Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday, 15 January 2026

6 वी मराठी 2 सायकल म्हणते, मी आहे ना!

 इयत्ता सहावी

मराठी बालभारती

2    सायकल म्हणते, मी आहे ना!

 १. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा :

(१) मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात ? उत्तर : मुले सायकलचा वापर पुढील गोष्टी आणण्यासाठी करतात (१) दुकानातून साबण आणणे (२) भाजीपाला आणणे (३) आजोबांच्या औषधाच्या गोळ्या आणणे (४) कधी दूध आणणे (५) छोटी-मोठी इतर कामे करणे

----------------------------

(२) सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही, असे का म्हटले आहे ?

 उत्तर : घाम येईपर्यंत सायकल चालवल्यामुळे फुप्फुसे अधिक कार्यक्षम होतात व मांसपेशी तंदुरुस्त राहतात. अंगातून घाम निघाल्यामुळे जास्त चरबी जळून जाते व प्रतिकारशक्ती वाढते. शिवाय पायांचे स्नायूही बळकट होतात. म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही, असे म्हटले आहे. 

 ----------------------------

(३) सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला ?

उत्तर : १६९० साली फ्रान्सच्या सिव्हर्क यांनी पहिली सायकल बनवली. तिला गती यावी, म्हणून १८७६ साली डॉ. लॉसन यांनी पेडलला साखळीची दंततबकडी बसवली. नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला. आता सायकल बरीच आधुनिक झाली आहे. सायकलला आता गिअर जोडले गेले आहेत. शर्यतीसाठी तिची वेगळी बांधणी असते, तर पर्यटनासाठी वेगळी बांधणी असते. अशा प्रकारे सायकलच्या रूपात बदल होत गेले..

---------------------------

 प्रश्न २. पुढील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा :

उत्तरे : (१) वैयक्तिक फायदे :

 (१) व्यायाम

 (२) माफक किंमत

 (३) पार्किंग सुलभ. 

 (२) सामाजिक फायदे : 

(१) वायू प्रदूषण नाही 

(२) वाहतूक कोंडी नाही.

 (३) अपघातांचे प्रमाण कमी. 

(३) राष्ट्रीय फायदे : 

(१) पेट्रोल व डिझेल या इंधनांची बचत 

(२) इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत नाही

------------------

(3) आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता, सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा, असे सर्वांनी ठरवले, तर कोणकोणते फायदे होतील ? 

उत्तर : फायदे : 

 (१) इंधनाची बचत होईल.

(२) वायू प्रदूषण कमी होईल.

(३) वाहतुकीची कोंडी होणार नाही.

(४) स्वतःचे श्रम वाचतील.

----------------------------

(4)* (२) तुमच्या कुटुंबातील, परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा, यासाठी तुम्ही कोणकोणते

प्रयत्न कराल ?

उत्तर : (१) सायकलच्या वापराचे महत्त्व पटवून देईन.

 (२) इंधनाची बचत कशी होते, हे सांगेन. 

 (३) अपघातांची भीती नाही, हे सांगेन..

  (४) पार्किंगची समस्या उद्भवणार नाही.

   (५) आपोआप वैयक्तिक व्यायाम होतो.. 

   (६) वायू प्रदूषणापासून मुक्तता होईल. 

   (७) पैशांची बचत होईल.

----------------------------

   भाषाभ्यास व व्याकरण

(5) पुढील शब्दांचे अर्थ समजून घ्या :

(१) प्रचार व प्रसार (२) विश्वास व आत्मविश्वास.

उत्तरे : (१) प्रचार म्हणजे एखादी गोष्ट पुनः पुन्हा ठामपणे सांगून पटवून देणे. प्रचार मुद्दामहून जाणीवपूर्वक करावा लागतो. प्रसार म्हणजे प्रचार केलेली गोष्ट फैलावणे. प्रसार आपोआप होतो.

(२) विश्वास म्हणजे खात्री. अनेक चांगल्या मूल्यांवर आपण विश्वास ठेवतो. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास. आपल्यातील कार्यक्षमतेची जाणीव स्वतःला होणे.

----------------------------

(6) हलकीफुलकी म्हणजे खूप हलकी, तसे पुढील शब्दांचे अर्थ लिहा : 

(१) कधीमधी - म्हणजे कधीतरी किंवा अधूनमधून.

