Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 23 May 2021

पात्रता परीक्षा

                 पात्रता परीक्षा 



श्री. नागार्जुन हे विख्यात असे प्राचीन भारतीय रसायनविद्यातज्ज्ञ होते. त्यांच्या जीवनातील ही घटना आहे. आपली विद्या शिकू शकेल अशा सुपात्र शिष्याच्या ते शोधात होते. एकदा दोन हुशार व ज्ञानपिपासू विद्यार्थी त्यांच्याकडे आले. रसायनविद्येचा अभ्यास करण्याची जिज्ञासा त्यांनी प्रकट केली. पात्रता परीक्षा घेतल्याशिवाय विद्यादान करावयाचे नाही, असे श्री. नागार्जुन यांनी ठरविले. दोघांना त्यांनी एक औषधी वनस्पती दिली व चोवीस तासांच्या आत खलून तिचे औषध बनविण्यास सांगितले. दुसन्या दिवशी ते दोघे विद्यार्थी श्री. नागार्जुन यांच्याकडे आले. एकाने औषधी कल्प तयार करून आणला. दुसरा क्षमा मागत म्हणाला,"गुरुजी ! मी औषध तयार करू शकलो नाही. मी तुमच्याकडून काल परत जात असताना वाटेत एक भिकारी बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला बरे करण्यात माझा वेळ गेला.” आचार्य नागार्जुन त्याचे कारण ऐकून 

 खुपच खूश झाले. सेवाभावना, त्याग, दुसन्याचे हित जपणे या गोष्टी विद्यार्जनसाठी पूर्वअटी आहेत. दुसऱ्या विद्यार्थ्याला त्यांनी आपले शिष्य करून घेतले. सत्पात्री दान त्याप्रमाणे विद्याही सत्पात्रीच गेली म्हणजे तिचा चांगला उपयोग केला जातो. कच्च्या घटात अमृत टाकले तर घट कच्च्या असल्यामुळे तो फुटतो. त्यातील अमृत मातीत मिसळून जाते. तसेच अयोग्य किंवा कुपात्र विद्यार्थ्याला ज्ञान दिले तर ते व्यर्थ जाते. अमृतस्वरूपी मुक्तिदायक विद्या देण्यापूर्वी विद्यार्थ्याच्या पात्रतेची परीक्षा घेणे फार आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी ती घेतली जाई. 

No comments:

Post a Comment