झाले. २४ जून १९८० रोजी ते त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 

मूल्ये 

स्वाधीनता, समता, बंधुता, निर्भयता. 

अन्य घटना 

राणी दुर्गावतीचे बलिदान १५६४ 

उपक्रम 

भारताच्या राष्ट्रपतींची नावे व त्यांचा कार्यकाल लिहिलेले तक्ते तयार करा.


 समूहगान ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का... 

सामान्यज्ञान

 भारतातील साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 'ज्ञानपीठ पुरस्कार' होय. • १९८४ पासून मध्यप्रदेश सरकारने सुगम संगीतासाठी 'लता मंगेशकर' पुरस्कार सुरू केला. भारत सरकारतर्फे दरवर्षी प्रत्येक खेळातील उत्कृष्ट खेळाडूस 'अर्जुन पुरस्कार' दिला जातो.

Tuesday, 22 June 2021

June 22, 2021

23 जून संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

             दैनंदिन शालेय परिपाठ


सुविचार
*केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे'
● जाती धर्माच्या भिंती ओलांडून पलीकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य फक्त कलेत व दृढनिश्चियात आहे.
श्लोक
यदा यदा हि धर्मस्य हानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सूनाम्यहम् ॥ श्रीभगवद्गीता 
जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा हात होतो. आणि अधर्माचे वर्चस्व होते त्या वेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होती.


चिंतन
कला म्हणजे परमेश्वराचे मंदिर आहे. जग निसर्गाने घडपिले विज्ञानाने जगाला प्रगती दिली तर कलेने त्याला सौंदर्य दिले. प्रसन्नता दिली. कांच्या अधिकारने आपले नेहमीचं जीवन देखील रम्य भासू लागते. जेवताना सनईचे गोड स्वर कानी पडले. झोपताना अंगाईचे सूर ऐकू आले आणि पहाटे भूपाळीच्या गोड शब्द डोळे उपडले तर कुणाला प्रसन्न वाटणार नाही? साध्या शब्दातून सांगायचे ते कवितेतून सांगितले तर ते हृदयात पोहोचते आणि त्याला सुरांची जोड दिली तर हृदयात रुजते. कप अशी माणसाला प्रसन्नतेथे वरदान देते.

कथाकथन
दृढनश्चयी धुव्रबाळ
फार पूर्वी उत्तानपाद नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला दोन राण्या होत्या एक होती आवडती तिथे नाव होते सुरुची नि दुसरी होती नावडती, तिथे नाव सुनीती सुरुचीच्या मुलाचे नाव उत्तम व सुनीतीच्या मुलाचे नाव ध्रुव असे होते सुरुची राजवाड्यात राहत असे पण सुनीतीला मात्र दूर राहावे लागे. एके दिवशी काही मुलांबरोबर व खेळत असता इतर मुलांनी त्याला तुझ्या वडीलांचे नाव काय, असे विचारले. वाला काहीच माहित नकते. म्हणून तो धावत आईकडे आता व म्हणाला. आई, माझे बाचा कोण? ते कुठे आहेत? ध्रुवाचे हे बोलणे ऐकून त्याची आई म्हणाली, बाळ, उत्तानपाद राजे हे तुझे वडील आईचे बोलणे ऐकताच याला खूप आनंद झाला व आई नको म्हणत असताना तो राजवाडयात धावत आला. उत्तानपाद राजा तेव्हा सिंहासनावर बसला होता. पुबबाळाला पाहून राजाने चटकन त्याला उचलून घेतले व आपल्या मांडीवर बसविले नि तो प्रेमाने कुरवाळू लागला. इतक्यात सुरुची तेथे आली. राजाने याला मांडीवर बसविले हे तिला आवडले नाही. ती रागाने म्हणाली महाराज माझ्या उत्तमऐवजी पोराला काय म्हणून मांडीवर बसविले? त्याला खाली उतरवा. राजाने तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता तो धुवाशी गोड गोड बोलण्यात दंग होता. राजा ऐकत नाहीसे पाहून सुरुची अधिकच रागावली व तिने वाला राजाच्या मांडीवरून खाली ढकलून दिले. छुपाला फार वाईट वाटले नि तो रडत रडत आपल्या आईकडे आला व म्हणाला, आई, असे का झाले? सुनीतीने ध्रुवाची समजूत घातली. ती म्हणाली, "बाळ, आपण मनापासून देवाची भक्ती केली म्हणजे आपल्याला हवे से मिळेल यावर व म्हणला, 'आई, तो देव आहे तरी कुठे सुनीती म्हणाली, बाळ, देव खूप लांब अरण्यात असतो. "आईचे बोलणे संपते न संपते तोच ध्रुव आईला म्हणाला, आई, तर मग भी अरण्यात जाऊन त्या देवाला भेटतो आई म्हणाली, बाळ तू अजून लहान आहेस. अरण्यात वाघ, सिंह असतात. ते तुला त्रास देतील. तू आताच मला सोडून जाऊ नकोस ध्रुवाने निश्चयाने सांगितले. आई, आता मी देवाला भेटल्याशिवाय परत येणार नाही तू माझी काळजी करू नकोस. लागलीच ध्रुव निघाला. तो खूप लांब अरण्यात शिरला नि एका झन्याच्या काठी असलेल्या झाडाखाली बसला. इतक्यात नारदमुनी आले. या लहानग्या मुलाला अरण्यात पाहून त्यांना नवल वाटले. ते वाला म्हणाले. बाळ, तू एकटा या अरण्यात कशाला आलास म्हणाला मला देवाला भेटायचे आहे. म्हणून मी देवाची प्रार्थना करण्यासाठी येथे आलो आहे नारदमुनीनी देवाची प्रार्थना करण्यासाठी ध्रुवाला एक मंत्र सांगितला व ते निघून गेले. ध्रुवाने खूप वर्षे त्या मंत्राचा जप केला, त्याचा दृढ निश्चय नि भक्ती पाहून श्री विष्णुदेव त्यात प्रसन्न झाले नि म्हणाले, बाळ, तुला काय हवे ते माग, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे व बोलला, 'देवा, माझ्या आईला सुखी कर नि मला जेथून कोणी ढकलणार नाही अशी जागा दे तथास्तु' पुढे ध्रुवाने पुष्कळ वर्षे राज्य केले व शेवटी देवाने दिलेल्या जागी तो गेला. मुलांनो, आकाशात उत्तरेकडे जो तारा नेहमी एकाच जागी दिसतो तो ध्रुवतारा म्हणून ओळखला जातो. तोच आपत्ता ध्रुवबाळ, बरं का!

