Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday, 26 May 2021

अन्नयज्ञ

                  अन्नयज्ञ

         यज्ञामुळे मुक्ती मिळते, असे ऐकल्यावर एका माणसाने चार यज्ञ केले. त्याला पाचवा यज्ञ करावयाचा होता. हा कशाप्रकारे करायचा, यासंबंधी तो विचार करीत होता. इतक्यात त्याने नारद ऋषींना जाताना पाहिजे. त्यांना नमस्कार करून तो म्हणाला, "मुनिवर्य ! मी यज्ञ करू इच्छितो आहे. कशा प्रकारे करू ? म्हणजे मला त्याचे जास्तीत जास्त फळ मिळेल?" नारदमुनी म्हणाले, “माझ्यापेक्षा तू हा प्रश्न धर्मराजांना विचार तर, ते तुला योग्य मार्गदर्शन करतील." धर्मराजाकडे जाण्यासाठी तो व्यक्ती निघाला. वाटेत त्याला भूक लागली. एका झाडाखाली बसून त्याने आपल्याजवळची शिदोरी सोडली. खायला सुरुवात करणार इतक्यात त्याला समोर एक भुकेलेला कुत्रा दिसला. त्याची ती अवस्था पाहून त्याला दया वाटली. त्याने भाकरीचा एक तुकडा त्याला दिला. उरलेले चार तुकडे आपण खावे असा विचार त्याने केला. तेवढ्यात तो कुत्रा परत कळवळून आला. त्याने दुसरा तुकडा त्याला दिला. असाच प्रकार आणखी तीनदा झाला. त्यामुळे तो तसाच भुकेलेला राहिला. धर्मराजाची व त्याची जेव्हा भेट झाली तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले, “तू कुत्र्याला अन्न देऊन स्वतः उपाशी राहून, पाचव्या यज्ञाचे महान फळ प्राप्त करून घेतले आहेस. पहिले तुझे चार यज्ञ नाममात्र होते. पाचवा यज्ञ खरा यज्ञ. अन्नदानाचे पुण्य सागराप्रमाणे अथांग आहे. कोणता यज्ञ केला असता जास्तीत जास्त फळ मिळते, या तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले असेल." भुकेलेल्यांना अन्न देणे हाच खरा धर्म आहे. स्वामी विवेकानंद म्हणत, “भुकेलेल्याला अन्न न देता ईश्वराची पूजा करणे हा त्याचा सन्मान नसून अपमान आहे.”

No comments:

Post a Comment