दयाळू मुलगा
शाळा सुटली. एक मुलगा आपले दप्तर घेऊन शाळेच्या बाहेर आला. बाहेर त्याने एक दृश्य पाहिले आणि तो लगेच थांबला. एक मोठा मुलगा दुसऱ्या लहान मुलाला निर्दयपणे मारत होता. त्या मोठ्या मुलाशी मारामारी करण्याइतकी ताकद या शाळेबाहेर आलेल्या मुलामध्ये नव्हती; तरीही तो मध्ये पडला आणि मारणान्या त्या युवकाला म्हणाला, “तू याला किती फटके मारणार आहेस?" "तुला काय करायचे आहे त्याच्याशी?" त्या युवकाने रागाने विचारले.. "माझे एक काम आहे." 'काय काम आहे, लवकर सांग." "मी पण त्या मार खाणाऱ्या मुलाप्रमाणे दुबळा आहे. तुझ्याशी मारामारी करू शकणार नाही; पण मलाही मार खाण्यात भागीदार व्हायचे आहे.” "म्हणजे? मला समजलं नाही तुझं बोलणं" "तू या मुलाला जितके वेताचे फटके मारणार असशील त्यांतले निम्मे मला मार. मी त्यासाठी तयार आहे.' मारणारा तो युवक ती विचित्र मागणी ऐकून थोडा भानावर आला. , त्याला आपल्या कृत्याची शरम वाटली. हा मुलगा परपीडा पाहून इतका संवेदनशील झाला, आणि मी! माझ्या क्रूरतेत आनंद मानत आहे. धिक्कार असो माझा! हा विचार मनात येताच त्याने आपल्या . हातातील काठी फेकून दिली. मार खाणाऱ्या त्या मुलाला पटकन उठवले व माफी मागितली. ज्या दयाळू बालकाने मार खाण्यासाठी भागीदार होण्याची तयारी दाखविली होती. तो लॉर्ड बायरन मोठेपणी इंग्रजी भाषेतील महान कवी म्हणून प्रसिद्धीस आला.
No comments:
Post a Comment