Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 24 May 2021

दान

                          दान


 

              शेठ मुंगीलाल व्यापारासाठी मुंबईला आले. प्रामाणिकपणे ते व्यापार करीत. त्यांचे वागणे व राहणे पण अत्यंत साधेपणाचे होते. त्यांची एकदा कन्हैयालाल मुन्शी यांच्याशी भेट झाली. कन्हैयालाल मुन्शी हे त्या वेळचे गाजलेले वकील होते. शेठ मुंगीलाल मुन्शींना म्हणाले, 'मुन्शीजी, मी आपला सल्ला मागण्यासाठी आलो आहे. मी अलीकडे ८ लाख रुपये मिळविले आहेत. मी विकत घेतलेल्या शेअसचि. भाव एकदम वधारल्यामुळे ते मी विकून टाकले. त्याचे हे पैसे आहेत. त्या पैशाचा मी सदुपयोग करू इच्छितो. भारतीय संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या एखाद्या कार्याला मी ते दान देऊ इच्छितो.' श्री. कन्हैयालाल यांना वाटले, की हा माणूस उगाचंच आपले डोके खाण्यासाठी आला आहे. त्याला मनापासून काही करायचे नाही. कन्हैयालाल म्हणाले, "प्रत्यक्ष आपण रक्कम आणाल तेव्हाच माझा सल्ला घ्या.” शेठ मुंगीलाल निघून गेले. महिनाभराने ते परत आले व म्हणाले, “आज सोमवती अमावास्या आहे. आजचे दान फार पुण्यप्रद असते. म्हणून मी ६ लाख रुपये गोमातेच्या सेवेसाठी, २ लाख रुपये संस्कृत भाषेच्या विकासासाठी देणगी देऊ इच्छितो. मागे आपले बोलणे झाले आहेच." मुन्शीजींचा अजूनही त्या माणसावर विश्वास बसेना. ते म्हणाले, 'दान करण्यासाठी रोख रक्कम लागते. नुसत्या योजना नको." "जशी आपली आज्ञा. येथूनच माझ्या दलालाला फोन करतो व माझा संकल्प पूर्ण करून जातो" असे म्हणून शेठजींनी फोन केला. थोड्याच वेळात ८ लाखांचे नोटांचे बंडल वकील साहेबांच्या कचेरीत हजर झाले. हा साधा भिकान्याप्रमाणे दिसणारा माणूस महान दार्जी आहे, याची कन्हैयालालजींना खात्री पटली.

No comments:

Post a Comment