Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 18 May 2021

सत्वधारणा

                       सत्वधारणा


 मंडनमिश्र त्यांच्या काळचे महान पंडित होते. दुर्दैवाने त्यांच्या घरची स्थिती फार हलाखीची होती. एकदा त्यांची आई गरिबीला, अन्नान्न दशेला कंटाळून म्हणाली, 'मुला ! राजाकडे जा. त्याची खुशामत कर. तो स्तुतीमुळे जे काही देईल ते घेऊन ये.' मंडनमिश्रांची इच्छा नव्हती; परंतु आईची आज्ञा म्हणून ते नाखुशीने तयार झाले. राजवाड्याकडे जाण्यासाठी एक नदी पार करावी लागायची. मंडनमिश्र नौकेत बसले. नाविकाने पैसे मागितले. मंडनमिश्रांजवळ पैसे नव्हते. नाविकाने विचारले, 'तुझे नाव काय? तू कोठे चालला आहेस?' मंडनमिश्रांनी सांगितले, 'माझे नावन मंडनमिश्र आहे. मी येथील राजांकडे चाललो आहे. त्याची खुशामत करून, त्याला प्रसन्न करून, त्याच्याकडून काही द्रव्य प्राप्त करून घेणार आहे,' ते ऐकताच नाविक म्हणाला, 'तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते सांगा; परंतु कृपया अशा रीतीने त्या मंडनमिश्रांचे नाव बदनाम करू नका. मी जे काही त्यांच्याबद्दल ऐकलं आहे, त्यावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो, की मंडनमिश्र मरण स्वीकारतील, पण कोणाची हांजी हांजी करणार नाहीत.' ते ऐकताच मंडनमिश्र लज्जित झाले. 'नौकेतून ते खाली उतरले. घरी परतले. आईला म्हणाले, 'आई! लोकांच्या मनातील माझ्याबद्दलची सत्त्वसाधारणा मी अभंग ठेवणार आहे. तूच सांग, कोणत्या तोंडाने मी राजाची खुशामत करू?'





          

No comments:

Post a Comment