Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday, 4 July 2021

5 जुलै- संस्कारमोती, दैनंदिन शालेय परिपाठ

 





सुविचार
'जे सदैव कष्ट करतात, त्यांनाच भाग्य लाभते.
एखादे कार्य हाती घेतले तर आपण आपले अंतःकरण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे.
• जो माणूस सारखा कामात असेल, तोच नवीन कामांना सुरुवात करून ते पुरे करू शकतो..
● आळशी, दुर्बळ, गर्विष्ठ, लोकापवादाला भिणारे आणि नेहमी वाट पाहणारे दीपसूची, अशांना इष्टप्राप्ती होत नाही.

श्लोक
भुजंतो कम्म फलं कुणड्ण रायं दोसंच तो संज्यि विणासह अहिणायकम्पण बंधेई
जो जीव कर्माचे फळ भोगीत असताना सुध्दा रागही करीत नाही व देवही करीत नाही तो पूर्वसचित कर्माचा नाश करतो आणि नवीन कर्म बांधीत नाही.
चिंतन
गमावलेले धन थोडया काटकसरीने आणि परिश्रमाने मिळवू शकू विसरलेले ज्ञान पुनः अध्ययन केल्याने प्राप्त होईल गेलेले आरोग्य औषण आणि संयम यांच्या मदतीने मिठेठ, परंतु गमावलेली ही पुन्हा परत मिळविता येत नाही. जगात काळ ही गोष्ट अशी आहे की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा परतून तुमच्याकडे येत नाही. तुम्हाला ती मिळविता येत नाही हे काळाचे महत्व ओळखून माणसाने वागले पाहिजे काळाचा सदुपयोग पाहिजे. त्यासाठी नियोजन केले पाहिजे नियोजन केल्यामुळे योड्या काळातही अनेक गोष्टी करता येतात. धन, ज्ञान, आरोग्य या गोष्टी पलांनी पुन्हा मिळविता येतील. पण गेलेला काळा मात्र पुन्हा मिळविता येणार नाही.
कथाकथन
श्रमे लक्ष्मी: प्रतिष्ठिता
: सतत उद्योगी असणारा सुसंपन्न, सुशिक्षित असा एक शेतकरी होता त्याची तिन्ही मूर्ख आळशी आणि अविवेकी होती पानी केलेला उपदेश ती ऐकत नसत त्यामुळे तो नेहमी दुःखी, खिन्न आणि चिंताक्रांत असे. काही काळानंतर तो शेतकरी परण पावता वडिलोपार्जित मालमत्तेचा वाटा मिळावा या लोभाने मुलानी बडितांनी लिहून ठेवलेली यही उघडती. त्यामध्ये त्यांना हा लोक मिळाला खरोखर सावलीतूनच जावे (जाणे योग्य) त्याप्रमाणे सावलीत परत यावे. मिष्टान्नाचे सेवन करावे. तेव्हा लक्ष्मी मिळेल. तेव्हा वडिलानी उन्हात जाण्याचा निषेध केला. असे मानून त्या मुलांनी शेतात जाणे सोडून दिले. त्याचप्रमाणे साध्या जेवणाचा त्याग करून त्यांनी रोज मिष्टान्नाचे जेवण सुरू केले त्याच्या पा उपहासास्पद आवरणामुळे वडिलांनी मिळविलेले धन संपले आणि लवकरच दारिद्रय आले. त्यामुळे सर्व मुळे चिंतातूर झाली. एकदा वडिलांच्या वार्षिक श्राद्धाच्या वेळी मुलानी पुरोहिताला विचारले 'आपण आशीर्वाद दिला आहे की. लक्ष्मीवान का आमच्या वडिलांनीसुद्धा वहीत तेच लिहिले आहे; परंतु लक्ष्मी दिसतच नाही. जी होती तीसुद्धा गेली याबाबतीतचे कारण काय? कृपया आम्हाला सांगावे" पुरोहित म्हणाला. "वडिलांची वही दाखवा" मुलानी, रेशमी वस्त्रात गुंडाळलेली गंधमाला इत्यादींनी पूजिलेली ती यही पुरोहितासा समर्पित केली त्यानंतर ते जसे जसे वागले होते. ते सुद्धा सर्व त्यांनी सांगितले. वही वाचल्यानंतर पुरोहित उपहासाने म्हणाले, अरे मुलांनो, वडिलांनी तर योग्यतेच लिहिले आहे. परंतु अभिप्राय न जाणता केवळ शब्दश: अर्थ घेतल्यामुळे तुम्ही उलटच आचरण केले आहे. अशा केवळ पूजेने लक्ष्मी कशी मिळेल?" मग याचा अभिप्राय काय आहे?" असे मुलांनी आदराने विचारले पुरोहित म्हणाला 'सावलीतूनच जावे याचा अर्थ असा सूर्यादयापूर्वीच शेतात जावे तसेच येणे योग्य याचा अर्थ असा कि, 'सूर्यास्त झाल्यानंतरच परत यावे अशा प्रकारे भरपूर श्रम केल्यावर साधे अन्न सुध्दा स्वादिष्ट व गोड लागेल, असे आवरण जो करील तो धनवान होईल; यात थोडीही शंका नाही. दुसऱ्या वर्षी पुरोहिताच्या सांगण्यानुसार आपल्या बायकामुलांसह त्यांनी शेतात भरपूर श्रम केले चार महिन्यातच धान्यरूपाने लक्ष्मी आती गावकऱ्यांनी विचारल्यावर मुलांनी सांगितले. स्वतःच्या आळशीपणामुळे दारिद्रय आले, परंतु श्रमामुळे श्रीमंत झालो. खरोखरच लक्ष्मीने श्रमात निवास केला आहे.

