Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा
Showing posts with label प्रार्थना. Show all posts
Showing posts with label प्रार्थना. Show all posts

Thursday, 27 May 2021

May 27, 2021

सर्वात्मका शिवसुंदरा

          सर्वात्मका शिवसुंदरा



 सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना । तिमिरातूनी तेजाकडे प्रभू, आमुच्या ने जीवना ||धृ०॥ सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू, सद्धर्म जे जगतामध्ये, सर्वांत त्या वसतोस तू, चोहीकडे रूपे तुझी, जाणीव ही माझ्या मना तिमिरातूनी ॥१॥ 

श्रमतोस तू शेतांमध्ये, तू राबसी श्रमिकांसवे, जे रंजले वा गांजले, पुसतोस त्यांची आसवे, स्वार्थाविना सेवा जिथे, तिथे तुझे पद पावना तिमिरातूनी ॥२॥ 

न्यायार्थ जे लढती रणी, तलवार तू त्यांच्या करी, ध्येयार्थ जे तमि चालती, तू दीप त्यांच्या अंतरी, ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्यांची साधना तिमिरातूनी ॥३॥

 करुणाकरा करुणा तुझी, असता मला भय कोठले ? मार्गावरी पुढती सदा, पाहीन मी तव पाऊले । सृनत्व या हृदयामध्ये, नित जागवी भीति विना ॥४॥ - कुसुमाग्रज

May 27, 2021

असो तुला देवा माझा नमस्कार

 असो तुला देवा माझा, सदा नमस्कार ! 

           

         असो तुला देवा माझा सदा नमस्कार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार ॥धृ०॥

 तुझ्या कृपेने रे होतिल, फुले पत्थराची तुझ्या कृपेने रे होतिल, मोति मृत्तिकेची तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार ॥१॥ 

तुझ्या कृपेने रे होई उषा त्या निशेची तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधु पार ॥२॥

 तुझ्या कृपासिंधूमधला बिंदु जरि मिळेल तरी प्रभो शतजन्माची मम तृषा शमेल तुझा म्हणूनि आलो देवा बघत बघत दार ॥३॥ 

• साने गुरुजी

May 27, 2021

इतनी शक्ति हमें देना दाता

      इतनी शक्ति हमें देना दाता 



इतनी शक्ति हमें देना दाता मनका विश्वास कमजोर होना हम चले नेक रस्ते पे हम से भूलकर भी कोई भूल हो ना ॥ धृ०॥ 

बैर होना किसीका किसी से दूर अज्ञान के हो अंधेरे तु हमें तुम ज्ञान की रोशनी दे हर बुराई से बचते रहे हम जितनी भी दे भली जिंदगी दे. भावना मन में बदले की हो ना हम चले नेक रस्ते पे हमसे भूलकर भी कोई भुल हो ना ॥१॥ 

हम ना सोचे हमें क्या मिला है। हम ये सोचें किया क्या है अर्पण फूल खुशियों के बाँटे सभी को सब का जीवन ही बन जाये मधुबन अपनी करुणा का जल तु बहाके कर दे पावन हर एक मन का कोना चले नेक रस्ते  पे हमसे भूलकर भी कोई भूल हो ना ॥२॥ 

-आभिलाष

May 27, 2021

खरा तो एकचि धर्म

            खरा तो एकचि धर्म 



खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ॥ धृ.॥ जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित तयां जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥१॥ सदा जे आर्त अति विकळ, जयांना गांजनी सकळ तयां जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥२॥ कुणा ना व्यर्थ हिणवावे, कुणा ना व्यर्थ शिणवावे, समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ॥३॥ प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी, कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ॥४॥ असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥५॥ साने गुरुजी

May 27, 2021

जय भारता (गीत)

                    जय भारता



 जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता ॥धृ.॥ जय लोकनायक थोर ते, जय क्रांतिकारक वीर ते जय भक्त रणधीर ते, जय आमुची स्वाधीनता जय भारता, जय भारता जय... ॥१॥ तेजोनिधी हे भास्करा, प्रिय पर्वता, प्रिय सागरा, तरुवृक्ष हो हे अंबरा, परते पहा परतंत्रता जय भारता, जय भारता जय ॥२॥ 

बलिदान जे राणि जाहले, यज्ञात जे धन अर्पिले, शतकात जे हृदयी फुले, उदयाचली हो सांगता जय भारता, जय भारता जय ... .॥३॥ 

ध्वजनील मंडळ जो उभा, गतकाल हा वितरी प्रभा भवितव्य हो उजळी नभा, दलितांस दाविल तारता, जय भारता, जय भारता, जय... ॥४॥

 - कुसुमाग्रज

May 27, 2021

पसायदान

                   पसायदान 



 'आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥ १ ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तथा सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ २ ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥ वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । "अनवरत भूमंडळी भेटतु भूतां ॥ ४ ॥ चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गांव । बोलते ते अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥ चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥ किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनी तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरूखीं । अखंडित ॥ आणि ग्रंथोपजीविये। विशेषीं लोकी इये । दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ॥ येथं म्हणे श्री विश्वेश्वराओ । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥

-संत ज्ञानेश्वर