Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday, 3 July 2021

4 जुलै- संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

           दैनंदिन शालेय परिपाठ





सुविचार
आधी कामाला प्रारंभ करा, म्हणजे तुमच्यामधीत प्रचंड शक्तीया तुम्हाला प्रत्यय येईल. ● कोणत्याही उदात्त कल्पनेने किंवा उद्दिष्ट जाणे, हेच जीवनाचे सार आहे तेच जीवनातील अत्युत्तम क्षण असतात

श्लोक
णोकम्म हि ओ केवठणाणा गुणसमिठो तो सोह सिद्धो-सुडो णिचो एक्को निरालंबो ॥
जो शरीरादि कर्म, ज्ञानवर्णादि द्रव्यकर्म व राग-द्वेषादी भाव कर्माने रहित आहे. केवल ज्ञानादि अनंत गुणांनी समृद्ध आहे. शुद्ध सिद्ध एक व निरालंब आहे तोच मी आहे. जैन तत्वातून 


चिंतन
उठा जाने का नि ध्येयपूर्तीवाचून बांबू नका स्वामी विवेकानंद माणसाने आयुष्यातून कंटाळा आळस या शब्दांना पळवून लावले पाहिजे. आणि मोठ्या उत्साहाने, आनंदाने कामाला लागले पाहिजे स्वतःपुढे काही एक निश्चित ध्येय ठेवले पाहिजे आणि मग ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अविश्रांत श्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. भारतमातेला स्वतंत्र करण्याचे ध्येय अनेक तरुणांनी आपल्यासमोर ठेवले आणि त्यासाठी प्रसंगी आत्मबलिदानही केले. माणसाच्या आयुष्यात कोणतेच ध्येय नसेल, तर त्याचे आयुष्य म्हणजे दिशाहीन भटकणे होईल. तेव्हा आपल्या मनात ध्येय निश्चित करा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

कथाकथन
'स्वामी विवेकानंद'
: पाश्चात्त्व व पौर्वात्य राष्ट्रांत भारताच्या संस्कृतीची व विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा हिंदू धर्माची फडकविणारा, आध्यात्मिक नेता म्हणून जगभर विवेकानंदांचे नाव घेतले जाते. भारतात त्यांनी आपल्या बक्तृत्वाने भारताचे भवितव्य घडविणान्या युवा | पिढीतील अनेक नेत्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या साहित्यात तेज आहे, ओज आहे. मानवजातीच्या कल्याणाची मंगल भावना आहे. १८९० मध्ये त्यांनी सर्व | भारतभर प्रवास केला. लोकांचे दैन्य पाहिले, अस्मिता गमावलेली मुकेकंगाल जनता पाहिली आणि या समाजात जागृतीची ज्योत पेटविली. १८९३ च्या जागतिक धर्मपरिषदेतील भारतीय प्रतिनिधी म्हणून केलेले भाषण, वैदिक याङ्मयातील, उपनिषदांतील तत्त्वज्ञान व विश्वाबंधुत्ववादी धर्म | यांचे सांगोपांग विवेचन करणारे भाषण सान्याच धर्मवेत्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे ठरले. विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. अत्यंत बुद्धिमान असूनही त्यांचे लहानपण गरिबीत, उपासमारीत गेले. त्यांचा जन्म १८६२ साठी कलकत्ता येथे झाला. तेथे पदवीधर झाल्यानंतर अध्यात्माचा, वैराग्याचा महासागर श्रीरामकृष्ण परमहंसांची व त्यांची भेट झाली. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला. त्यांच्या जीवनाचे सोने झाले. त्यांची आनंदसाधना सुरू झाली. ६ ऑगस्ट १८८६ रोजी आपले सारे तपस्याफल विवेकानंदांना देऊन रामकृष्ण परमहंसांनी इहलोक सोडला. विवेकानंदांनी उदारमतवादी सहिष्णुतेने भूतवादी पुस्तके लिहिली. हजारो व्याख्याने दिली. हर्बट स्पेन्सर हा त्यांचा आवडता तत्त्वज्ञ होता. कर्मयोग, राजयोग, प्रेमयोग, भक्तियोगसारखी व्यासंगपूर्ण पुस्तके लिहिली, रामकृष्ण मिशन' या संस्थेमार्फत जनसेवेचे व शिक्षणाचे काम सुरु केले. अमेरिका-इंग्ल अनेक विचारवंत त्यांच्या विचारांनी भा गेले. सिस्टर निवेदिता या त्यांच्या निष्ठावंत विदुषीने 'राष्ट्रीय हिंदुधर्म' नावांचे एक पुस्तकही लिहिले आहे. इंग्लंड, अमेरिकाच नव्हे, तर जगभर रामकृष्ण, विवेकानंदांचे शिष्य मिशनचे कार्य सेवावृत्तीने करीत आहेत. ४ जुलै १९०२ साली तत्त्वज्ञाने या जगाचा निरोप घेतला.

.
दिनविशेष
मादाम मेरी क्युरी स्मृतिदिन १९३४जन्म ७ नोवेंबर १८६७ रोजी झाला. त्या पोलंडच्या रहिवासी. पॅरिसमध्ये अनेकअपेष्टा सोसून त्यांनी उम्र शिक्षण पूर्ण केले. अध्ययन आणि संशोधन यांची त्यांना अतिशय आवड होती. त्यांचे पती पिअर क्यूरी आणि मेरी या दोघांनी प्रयोग करून रेडियमचा शोध अपनाया शोधाने अणुयुगाचा पाया घातला गेला. १९०३ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाया सन्मानविण १९११ मध्ये रसायनशास्त्रातील संशोधनाबद्दल त्यांना पुन्हा हा सन्मान मिळाला अमेरिकन जनतेने न्यूयॉर्क नगराये स्वातंत्र' हा सर्वोच्य बहुमान त्यांना अर्पण केला विज्ञानात खूप सौंदर्य आहे, असे मानणान्यांपैकी मी आहे. एखाद्या अद्भुत क्षेत्रमाणे निसर्ग आपके अंतरंग उलगडून
दाखवून स्तंभित करतो.' असे त्या म्हणत.

 
मूल्ये
संशोधनवृत्ती, ज्ञानलालसा, विश्वबंधुत्व, राष्ट्रप्रेम.
अन्य घटना-
• मराठ्यांच्या आरमारातील शूरवीर दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचे निधन - १७२९. • अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन - १७७६ • स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन १९०२ ● पृथ्वी क्षेपणास्त्र चौथी चाचणी यशस्वी झाली - १९९१ • पाथ फाइंडर हे यान मंगळावर उतरले १९९७, → उपक्रम स्वामी विवेकानंदांचे सुविचार संग्रहित करायला सांगा. • किरणोत्सारी मूलद्रव्यांची माहिती गोळा करायला सांगा. 


समूहगान
हिंद देश के निवासी, सभी जन एक हैं....

सामान्यज्ञान
• घड्याळातील ज्युवेल्स एक अतिशय कणखर, गुळगुळीत व जवळ जवळ न झिजणारा पदार्थ होय. हात लावल्यास तो काचेसारखा वाटतो. रंगाने लालसर असतो. मनगटी घड्याळात कमीत कमी १५ व जास्तीत जास्त २१ इतके ज्युवेल्स वापरले जातात. ज्युवेल्समुळे घड्याळातील फिरत्या चाकांचे घर्षण जवळ जवळ नाहीसे होते. त्यामुळे चाकांची झीज खूप कमी होते. साहजिक अशा घड्याळांची कार्यक्षमता, टिकाऊपणा अधिक वाढतो.

No comments:

Post a Comment