दिनविशेष
आझाद हिंद सेनेची स्थापना १९४३ १९४२ च्या फेब्रुवारीत ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील सिंगापूरचे हिंदी सैन्य जपानला शरण गेले. या सैन्याच्या साहाय्याने हिंदुस्थानने ब्रिटिशांविरुध्द लढून स्वतंत्र व्हावे या गोष्टीस जपानने मान्यता दिली. १९४३ च्या जूनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस टोकियोला गेले. तिथे त्यांचे हिंदी आणि जपानी लोकांकडून प्रचंड स्वागत झाले. त्यांच्या संघटनकौशल्यामुळे, अलौकिक वक्तृत्वामुळे अनेक लोक सैन्यात दाखल झाले आणि नेताजींनी आझाद हिंद सेनेची ५ जुलै १९४३ ला स्थापना केली. सैनिकांचे स्वागत करताना ते म्हणाले, "ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडापासून भारताची सुटका करणारे हे सैन्य आहे. हिंदुस्तान स्वतंत्र झालेला पाहण्यासाठी आपणापैकी कोण जिवंत राहणार याला महत्व नाही. तो स्वतंत्र होणारच!" २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्ट्रप्रमुख झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदि अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली.
मूल्ये
जिद्द, चिकाटी, स्वातंत्र्यप्रेम, शौर्य,
अन्य घटना
जलसंपत्ती दिन मुंबई येथे हिंदू मिशनरी सोसायटी' या संस्थेची स्थापना १९१७ • राष्ट्रीय डाक तिकीट संग्रहालयाचे उद्घाटन १९६८ (नवी दिल्ली) • गिनिज बुकमध्ये नोंद झालेले बाबूराव अर्नाळकर यांचे निधन १९९६
उपक्रम
स्वातंत्र्य चळवळीतील सुभाषबाबूंशी संबंधित घटना गोष्टीरूपाने सांगाव्यात. • जलसंपत्तीचे महत्त्व सांगाये
समूहगान
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे....
सामान्यज्ञान
भूदलातील अधिकाऱ्यांचे हुद्दे सेकंड लेफ्टनंट लेफ्टनंट • कॅप्टन मेजर • लेफ्टनंट कर्नल • कर्नल • ब्रिगेडिअर मेजर जनरल • लेफ्टनंट जनरल जनरल

No comments:

Post a Comment