Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday, 23 May 2021

तीन शब्दात उत्तर

                  तीन शब्दांत उत्तर 



एका राजाने आपल्या चतुर प्रधानाला विचारले, "प्रधानजी, मी तुम्हाला तीन वेगवेगळे प्रश्न विचारतो; पण तुम्ही मात्र त्या तीनही प्रश्नांचे एकच आणि तेही त्याच तीन शब्दांत उत्तर द्यायचे आहे कबूल?" "प्रयत्न करतो" असे प्रधान म्हणताच, राजाने त्याला एका पाठोपाठ तीन प्रश्न विचारले, १) तलवार गंजली का? २) भाकर करपली का? ३) विड्याची पाने सडली का? प्रधानाने तीन शब्दांत उत्तर दिले. 'फिरवली नाही म्हणून.' "वाह! वाह, प्रधानजी तुम्ही अगदी अचूक उत्तर दिलेत!" कारण तलवार फिरवली नाही तर ती गंजते, तापलेल्या तव्यावरची भाकरी फिरवत राहले नाही तर ती करपून जाते आणि विड्याची पाने फिरवती न ठेवल्यास ती सडून जातात.'

No comments:

Post a Comment