Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday, 26 May 2021

प्रार्थना शक्ती

                प्रार्थना शक्ती 



            जंगलात एक माणूस पूर्वेकडे तोंड करून, हात जोडून मधुर गाणं म्हणत होता. इतक्यात दुसरा एक माणूस आला. तो म्हणाला, "अरे, हे सूंदर गाणे तू कोणासाठी गात आहेस?" पहिल्याने उत्तर दिले, "ईश्वराची प्रार्थना करीत आहे." "कुठे आहे तो ईश्वर?" सर्व बाजूंनी बारकाईने पाहत दुसऱ्या माणसाने प्रश्न केला. "सगळीकडे आहे. अणुरेणूत,जवळ दूर, आतबाहेर, सर्वत्र तो आहे." "तू उगाच बडबडत आहेस. येथे तुझा ऐकणारा देव वगैरे कोणीही नाही." "अरे तो माझेच काय, पण सगळ्यांचे ऐकत असतो, त्याच्यावर फक्त अढळ विश्वास पाहिजे." असे म्हणत त्या प्रार्थना करणाऱ्याने एकदम विषय बदलत एकदम विचारले, "तुम्हाला पोहता येतेस का?" "येते; पण त्याचा येथे काय संबंध?" "समोरच्या तलावात पांढरे कमळ आहे. ते पोहत जाऊन तोडून आण. म्हणजे तुला ईश्वर आहे की नाही ते कळेल." "त्यात काय? आता आणतो." असे म्हणून त्या व्यक्तीने कपडे काढून पाण्यात पोहाण्यासाठी उडी मारली. बघता बघता तो ते घेऊन आला. “धन्यवाद! मला पोहता येत नाही. वैद्यराजांनी मला औषधासाठी श्वेतकमल आणावयास सांगितले. मी दोन तासापासून मदत कर, म्हणून येथे ईश्वराची प्रार्थना करीत आहे. जंगलात कोण येणार? परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली व तुला पाठवले. तू माझी समस्या केलीस.' अवडंबर न माजवता अंत:करणापासून त्या अनंतशक्ती ईश्वराला केलेले निवेदन म्हणजे प्रार्थना. मौन पाळूनसुद्धा ती करता येते."

No comments:

Post a Comment