दिनविशेष
भारतीय नभोवाणीची प्रथम सतकारी १९२७ : २३ जून १९२७ रोजी संध्याकाळी ६ वा. भारतीय नभोवाणी मुंबईहून अधिकृतपणे घुमली. याआधी २ वर्षापूर्वीपासून फक्त मुंबई शहराच्या कक्षेत कानाला यंत्र लावूनच कार्यक्रम ऐकू येत. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचाच समावेश कार्यक्रमात असे. ही नभोवाणी खासगी कंपनीच्या मालकीची होती. याच काळात पाश्चिमात्य देशातून रेडिओचा प्रसार झपाट्याने होत होता. हिंदुस्थानी लोकांकडून आपला फायदा होईल, अशा रितीने रंजन, शिक्षण देण्यासाठी रेडिओचे माध्यम उत्तम आहे. याची जाणीव तेव्हा ब्रिटिश राजसत्तेला झाली व त्यानी इंडिया कॅलेंडर केबल्स' ही खासगी कंपनी ताब्यात घेऊन 'इंडियन ब्रॉडकॉस्टिंग' या नावाने २३ जून १९२७ पासून हा सरकारी उद्योग म्हणून चालू केला. लॉर्ड आयर्विन यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व नंतर सुप्रसिध्द गायक फैयाझखाँचे संगीत मुंबईकरांना ऐकायला मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात नभोवाणीचा विकास झपाट्याने झाला. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, जळगाव, परभणी आणि रत्नागिरी अशी नभोवाणी केंद्रे चालविली जात आहेत.

मूल्ये 

*कर्तव्यदक्षता, समता, निसर्गप्रेम. →

अन्य घटना

• प्लासीची लढाई झाली व बंगालचा नवाब सिराजउद्दौला याचा पराभव होऊन ब्रिटिश सत्तेची मुहूर्तमेढ रोवली गेली १७५७ • नानासाहेब पेशवे (बाळाजी बाजीराव) स्मृतिदिन १७६१ राष्ट्रमाता इंदिरा गांधींचे सुपुत्र व युवा नेते संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन १९८० • काँग्रेसचे जेष्ठ नेते व मुंबईचे माजी महापीर स.का. पाटील यांचे निधन १९८१

उपक्रम• 

शाळेत एक शालेय नभोवाणी मंडळ स्थापन करा व दर आठवड्याला त्याचा कार्यक्रम करा. यात मागील आठवड्यातल्या बातम्या, एखादी मजेदार, आश्चर्यकारक माहिती व चांगली कामे केलेल्यांची मुलाखत सादर करा.

समूहगान राष्ट्र की जय चेतना का गान बंदे मातरम्.....

सामान्यज्ञान -
. • अरुडेल रुक्मिणी देवी प्रसिद्ध नृत्य कलाकार
• नितीन बोस प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक  • नंदलाल बोस प्रसिध्द शिल्प कलाकार
• लता मंगेशकर सर्वश्रेष्ठ गायिका