जय भारता
जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता ॥धृ.॥ जय लोकनायक थोर ते, जय क्रांतिकारक वीर ते जय भक्त रणधीर ते, जय आमुची स्वाधीनता जय भारता, जय भारता जय... ॥१॥ तेजोनिधी हे भास्करा, प्रिय पर्वता, प्रिय सागरा, तरुवृक्ष हो हे अंबरा, परते पहा परतंत्रता जय भारता, जय भारता जय ॥२॥
बलिदान जे राणि जाहले, यज्ञात जे धन अर्पिले, शतकात जे हृदयी फुले, उदयाचली हो सांगता जय भारता, जय भारता जय ... .॥३॥
ध्वजनील मंडळ जो उभा, गतकाल हा वितरी प्रभा भवितव्य हो उजळी नभा, दलितांस दाविल तारता, जय भारता, जय भारता, जय... ॥४॥
- कुसुमाग्रज
No comments:
Post a Comment