Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 23 May 2021

सभ्यतेची भाषा

                सभ्यतेची भाषा 



नौखालीच्या यात्रेत म. गांधींबरोबर त्यांची नात मनू गांधी पण होती. एकदा ती बोलता बोलता म्हणाली, "बापू! हा  सुहावर्दी सुधारणेच्या पलीकडचा दिसतो. त्याचे हे पत्र पाहा, काय विचित्र आहे ! त्यातली भाषा किती उर्मटपणाची आहे. अशा माणसाला नम्रतेने लिहून काय उपयोग?" मनूला वाटले. बापूजी तिच्या बोलण्यावर एकदम खूश होतील; परंतु नीट ऐकून घेतल्यावर बापू गंभीरपणे म्हणाले, "मनू, सुहावर्दी तुझ्यापेक्षा मोठे आहेत. एका प्रांताचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा उल्लेख तू अरे-तुरेच्या भाषेत करता कामा नये. त्यांना आदरार्थीच संबोधले पाहिजे." बापूजी थोडा वेळ थांबून तिला पुढे म्हणाले, “इंग्रजांच्या ज्या चांगल्या सवयी आहेत, त्यांचे आम्ही का अनुकरण करू नये? अगदी नोकराकडून काही मागायचे असले तरी ते 'कृपया (प्लीज) म्हणतील. काम झाल्यावर 'आभार' (थँक् यू म्हणण्यास) मानण्यास विसरणार नाहीत. जोपर्यंत आम्ही आमच्या मुलामुलींना शाळा-कॉलेजमधून अशा प्रकारची सभ्यतेची भाषा, शिष्टाचार शिकवत नाही तोपर्यंत भारत देश कधीच वर येणार नाही. जोपर्यंत भारत नैतिक, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होत नाही तोपर्यंत भारत स्वतंत्र झाला, असे मी तरी मानणार नाही." मनुबाईना गांधींनी दिलेली सभ्य भाषेची, शिष्टाचाराची शिकवण ही प्रत्येक युगातल्या नव्या पिढीची गरज आहे.

No comments:

Post a Comment