Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 24 May 2021

विश्वास-शक्ती

                   विश्वास-शक्ती



               इंग्लंडमधील फॉक्स हा त्याच्या वेळचा एक नामांकित वक्ता होता. त्याने एका सावकाराकडून रीतसर पावती करून कर्ज घेतले होते. कर्जाची मुदत संपल्यावर सावकार फॉक्सकडे पैसे वसूल करण्यासाठी आला. ज्या वेळेस सावकार आला त्या वेळेस फॉक्स सुवर्णमुद्रा मोजत होता. 'जर कर्ज फेडण्यासाठी तुझ्याकडे पैसे आहेत तर तू कर्ज चुकते का नाही करीत ? जितका वेळ रक्कम परत करायला लावशील तेवढे व्याज वाढत जाईल. तगादा मागे लावून घेणे हे आपणासारख्यांना शोभत नाही.” सावकाराने फॉक्सला बजावले. फॉक्स म्हणाला, "माझ्याकडे जे आज पैसे आहेत ते मला शेरेडिनचे कर्ज म्हणून द्यायचे आहे. तुम्ही माझ्याकडून कर्जासंबंधी स्टॅम्प पेपर वगैरे करून सही घेतलेली आहे. श्री. शेरेडिनने काहीच लिखापढी न करता केवळ विश्वासावर मला कर्ज दिले आहे. त्याच्या विश्वासाला मी जागले पाहिजे. तुम्हाला मी नंतरसुद्धा देऊ शकेल. कायद्याने मी तुम्हाला बांधलेलो आहे.' सावकार म्हणाला, "तसे असेल तर दस्तऐवज लिहून घेऊन चूकच केली आहे. हा बघ, तुझ्यासमोर मी तो फाडून टाकतो.' आता तर मी पैशाचा हक्कदार झालो ना! फॉक्स सावकाराचा विश्वास पाहून चकित झाला. त्याने थोड्याच दिवसांत त्याचेही पैसे परत केले. खरोखर विश्वास ही अगाध शक्ती आहे.

1 comment: