Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 24 May 2021

साक्षरता

                          साक्षरता



                  इ. स. १९३० मधली गोष्ट. सरदार वल्लभभाई पटेल गुजरातचा दौरा करत होते. काँग्रेसचे धोरण लोकांना समजावून सांगणे व ब्रिटीश सरकारच्या अत्याचारांकडे लोकांचे लक्ष वेधणे हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश होता. एकदा ते साक्षरतेसंबंधी बोलत होते. त्यांचे भाषण फारच प्रभावी झाले. एका माणसाने उभे राहून विचारले, “आपले म्हणणे आम्हाला पटते. सर्व लोकांनी साक्षर झाले पाहिजे. जो साक्षर आहे, त्याने कमीत कमी दहा निरक्षर लोकांना साक्षर केले पाहिजे. आम्हाला ते कार्य करण्यास आनंदच वाटेल; परंतु आम्ही जेव्हा खेड्यातून जातो तेव्हा लोकांजवळ नसतो, कागद पेन नसते ना पाटी-पेन्सिल ! मग आम्ही त्यांना शिकवावे कसे? हात हलवत पर यावे लागते. आपणच याच्यावर एखादा उपाय सांगा. केवळ भाषण देऊन हा प्रश्न सुटणार नाही, साधनसामुग्री नसतांना कशी काय लोकांना अक्षरओळख करून द्यायची, तुम्हीच सांगा !" सरदार पटेलांनी त्यांचे म्हणणे खुपच काळजीपूर्वक ऐकले. नंतर ते उत्तरादाखल म्हणाले, 'तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. इंग्रजांनी या देशातून खूप गोष्टी बाहेर नेल्या व नेत आहेत. त्यांनी आम्हाला दरिद्री करून टाकले आहे. पण आमच्याजवळ एक फार मोठी संपत्ती आहे. ती त्यांना कधीच नेता येणार नाही. ती संपत्ती म्हणजे आमची भू-संपत्ती. आमची माती हीच आमची भारतमाता आहे. याच मातीतून अन्नधान्य, सोने, चांदी, तांबे इत्यादी खनिज, संपत्ती निर्माण होते, या मातीवरच आम्ही लिहिणे/ वाचणे सुरू केले तर ! आणखी आम्हाला दुसरे साधन काय हवे ?"

No comments:

Post a Comment