Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 24 May 2021

एकाग्रतेची महती

                  एकाग्रतेची महती 



           आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्त्वचिंतक व अध्यात्मक्षेत्रातील महान अधिकारी स्वामी रामतीर्थ यांचे मूळ नाव तीर्थराम असे होते. ते एक 'अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून गणले जात. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या प्रारंभी 'दहांपैकी कुठल्याही सात प्रश्नांची उत्तरे लिहा' अशी जरी सूचना देण्यात आली असली तरी तीर्थराम हा उत्तरपत्रिकेच्या प्रारंभी 'लिहिलेल्या दहा उत्तरापैकी कुठलीही सात उत्तरे तपासून आपण मला गुण द्यावे अशी सूचना लिही आणि प्रश्नपत्रिकेतील दहाही प्रश्नांची उत्तरे देई. प्रत्येक परीक्षेत तो पहिल्या क्रमांकाचे गुण मिळवनू उत्तीर्ण होई। एके दिवशी एका प्राध्यापकाने त्याला प्रश्न केला, 'तीर्थराम, तुला एवढी अलौकिक बुद्धी कशी काय प्राप्त झाली ?' यावर तीर्थराम म्हणाला, "सर, परमेश्वराने मला अलौकिक बुद्धी दिली आहे असे मला वाटत नाही; पण वर्गात प्राध्यापक जे शिकवतात, ते मी चित्त एकाग्र करून ऐकतो व स्मरणात ठेवतो, त्यामुळे मला ते परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेत चांगल्या तऱ्हेने लिहिता येते आणि पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होता येते."

No comments:

Post a Comment