असो तुला देवा माझा, सदा नमस्कार !
असो तुला देवा माझा सदा नमस्कार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार ॥धृ०॥
तुझ्या कृपेने रे होतिल, फुले पत्थराची तुझ्या कृपेने रे होतिल, मोति मृत्तिकेची तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार ॥१॥
तुझ्या कृपेने रे होई उषा त्या निशेची तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधु पार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला बिंदु जरि मिळेल तरी प्रभो शतजन्माची मम तृषा शमेल तुझा म्हणूनि आलो देवा बघत बघत दार ॥३॥
• साने गुरुजी
No comments:
Post a Comment