सहावी नागरिकशास्त्र
५. जिल्हा प्रशासन
१) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
उत्तर : जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो.
-------------------
२) तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते ?
उत्तर: तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते.
-------------------
३) न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते?
उत्तर: भारताचे सर्वोच्च न्यायालयायव्यवस्थेच्या शिरोभागी असते.
-------------------
४) कोणकोणत्या आपत्तीची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते?
उत्तर: त्सुनामी, पूर, चक्रीवादळ, भूकंप, भूस्खलन इत्यादी नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते
-------------------
५) तहसीलदाराची कामे.
उत्तर : (१) तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी असतो
(२) तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम करतो.
-------------------
६). जिल्हा पोलीस प्रमुखाची कामे,
उत्तर : (१) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारा पोलीसप्रमुख (२) जिल्हात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तो जिल्हाधिकाऱ्याला मदत करतो
-------------------
७) जिल्हा न्यायाधीशाची कामे.
उत्तर : (१) जिल्हयाच्या पातळीवर असलेल्या अधिकारक्षेत्रात करून त सोडवणे
(२) संघांचे वेळीच निराकरण करणे
(३) जिल्ह्यातील त्यांची सुनावणी करून अंतिम निकाल देणे, ही जिल्हा न्यायाधीशाची कामे असतात.
-------------------
८). आपत्ती व्यवस्थापन.
उत्तर : आपणाला अनेक प्रकारच्या नैसर्गिक व मानवी आपत्तींना तोंड दयावे लागते आपलोच्या काळात लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते; जीवितहानी होते म्हणून अशा आपत्तींना कसे सामोरे जावे याचे प्रशिक्षण लोकांना असणे जरुरीचे असते. आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला 'आपत्ती व्यवस्थापन' असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सहभागी असते या व्यवस्थापनात आपत्तींची पूर्वसूचना देणाऱ्या तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जाते
-------------------
९).जिल्हाधिकाऱ्यांची कामे.
उत्तर : जिल्हाधिकाऱ्याला पुढील कामे करावी लागतात-
(१) शेतीविषयक कामे शेतसारा गोळा करणे, शेतीशी संबंधित कायदयांची दुष्काळ, : चाऱ्याची कमतरता अशा प्रश्नांवर उपाययोजना करणे
(२) कायदा व सुव्यवस्थेसंबंधित कामे जिल्हयात शांतता ठेवणे, सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे, तणावाच्या परिस्थितीत सभाबंदी वा संचारबंदी जारी करणे.
(३) निवडणुकीसंबंधातील कामे निवडणुकीच्या संदर्भ आवश्यक निर्णय ने पार पाडणे, मतदार यादया अद्ययावत करणे.
(४) आपत्ती व्यवस्थापनविषयक कामे आपत्तीच्यावेळी त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे, त्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देणे आणि आपत्तिग्रस्तांचे पुनर्वसन करणे.
-------------------
१०). भारतातील न्यायव्यवस्था.
उत्तर : भारताच्या संविधानाने तयार केलेल्या न्यायव्यवस्थेत भारताचे सर्वोच्च न्यायालय हे शिरोभागी आहे. त्यानंतर उच्च न्यायालये असतात. त्याखालोखाल कनिष्ठ न्यायालये असतात कनिष्ठ न्यायालयात जिल्हा न्यायालये, दिवाणी व सत्र न्यायालये, तालुका न्यायालये व महसूल न्यायालये यांचा समावेश होतो.
-------------------
No comments:
Post a Comment