Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 23 May 2021

सत्यनिष्ठ

                      सत्यनिष्ठ 



जॉर्ज अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या बालपणाची गोष्ट. सहा-सात वर्षांच्या या जॉर्जला कुणा एका ओळखीच्या लोहाराने एकदा एक छोटीशी  कु-हाड बक्षीस म्हणून दिली. वडील घरात नसताना छोट्या जॉर्जने ती कुन्हाड परसदाराच्या बागेतील छोट्या छोट्या झाडांवर मोठ्या उत्साहाने चालविली. शेवटी तर त्याने ज्याच्यावर त्याच्या वडिलांचा अतिशय जीव होता, अशा नुकत्याच फोफावू लागलेल्या एक फळझाडाच्या बुंध्यावर त्या  कु-हाडीचे घाव घातले आणि ते झाड आडवे पाडले । वडील घरी आल्यावर जेव्हा ते त्या बागेत गेले आणि त्यांनी तिथल्या फुलझाडांची व फळझाडांची तोडातोड केली गेल्याचे पाहिजे, तेव्हा रागाने लालबुंद झालेल्या त्यांनी विचारले, “जॉर्ज, बागेतली झाडं कुणी तोडली, ते तू पाहिलेस का?" त्यावर मान खाली घालून  छोटा जॉर्ज म्हटला, "बाबा! मी खोटे बोलू शकत नाही. मला लोहाराने दिलेल्या कु-हाडीने मीच ती झाडे तोडली. मात्र, यापुढे मी कधीही असे करणार नाही.' आपल्या छोट्या जॉर्जच्या त्या सत्यनिष्ठेमुळे गहिवरून गेलेल्या वडिलांनी त्याला हृदयाशी धरले व त्याला म्हणाले, “बाळा, तू माझी आवडती झाडं तोडल्यामुळे मला जेवढं दुःख होत आहे, त्याच्या कितीतरी पटींनी मला तुझ्यासारखा सत्यवादी मुलगा असल्याचा आनंद आहे. तुझ्यासारख्या सत्यनिष्ठ व सद्गुणी सुपुत्राची बरोबरी तसली हजारो झाडे कधी तरी करू शकतील काय?”

No comments:

Post a Comment