दैनंदिन शालेय परिपाठ
→ श्लोक
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। कोटी कोटी सूर्याचे तेज असलेल्या महाकाय आणि वक्रतुण्ड श्री गणेशा, सर्व कार्यामध्ये मला निर्विघ्न कर (कसलीही विघ्ने-संकटे बार: येऊ देऊ नकोस.)
→ चिंतन
जो संपन्नावस्थेत तसेच बिपन्नावस्थेत दोन्ही वेळी पूर्णपणे साथ देतो व सारखाच प्रतिकार करतो, तो मित्र समजावा आर्य चाणक्य मित्राची एक चांगली व्याख्या आपल्याला वरील वाक्यात मिळते. एखाद्या व्यक्तीच्या ऊर्जितावस्थेत, चांगल्या परिस्थितीत सगळेजण त्याच्याशी चांगले वागतात; पण परिस्थितीमुळे जर त्याला वाईट दिवस आले तर लोक त्याला सोडून जातात. अशांना कोणी मित्र म्हणत नाहीत. संकटकाळात, विपन्नावस्थेत जो मदत करतो, साथ देतो. तसेच जर चूक असेल तर तोंडावर चूक म्हणून सांगतो तोच खरा मित्र होय. 'व्यसने (संकटे) मित्रपरीक्षा, हे लक्षात ठेवले पाहिजे.
→ कथाकथन - वि. का. राजवाडे' : महाराष्ट्रातील विख्यात इतिहास संशोधक इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म कोकणात वरसई गावी १२ जुलै १८६४ साली झाला. बी. ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले, तरुणपणातच पत्नीचे निधन झाल्यामुळे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. ज्ञानसाधना, संशोधन करण्यात त्यांनी आपले सारे आयुष्य खर्च केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. यानंतर राजवाडे इतिहास संशोधनाकडे | वळले. पानिपतविषयक अनेक जुनी कागदपत्रे त्यांना वाई येथे सापडली. इंग्रज लेखकांनी लिहिलेली पुस्तके किंवा बखरी या वर विश्वास ठेवण्यापेक्षा अस्सल || कागदपत्रे शोधण्यास फार महत्त्व आहे, असे राजवाड्यांचे मत होते. अशा जुन्या कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी राजवाडे गावोगावी भटकत राहिले. जुन्या लोकांच्या घरी जुने ऐतिहासिक कागद असत. ते अगदी जीर्णशीर्ण झालेले, फाटलेले वाळवी लागलेले, वाचता न येणारे असत. राजवाडे यांनी अपार कष्ट करून असे हजारो कागदपत्र जमा केले. त्यासाठी त्यांना पदरमोडही करावी लागली. १८९६ ते १९२६ अशी तीस वर्षे राजवाड्यांनी महाराष्ट्राचा इतिहास व मराठी भाषा यांच्या संशोधनात व लेखनात खर्च केली. 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' नावाचे बावीस खंड प्रसिद्ध केले. प्रत्येक खंडाला राजवाड्यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. यातून त्यांचे इतिहास संशोधनाबद्दलचे प्रेम, तीव्र जिज्ञासा दिसून येते. राजवाड्यांना इंग्रजी भाषा उत्तम येत होती, पण त्यांनी आपले सर्व लेखन मराठी भाषेतच केले आहे. यावरून त्यांचा मराठी भाषेचा अभिमान दिसून येतो. राजवाड्यांनी एकनावपूर्व ज्ञानेश्वरीचा शोध लावला व ती छापून प्रसिद्ध केली. इतिहास संशोधनाला व्यवस्थित रूप यावे, यासाठी त्यांनी १९१० मध्ये पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ नावाची संस्था काढली. राजवाडे यांना भारत, महाराष्ट्र व मराठी भाषा यांचा अतिशय अभिमान होता भारतीयांनी जुनी देवभोळी वृत्ती सोडून विज्ञानाची कास धरावी, असा त्यांचा आग्रह होता. अशा या धोर इतिहासाचार्याचे ३० डिसेंबर १९२६ रोजी धुळ्यात निधन झाले.
सुविचार
'भाव, भाषा आणि जीवन यांचा नीट मेळ म्हणजेच शिक्षण रविंद्रनाथ टागोर
• जुना इतिहास घोकण्यापेक्षा, नवा इतिहास निर्माण करणे गरजेचे आहे. सामर्थ्य हा मनुष्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे. प्रेमचंद
→ दिनविशेष
भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना १९१० पुणे: इतिहासाचार्य राजवाडे आणि सरदार तात्यासाहेब मेहेंदळे या दोघांनी | इतिहास संशोधनास दिशा आणि प्रेरणा मिळण्याच्या हेतूने भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. पुढच्या काळात मंडळाने चांगले बाळसे धरले. आजपर्यंतच्या काळात भारत आणि महाराष्ट्र यांच्या इतिहास आणि संस्कृतीविषयक सर्वांगीण आविष्कारासाठी सामग्री जमा करणे, तिचा अभ्यास करणे, त्याचे प्रकाशन करणे हे कार्य अखंडित निष्ठेने चालू आहे. अनेक अभ्यासू निष्ठावंतांनी तळमळीने हे काम चालू ठेवले आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी अनुदान देऊन या कार्यास हातभार लावला आहे. मंडळाचे सुसज्ज ग्रंथालय, पुरातन वस्तूंचे संग्रहालय, अभ्यासेच्यूंची स्वतंत्र सोय इत्यादी मुळे मंडळाला मोठीच कीर्ती लाभली आहे. मंडळाची आजवर प्रसिद्ध झालेली शंभराहूनही अधिक प्रकाशने अव्वल दर्जाची आहेत.
→ मूल्ये
अभ्यासूवृत्ती, चिकाटी, दृढनिश्चय
→ अन्य घटना
दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिश पार्लमेंटची निवडणूक जिंकली- १८९२
→ उपक्रम भारत इतिहास संशोधन मंडळाच्या कामाबद्दल माहिती सांगावी. तुम्हाला आवडणाऱ्या खेळाबद्दलची माहिती गोळा करा.
→समूहगान
धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं....
→ सामान्यज्ञान
आपले प्राचीन ग्रंथ व त्यांचे लेखक • रामायण वाल्मिकी ● अष्टाध्यायी पाणिनी • पंचसिद्धांतिका वराहमिहिर अर्वाचीन काळातील प्रमुख संत • श्री दासगणू महाराज • महाभारत व्यास • ब्रह्मसूत्र शंकराचार्य • ब्रह्मस्फुटसिद्धांत ब्रह्मगुप्त ● श्री तुकडोजी महाराज • श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी श्रीचक्रधरस्वामी ● श्री गोंदवलेकर महाराज गुलाबराव महाराज ● कौटिलीय अर्थशास्त्र आर्य चाणक्य आर्यभटीय आर्यभट पहिले ● स्वामी स्वरूपानंद • संत गाडगे महाराज, • गजानन महाराज
No comments:
Post a Comment