सुविचार - • इतिहास घडवणारी माणसे थोर मनाची, उदात्त अंतःकरणाची व खंबीर मनगटाची असतात. ● Where there is a will there is a way (इच्छा तेथे मार्ग)
कथाकथन- 'राजे शिवाजी - (जन्म- वैशाख शुध्द द्वितीया शके १५४९ (१९ फेब्रुवारी १६३०) - मृत्यू - ३ एप्रिल १६८०, दुपारचे बारा): ज्यांचे ज्यांचे या भारतावर व भारतीय संस्कृतीवर प्रेम आहे, अशा व स्फूर्तिस्थान असलेल्या छत्रपती शिवरायांची आज तारखेप्रमाणे जयंती आहे. जवळ जवळ साडेतीनशे वर्षांच्या त्या काळ्याकुट्ट कालखंडात धर्मवेड्या अशा परधर्मीय राज्यकर्त्यांनी व त्यांच्या हस्तकांनी इथल्या जनतेवर केलेल्या अत्याचारांची ती भयानक चित्र मनःचक्षूसमोरून सरकू लागली की, आजही अंगावर काटा उभा राहतो. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मोगलशाही, गोव्याची पोर्तुगीजशाही आणि जंजिऱ्याची सिद्दिशाही अशा चार-पाच जुलमी राजवटीखाली एकदर जनता चिरडली-भरडली जात होती. देवळे पाडली जात होती, मूर्ती फोडल्या जात होत्या, बाटवाबाटवी शिगेला पोहोचली होती. लोकांची लुटालूट करून गावेच्या गावे बेचिराख केली जात होती आणि स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांना तर सीमाच उरली नव्हती. पण आपल्या धर्माच्या व संस्कृतीच्या बंधु-भगिनींवर असे पाशवी अत्याचार चालू असतांनाही त्या वेळचे शूर, बुद्धिमान पण स्वत्व हरवून बसलेले बरेचसे मराठे त्या शाह्यांच्या सरदारक्या स्वीकारण्यात व त्यांची राज्ये दृढमूल करण्यात भूषण मानीत होते. याला एकच ज्वलंत अपवाद निघाला तो म्हणजे शिवनेरीवर जिजामातेच्या उदरी सन १६३० शके १५४९ मध्ये जन्माला आलेला शिवबा ! या शिवबाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन, त्याच्या साक्षीने आपल्या सवंगड्यांना सांगितले. यापुढे हे अत्याचार कायमचे थांबविण्यासाठी स्वराज्य स्थापन केले पाहिजे तेव्हा स्वराज्य स्थापनेसाठी यापुढे आपण जिवाच रान केलं पाहिजे.' शिवरायांचा हा तेजस्वी संदेश ऐकून त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगात वीरश्रीचे वारे संचारले. म्हणूनच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणागड घेतला आणि त्यानंतर शत्रूचे गडामागून गड व प्रदेशामागून प्रदेश जिंकून, त्यांनी स्वराज्याचा केवढातरी विस्तार केला. या झंझावाती वीराला मारण्यासाठी पैजेचा विडा उचलून विजापूरहून आलेला अवाढव्य अफझलखान हाच त्या वीराच्या बिचव्याला बळी पडला. मोगलातर्फे पुण्यास आलेला शाहिस्तेखान एका हाताची बोटे गमावून दिल्लीस परत गेला आणि कपटी औरंगजेबाने या वीरश्रेष्ठला बोलावून घेऊन आग्य्रास नजरकैदेत ठेवले असता, हा युक्तिबाज वीर आपल्या मुलासह मिठाईच्या पेटाऱ्यांतून पसार झाला. महाराजांच्या अंगी धाडस, चातुर्य, शौर्य, मुत्सद्देगिरी, गरिबांविषयी कणव, धर्मनिष्ठा, परधर्माच्या बाबतीत सहिष्णुता, मातृ पितृभक्ती, संतांविषयी आदर, अन्यायाची चीड असे सर्वच सद्गुण त्यांच्यात होते.
→ दिनविशेष -
• गोपाळ कृष्ण गोखले स्मृतिदिन - १९९५ : गोपाळ कृष्ण गोखल्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कातलक या गावी एका गरीब कुटुंबात झाला. बी.ए. झाल्यावर सरकारी नोकरी न स्वीकारता त्यांनी देशसेवेचे व्रत घेतले व फर्ग्युसन महाविद्यालयात ते प्राध्यापक झाले. सुधारक या पत्राचे ते संपादक झाले. १९०५ साली वाराणसी येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९०६ मध्ये पुणे येथे भारत सेवक समाजाची त्यांनी स्थापना केली. लोकशिक्षणाच्या मार्गाने समाजजागृती करण्याचा व राजकीय सुधारणांसाठी सतत प्रयत्न करून | मिळणाऱ्या सवलतींचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ते न्या. रानडे यांना गुरू मानत. म. गांधी, नामदार गोखले यांनाही गुरू मानत. ते जसे धोर राजकारणी व व्यासंगी वक्ते होते, तसेच ते थोर समाजसुधारकही होते. अस्पृश्यता व जातिव्यवस्था या समूळ नाहीशा व्हाव्यात यासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केले. स्त्रीस्वातंत्र्य व स्त्री शिक्षण याचा त्यांनी हिरिरीने पाठपुरावा केला. प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळावे व ते मोफत असावे हा विचार त्यांनी मांडला. सरकार व लोक या दोघांनीही प्रशंसा करावी असे गोखले यांचे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.
→ मूल्ये - • शुचिता, समता, स्वाधीनता.
→ अन्य घटना - • गोळवलकर गुरुजी यांचा नागपूर येथे जन्म १९०६ • आचार्य नरेंद्र देव यांचा मृत्यू - १९५६. • गणितज्ज्ञ, केशव लक्ष्मण दप्तरी यांचा मृत्यू - १९५६. • प्रसिद्ध गायक पंकज मलिक यांचे निधन-१९७३.
→ उपक्रम • ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिक्षणविषयक विचार संकलित करणे व दैनंदिन परिपाठात
सामान्यज्ञान
महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले
१. पुणे - सिंहगड, पुरंदर, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रचंडगड.
२. रायगड - रायगड, मुरूड-जंजिरा, कर्नाळा, कुलाबा, लिंगाणा, द्रोणागिरी.
३. कोल्हापूर - पन्हाळगड, विशाळगड, भुदरगड, गगनगड.
४. सातारा -प्रतापगड, मकरंदगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, वसंतगड.
५. औरंगाबाद - दौलताबाद - देवगिरी किल्ला
६. नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, अलंग-कुलंग, मार्किडा, अंकाई-टंकाई.
७. सिंधुदुर्ग-सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड, यशवंतगड, पद्मगड.
८. ठाणे -वसई, अर्नाळा, भैरवगड, गोरखगड, माहुली.
No comments:
Post a Comment