शिक्षणाची सुरुवात
"एका बालमानसतज्ज्ञाला एका बालकाच्या मातेने विचारले, 'काय हो साहेब, माझ्या मुलाला मी शिक्षण द्यायला केव्हा सुरुवात करू?" त्या तज्ज्ञाने विचारले, “तुमचा मुलगा आता किती वर्षांचा झाला आहे?" त्या बाईने उत्तर दिले, “नुकतेच त्याला चवथे वर्ष लागले." त्यावर तो तज्ज्ञ म्हणाला, “अरेरे ! तीन वर्षे तुम्ही फुकट दवडलीत. मुलामुलींच्या शालेय शिक्षणाला जरी पाचव्या-सहाव्या वर्षी सुरुवात करून चालत असले तरी त्यांच्या गृहशिक्षणाला जन्माच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची असते."
No comments:
Post a Comment