Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 23 May 2021

स्नेहघर

                         स्नेहघर



 एक शेटजी होते. त्यांना दोन मुले होती. आपल्या मृत्यूनंतर सर्व व्यवहार व कारभार कोणाकडे सोपवावा, कोण चांगल्या रीतीने सांभाळील? असा प्रश्न शेटजींना पडला. त्यांनी मुलांची परीक्षा घेण्याचे ठरविले. ते खूप श्रीमंत होते. दोन्ही मुलांना त्यांनी पाच-पाच लाख रुपये दिले व सांगितले, "हे पैसे घ्या व राज्यातील प्रत्येक शहरात तीन महिन्यांच्या आत एकेक घर बांधून मला तुमच्या कामगिरीचा अहवाल द्या." तीन महिने संपत येताच दोन्ही मुले परत आली. मोठा खूपच मेटाकुटीला आलेला दिसत होता. वडिलांनी त्याला विचारले, "किती घरे बांधलीस?" मुलाने उत्तर दिले, "आपण दिलेले ५ लाख रुपये फार अपुरे पडले. अवघ्या ५ शहरांत घरे बांधून झाली. प्रत्येक शहरात घर बांधणे कसे शक्य आहे?" धाकट्या मुलाला वडिलांनी आणखी तोच प्रश्न विचारला. तो खूश व आनंदी दिसत होता. त्यांने उत्तर दिले, “सर्व घरे बांधून पूर्ण झाली." कसे शक्य आहे ? खोटे नाही ना बोलत ? पैसा कसा पुरला ? वडिलांनी प्रश्नांचा भडिमार केला. तो शांतपणे म्हणाला, "पैसे जसेच्या तसेच आहेत. मी घरे बांधलीच नाहीत. मी प्रत्येक शहरात एक जिवलग मित्र जोडला. असा जिवलग मित्र की, ज्याच्याकडे मी केव्हाही जाऊन राहू शकतो, असे स्नेहघर मी प्रत्येक ठिकाणी बांधले. मित्राचे घर म्हणजे माझेच घर, असा स्नेह निर्माण केला." 'शेटजी खुश झाले. त्यांनी आपला कारभार आपल्यानंतर त्याच्याकडे सोपवायचा ठरविले, हे सांगणे नकोच. विवेकबुद्धी व युक्ती वापरली की, असाध्य कार्यही साध्य होते.

No comments:

Post a Comment