Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 24 May 2021

दक्षता

                          दक्षता



        मायकेल एन्जेलो हा जगप्रसिद्ध शिल्पकार होता. तो एक मूर्ती बनवत होता, तेव्हा त्याचा मित्र त्याला भेटावयास आला. त्याला मूर्ती फारच आवडली. मूर्तीचे काम कितपत झाले ते त्याला दिसत होते. काही दिवसांनी तो परत मायकेलकडे आला. मूर्तीकडे पाहून तो म्हणाला, 'मित्रा, एवढ्या दिवसांत तू काहीच काम केलेले दिसत नाही ! मी मागे आलो तेव्हा मूर्तीचे एवढे काम झालेलेच होते. उत्तरादाखल एन्जेलो म्हणाला, "असे कसे म्हणतोस? तू गेल्यापासून मी मूर्तीचा वरचा भाग अधिक नाजूक केला. मूर्तीचे खांदे मजबूत केले. डोळ्यांतील भाव अधिक स्पष्ट केले. उरलेल्या भागाचा तजेला वाढवला." "या गोष्टी अगदी किरकोळ व सामान्य आहेत. त्यासाठी एवढा वेळ कशाला वाया घालवलास ? मूर्ती चटकन पूर्ण करून टाकायची." मित्राने त्यावर आपले मत व्यक्त केले. एन्जेलो हसत म्हणाला, "क्षुल्लक दिसणान्या गोष्टींची माणूस उपेक्षा करतो; पण या किरकोळ व क्षुल्लक गोष्टींनीच पूर्णत्व गाठता येते. पूर्णत्व मात्र, कधीही किरकोळ व सामान्य नसते. माझ्या कलाकृतीमध्ये जे सौंदर्य आढळते, त्याचे रहस्य या दक्षतेत सामावलेले आहे.' छोटी छोटी कामे जी व्यक्ती दक्षतापूर्वक करते, त्या व्यक्तीला मोठेपणा मिळण्यास वेळ लागत नाही. महानता स्वतःहून अशा व्यक्तीकडे धाव घेत असते.

No comments:

Post a Comment