Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 18 May 2021

संकटाशी सामना

                   संकटाशी सामना 



         आश्रमात आग लागली. गवत व झोपड्या जळायला लागल्या. सगळीकडे घबराट पसरली. गुरू व शिष्य हौदातून पाण्याच्या बादल्या भरून आग विझविण्याची शर्थ करीत होते; पण हौदात पाणी फार नव्हते. विहीर होती, परंतु रहाट चालविणार कसा? कारण बैल गाडीला जुंपला होता व गाडी अतिथीला सोडण्यासाठी बाहेर गेली होती. सर्वजण विचारात पडले होते. एका शिष्याने फारसा विचार न करता एकदम बैल जेथे रहाटाला जोडतात तेथे स्वतः गेला. बैलाच्याऐवजी स्वतःला बांधून घेतले. शारीरिक व मानसिक शक्तीच्या जोरावर त्याने मोट चालविण्यास सुरुवात केली. झरझर पाणी वाहू लागले. पाण्याची टाकी भरू लागली. काही वेळाने आग विझविण्यात यश आले. आचार्यांनी नंतर विचारले, "बैल तर नाही, मग रहाट चालविला कोणी?' शिष्यांनी उत्तर दिले, “आचार्य, या शिष्याने बैलाच्या जागी स्वत:ला बांधून रहाट चालविला.” आचार्यांनी प्रेमाने त्या शिष्याला आलिंगन दिले व म्हणाले, “माझे तुला आशीर्वाद आहेत. तू आपले नाव उज्ज्वल करशील." हाच विद्यार्थी पुढे स्वामी अखंडानंत नावाने लोकप्रिय झाला त्याने सर्वसामान्य लोकांना माफक किंमतीत श्रेष्ठ दर्जाचे वाङ्मय वाचायला मिळावे म्हणून 'स्वस्त साहित्य' नावाची एक प्रकाश संस्था काढली. अनेक लोकांची ज्ञानतृष्णा तिने शांत केल गुजराथमध्ये ती अजूनही कार्यरत आहे.

No comments:

Post a Comment