Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 18 May 2021

राष्ट्रभाषा

                         राष्ट्रभाषा



            एक भारतीय तरुण उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. अमेरिकेत तो ज्या घरात राहत असे, त्या घराच्या मालकाला एक छोटा मुलगा होता. त्या मुलाला भारताची राष्ट्रभाषा व त्या भाषेची लिपी याबद्दल कुतूहल होते. एकदा भारतीय युवकाला त्याच्या घरून पत्र आले, तेव्हा तो मुलगा म्हणाला, 'तुम्ही पहिल्यांदा पत्र वाचा व नंतर फक्त थोडा वेळ मला द्या.' युवकाने पत्र वाचून त्या बालकाच्या हातात दिले. भारतीय भाषा व लिपी यांचे पवित्र दर्शन आता आपल्याला होईल, असा विचार त्याच्या मनात होता; परंतु पत्र पाहिल्यावर तो निराश झाला. पत्र परत करीत तो म्हणाला, 'भारताला स्वत:ची अशी राष्ट्रभाषा, स्वत:ची अशी लिपी नाही का? हे पत्र इंग्लिशमध्ये का लिहिले आहे?' युवकाने लज्जित होऊन मान खाली घातली. त्या मुलाच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे, हा प्रश्न त्याला पडला. मातृभाषा, राष्ट्रभाषा यांचे महत्त्व परकियांना आहे; पण आपल्याला नाही, याची खंत त्याच्या मनाला बोचली. भारतात परत गेल्यावर राष्ट्रभाषेचा अभ्यास करून, त्या मुलाला पत्र पाठविण्याचा त्याने संकल्प सोडला. माता, मातृभूमी, मातृभाषा व राष्ट्रभाषा यांवर प्रेम करणे हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विसरता कामा नये.

No comments:

Post a Comment