(२) अवतीभवती म्हणजे आजूबाजूला किंवा चोहीकडे.

 (३) धामधूम - म्हणजे जल्लोष.

(४) फेरफटका - म्हणजे फिरणे किंवा प्रवास करणे.

(५) साधेसुधे - म्हणजे खूप साधे.

----------------------------

(7) 'आडरस्ता' यासारखे आणखी शब्द लिहा.

उत्तर: आडगल्ली

आडवाट

आडमार्ग

शब्दांच्या जाती

आडगाव

----------------------------

(8)  पुढील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा :

सतलज, बाग, कविता, लाडू, आंबेगाव, शाळा, कीटक, झेंडा, लाकूड, प्राजक्ता, मराठी, आई, कापड,

सामान्यनाम_बाग, लाडू, शाळा, कीटक, झेंडा, लाकूड, आई, कापड

विशेषनाम_सतलज, कविता, आंबेगाव, प्राजक्ता, मराठी, बंडू, सह्याद्री

----------------------------

 पुढील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा :

(१) रखडत चालणे : दिवसभर काम करून दमल्यामुळे महादू घरी रखडत चालला होता.

 (२) धडा शिकणे : नालेसफाई केली नाही, तर रोगराई पसरते असा लोकांनी धडा शिकला. 

 (३) हातभार लावणे : शाळेच्या बांधकामात काही शिक्षकांनीही हातभार लावला.

----------------------------

२. लेखन विभाग

निबंध : 

(11)संगणक तुमच्याशी बोलू लागला, तर... कल्पना करा व लिहा. 

उत्तर : मी संगणक बोलतोय...!

मुलांनो, मी तुमचा मित्र संगणक बोलतोय. तुम्हांला मी खूप आवडतो, हे मला माहीत आहे. कारण मी तुम्हांला घरबसल्या इंटरनेटद्वारा हवी ती माहिती देतो. विकिपीडिया किंवा अनेक वेबसाईटवरून तुम्हांला मी हवी तितकी, हवी तेवढी माहिती देतो. माझी अनेक कार्ये जाणून घ्या. पण माझा दुरुपयोग करू नका. मी तुमचा सेवक आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा, म्हणाल तितका वेळ तुम्हांला उपलब्ध आहे. मी कधी थकत नाही, कंटाळा करीत नाही अथवा तुमच्यावर नाराजही होत नाही. मी तुमचा खरा मित्र आहे. त्यामुळे तुम्हीही माझी काळजी घ्यायला हवी. काही तासच माझा वापर करा. सतत माझ्यासमोर बसून डोळे खराब करून घेऊ नका. मित्र तोच जो योग्य सल्ला देतो. मग माझे ऐकाल ना !!!!

-----------------------

(12)* • सायकल व मोटारसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळींत लिहा.

उत्तर : (एक सायकल रस्त्यावरून हळू चाललेली असताना एक मोटारसायकल भरधाव येते -)

मोटारसायकल :ए. हळूबाई, किती हळू चाललीयस, मी बघ किती जोरात जातेय..

सायकल: वेगाने कशाला जायचं ? मला माणसांची काळजी आहे. दुखापत झाली म्हणजे....

मोटारसायकल : अहा रे घाबरट ! तू किती शामळ !! माझा तोरा बघ! ऐट बघ !!

सायकल:तोरा काय कामाचा? आपण वाहन आहोत नि वाहनांचं कर्तव्य हे असतं की, माणसांनाइच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवणं!

मोटारसायकल :बरे! बरे! फार उपदेश करू नको. माझा रुबाब बघ, वेग तरुणांना मीच आवड

सायकल:पण तू खूप महाग आहेस. मी परवडते सर्वसामान्य माणसांना. शिवाय माझ्यामुळे इंधनवाचते. तुझ्यामुळे किती तरी वायू प्रदूषण होत

मोटारसायकल : तुझं खरं आहे बाई। पटलं मला! इथून पुढे मी ऐट दाखवणार नाही. 

सायकल:तू विचार करतेस, हे मला आवडलं. आपण दोघी मैत्रिणी आहोत. चल सोबतच जाऊया.

------------------------------

No comments:

Post a Comment