Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 24 May 2021

मोत्यांचे पीक

                    मोत्यांचे पीक 

       


             स्वीडनमधील ही गोष्ट. तेथील राजाला एक बहीण होती. ती स्वभावाने अतिशय दयाळू होती. याच करुणेने प्रेरित होऊन तिने एक मोठे सुसज्ज हॉस्पिटल बांधले. आपल्याजवळ असलेले सारे हिन्या-मोत्यांचे दागिने त्यासाठी तिने विकले. एकदा तिच्या दवाखान्यात एक कुष्ठरोगी दाखल झाला. सहा वर्षापासून तो त्या रोगाने त्रस्त होता. राजकुमारीने त्याला धीर दिला. सतत सात महिने त्याची शुश्रूषा केली. रोगी पूर्ण बरा झाला. घरी जाताना राजकुमारीने केलेल्या उपकाराबद्दल आभार मानत, तो राजकुमारीच्या पाया पडला आणि डोळ्यातल्या अश्रूंनी तिला न्हाऊ घातले. राजकुमारी त्याला उठवत म्हणाली, "हे बंधो, हॉस्पिटल उभारण्यासाठी मी माझे मोत्याचे दागिने विकले होते. त्या मोत्यांचे आज पीक उगवले आहे. तुझ्या डोळ्यातील आनंदाश्रूंचे मोती पाहून माझे जीवन व कार्य कृतार्थ झाले.

No comments:

Post a Comment