Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 24 May 2021

आज्ञापालन

                      आज्ञापालन



               रात्रीची वेळ होती. कडाक्याची थंडी पडली होती. कर्तव्यनिष्ठ शिपाई छगनसिंह पहारा देत होता. गस्त घालत असताना त्याच्या होणाऱ्या बुटांच्या आवाजामुळे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड केनिंग याच्या पत्नीची झोपमोड होत होती. तिने त्याला इकडे तिकडे न फिरता एकाच जागी उभे राहण्यास सांगितले. त्याने ते ऐकलेच नाही. तेव्हा तिने आपल्या पतीकडे-लॉर्ड केनिंगकडे तक्रार केली. व्हॉईसरॉयने त्याला थांबण्याचा आदेश दिला. आदेश देणारे कोण आहेत, हे माहीत असूनही छगनसिंहने तसे करण्यास नकार दिला. नम्रतापूर्वक पण निर्भयतेने तो म्हणाला, 'मी माझ्या ऑफिसरचा हुकूम पाळत आहे. त्याने हुकूम केल्याशिवाय मी एका जागी थांबणार नाही. माझे इकडून तिकडे जाणे चालूच राहील. आपण मला आज्ञा न करता माझ्या वरच्या अधिकान्यांना पाहिजे तर सांगा. त्यांच्याकडून ऑर्डर आली तरच मी ती पाळीन. व्हॉईसरॉयने आपल्या पत्नीची झोपण्याची व्यवस्था दुसरीकडे केली. दुसऱ्या दिवशी जॉर्ड केनिंगने त्या शिपायाला व त्याच्या अधिकान्याला बोलावले. अधिकान्याला सर्व कळताच तो शिपायाची खरडपट्टी काढू लागला. लॉर्ड केनिंगने त्याला तसे करण्यापासून रोखले. शिपायाच्या पाठीवर थोपटत व त्याची निर्भयता, कर्तव्यपरायणता, आज्ञापालन या गुणांची स्तुती करीत त्याने त्याला कॅप्टनची पदोवती दिली. स्वतः कर्तव्य असे चोखपणे बजावणारे व त्याबद्दल पाठ थोपटणारे असे दोघेही दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहेत.

No comments:

Post a Comment