दैनंदिन शालेय परिपाठ
सुविचार
संत महात्म्यांनी समाजपरिवर्तनाचे महान कार्य केले आहे.
• मनातील विचारांचा सुंदर आविष्कार म्हणजे काव्य.
• जो माणूस स्वतःसाठी जगतो तो लहान, जो दुसऱ्यांसाठी जगतो तो महान, वेळ ही आपल्याला मिळालेली अत्युच्च देणगी आहे.
श्लोक
तम्हा अम्मत तथा मोतूर्ण राय दोस वा मोहे। झापड णिय अप्पाण जइ इच्छह सायं सोक्ख जर शाश्वत सुखाची इच्छा नसेल तर राग, द्वेष, मोहादी सर्व विकार भाव सोडून निजशुद्धी आत्म्याचे ज्ञान करण्याचा सदैव अभ्यास कर जैन तत्वातून
→ चिंतन
पक्षपातीपणातून अनेक अडचणीचा उगम होतो. एकाशी अधिक स्नेह दाखविला आणि दुसऱ्याची उपेक्षा केली, तर भावी वाईट प्रसंगाचे आपण - बीजारोपण करीत आहोत हे लक्षात ठेवावे. खरे कार्य करण्यासाठी कार्यामध्ये खरोखर यशस्वी होण्यासाठी निःपक्षपातीपणे काम करणे हे न्यायाचे आहे स्वामी विवेकानंद.
कथाकथन
संत नामदेव'
शके १२७२ च्या आषाढ वद्य १३ या दिवशी पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीचा प्रसार करणारे प्रसिद्ध भगवद्भक्त श्री हे समाधिस्य झाले. तेराव्या शतकामध्ये महाराष्ट्रात भक्तीचा जो डांगोरा पिटला जात होता त्याचे बरेचसे श्रेय नामदेवाकडे आहे. नगर जिल्ह्यातील नेवासे गावी याच काळी ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी अवतरली होती. पांडुरंगाचा निस्सिम सद्गुणभक्त नामदेव नामदेव यांच्यासह आपण तीर्थयात्रा करावी. अशी प्रेरणा ज्ञानदेवांना झाली आणि 'तुझिये संगतीचे नित्य सुख घ्यावे सार्थक करावे संसाराचे॥ असे नामदेवांना विनवून ज्ञानदेवादी मंडळींनी उत्तर हिंदुस्थानची तीर्थयात्रा पूर्ण केली. भागवत धर्माचा प्रसार साऱ्या भारतात झाला; परंतु नामदेवाची थोरवी आणखी एका दृष्टीने मोठी आहे. ज्ञानदेवादी | भावंडाचे प्रयाण झाल्यावर नामदेव काहीसे उदास झाले. उत्तरेस म्लेच्छ राज्य होऊन धर्माचा व्हास होत होता. ते पाहून नामदेव पाचपन्नास वारकऱ्यांसहित परत उत्तरेत गेले. पंजाबपर्यंत त्यांनी विठ्ठलभक्ती पोचविली | हिंदी भाषेत कवने केली. त्या पैकी काही शीखांच्या ग्रंथसाहेबा त संग्रहित केलेली आहेत. पंजाबात गुरुदासपूर जिल्ह्यात 'घोमान' गावी नामदेवांच्या पादुकांची पूजा आज सहाशे वर्ष चालू आहे. बाबा नामदेवायी म्हणून त्याच्या अनुयायांना नामाभिधानही प्राप्त झाले. जुनागडचे नरसी मेहता आणि शीख पंथाचे प्रवर्तक नानक यांनी नामदेवांच्या भक्तीची आणि अभंगवाणीची प्रशंसा केली आहे. आजही पंजाबात या नामदेवांचे अनुयायी हजारोंनी दिसतात. तेव्हा तेराव्या शतकातील 'भोळ्याभाबड्या वारकरी संताची ही कामगिरी अपूर्व आहे. नामदेवांचे पूर्वज यदूशेट हे शिंपी जातीतील होते. यांच्यापासून पाचवा पुरुष दामाशेटी यांच्या बायकोचे नाम गोणाई. याच दांपत्यास शके ११९२ मध्ये जे पुत्ररत्न झाले तेच प्रसिद्ध नामदेव होत. बालपणापासून नामदेव विठ्ठलभक्तीत रंगून गेले. याच दिवशी मराठी वाङ्मयात प्रसिद्ध असलेली 'नामयाची दासी जनी' हिनेसुद्धा समाधी घेतली.
→ दिनविशेष
● भारतात कायदेशिक्षणाचा प्रारंभ १८५५ : भारतात इंग्रजी राजवट स्थिरावू लागल्यानंतर इंग्रजी उच्च शिक्षण भारतीय नागरिकांना ||मिळण्याची निकड भासू लागली. बॅ. ऑस्किन पेरी हे भारतीयांबद्दल जिव्हाळा बाळगणारे चोख न्यायाधीश १८५३ मध्ये निवृत्त झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ॐ मुंबईकर नागरिकांनी २५००० रुपयांचा निधी जमवून कायद्याचे अध्यासन सुरू करण्याचे ठरविले. या अध्यासनास 'पेरी प्रोफेसरशिप ऑफ ज्युरिनुइन्स' असे नाव दिले. हा निधी ५०,००० रु. पर्यंत गेला. त्यात सरकारने भर टाकून पुढे बॅ. रोड हे कायदेतज्ज्ञ ३०० रु. द. म. पगारावर प्राध्यापक नेमले. ३ जुलै १८५५ ला संध्याकाळी एलफिन्स्टन कॉलेजात बॅ. रोड या कायदेतज्ज्ञांच्या व्याख्यानाने प्रत्यक्ष वर्गास प्रारंभ झाला. या वर्गास १०० विद्यार्थी हजर होते. बॅ. रीड यांच्या अध्यापन कौशल्याने व प्रभुत्वाने वर्ग अत्यंत लोकप्रिय झाला. पुढे १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली व १४ एप्रिल १८६० ||पासून अधिकृत वकिलीची सनद विद्यार्थ्यांना मिळाली. भारतात अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम होता कायद्याचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक | कायदेतज्ज्ञांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिले.
- मूल्ये
• श्रद्धा, मानवता.
→ अन्य घटना
• संत नामदेव समाधीदिन १३५० • राणोजी शिंदे स्मृतीदिन १७४५ • महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली १८५२ • जोशुआ स्लोक्रम या खलाशाने एकट्याने जहाजातून ११६६ दिवसात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली १८९८
→ उपक्रम
• नामदेवांचे चरित्र मुलांना वाचायला सांगावे. ज्ञानेश्वरांचे 'पसायदान' पाठ करायला शिकवावे.
→ समूहगान
• बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो....
→ सामान्यज्ञान
• शिखांच्या प्रत्येक सणातील धार्मिक भाग सर्वसाधारणपणे सारखाच असतो. सणाच्या पूर्वी ४८ तासांपासून गुरुद्वारात किंवा अन्य सोयीच्या ठिकाणी 'ग्रंथसाहेबा'चे अखंड पठण होते. त्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन व कथा होते. समारंभाच्या अखेरीस 'गुरुका लंगर' म्हणजे मुक्त अन्नदान असते. वंश, पंथ, जात असा भेद न करता सर्व जण एकाच पंक्तीत बसतात. शिखांचे महत्त्वाचे सण म्हणजे गुरुनानक जयंती आणि बैसाखी हे
No comments:
Post a Comment