Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 24 May 2021

वचनपुर्ती

                         वचनपुर्ती



 शंकर मिश्र संस्कृत भाषेतील महान पंडित होऊन गेले. त्यांच्या लहानपणी त्यांच्यासाठी एक दाई नेमण्यात आली होती. शंकर मिश्रांची आई त्या दाईला म्हणाली, 'हा मोठा झाल्यावर त्याची जी प्रथम कमाई होईल ती तुला जशीच्या तशी दिली जाईल." शंकर मिश्र खुप अभ्यास करून संस्कृतचे महान विद्वान बनले. राजाने एकदा त्यांची कीर्ती ऐकून त्यांना राजदरबारात बोलावले. । संस्कृत काव्य ऐकून राजाने खुश होऊन आपल्या गळ्यातील मोत्यांचा हार त्यांना बक्षीस दिला. शंकर मिश्रांनी तो अनमोल हार आपल्या आईच्या चरणी ठेवला. आईने त्यांना लहानपणाची गोष्ट सांगून तो हार दाईस दिला. दाईने त्या हाराची किंमत जवाहिन्यास विचारली तेव्हा तो लाखो रुपयांचा हार असल्याचे तिला समजले. इतका मौल्यवान हार घेण्यास तिचे मन तयार झाले नाही. तिने तो मोलकिणीला परत केला.शंकर मिश्वांची आईसुद्धा वचनबद्ध असल्याने ती परत घेईना. शेवटी काही वर्षानंतर तो हार विकून जो पैसा आला त्यात एक विशाल सरोवर बांधण्यात आले. 'ढाईचा तलाव' म्हणून तो आजही बंगालमधील दरभंगा शहरात प्रसिद्ध आहे.

No comments:

Post a Comment