चार उपदेश रत्ने
ग्रीस देशामध्ये अॅरिस्टॉटल हा एक महान तत्वज्ञ होऊन गेला, तो एक चालता बोलता ज्ञानकोश होता. जगामधील प्रत्येक शास्त्राची बीजे अॅरिस्टाटलच्या विचारसरणीत सापडतात. आपल्या मृत्यूपूर्वी काही क्षण त्याने सर्व शिष्यांना व मुलांना बोलावले व त्यांना चार उपदेश रत्ने दिली. तो म्हणाला, 'दोन गोष्टी विसराव्यात तर दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कोणी आपल्याशी वाईट वागत असेल तर ते विसरून जावे. आपण कोणावर उपकार केला असला, • कोणाचे भले केले असेल तर ते विसरून जावे, जो जन्माला येतो तो मृत्युमुखी पडतो, हे नेहमी लक्षात ठेवावे, मनुष्य हा स्वतःच आपल्या भाग्याचा शिल्पकार असतो. कोणामुळे आपण सुखी किंवा दुःखी होत नाही, हे त्या सतत स्मरणात राखावे." "हे चार उपदेश सांगून अॅरिस्टॉटलने दोन्ही हात वर केले व या जगाचा निरोप घेतला. पहिल्या उपदेशात क्षमतेचे महान तत्त्व दडलेले आहे. क्षमा करणे व क्षमा विसरणे हे चांगले, दुसऱ्या उपदेशात निरहंकारता व सहजता यांचा झरा आहे. तिसऱ्या तत्त्वामुळे आळस, प्रमाद दूर होऊन जीवनात एक नवीन उत्साह निर्माण होईल. चौथ्या तत्त्वात सान्या यशाचा जो मूलमंत्र, आत्मविश्वास तो सांगितला आहे. सामान्यतः जे विसरायला पाहिजे ते आपण लक्षात ठेवतो व जे स्मरणात ठेवले पाहिजे ते विसरून जातो, योग्य स्मरण व विस्मरण झाले तर योग्य अशी जीवनदृष्टी प्राप्त होते.
No comments:
Post a Comment