Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday, 26 May 2021

मोठी रेषा

                     मोठी रेषा

           एक राजा आपल्या बागेत हिंडण्यासाठी आला. तेथे राजकुमाराबरोबर प्रधानपुत्र व काही महापौरांची मुले खेळ खेळत होती. राजाला पाहताच ती सर्व त्यांंच्याजवळ गोळा झाली. राजाने त्यांची बुद्धी परीक्षा घेण्यासाठी जमिनीवर रेषा ओढली व तो मुलांना म्हणाला, " ही रेषा लहान करून दाखवा. मात्र, ती पुसायची नाही किंवा तिची काटछाट पण करायची नाही, अशी त्यासाठी अट आहे." सगळी मुले विचारात पडली. रेषेला हात न लावता तिला छोटी कशी करायची? प्रत्येक जण एकमेकाकडे पाहू लागला. इतक्यात मंत्र्याचा मुलगा पुढे आला व म्हणाला, “महाराज! मी आपण सांगितलेल्या शर्तीनुसार रेषा लहान करून दाखवितो. मला फक्त आपल्या जवळची काठी द्या." राजाने काठी दिल्याबरोबर त्याने राजाने काढलेल्या रेषेच्या खाली दुसरी एक मोठी रेष काठीने मातीवर काढली व म्हणाला, "बघा, आता आपण काढलेली रेषा छोटी केली की नाही?” राजाने हसत त्याची पाठ थोपटली व म्हणाला, "तू मी घेतलेल्या बुद्धीच्या परीक्षेत पास झाला आहेस, मी तुला तुझ्या बुद्धिचातुर्याबद्दल बक्षीस देत आहे." सर्वांनी टाळ्यांच्या गडगडाट केला. स्वतःची उन्नती करण्याचे दोन मार्ग असतात, दुसऱ्याचे गुण कमी करून किंवा स्वत:चे गुण वाढवून पहिला मार्ग रेषा पुसण्याचा असतो तर दुसरा मोठी रेषा काढण्याचा असतो.

No comments:

Post a Comment