Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 4 April 2021

शिक्षण आणि संस्कार

              शिक्षण आणि संस्कार



शिक्षण व संस्कार यांची मीमांसा करताना डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे म्हणतात.

शाळा कॉलेजात आम्हाला भूमिती, व्याकरण, विज्ञान इत्यादी अर्वाचीन विषय शिकवतात, पण त्यापैकी एकाचेही संस्कार आमच्या मनावर खोलवर झालेले नसतात. आमच्या शाळा कॉलेजातील विद्यार्थी हे खेड्यातील मारूतीरारखे स्वयंभू गोलसर व निराकार आहेत. नव्या युगाची छिन्नो त्यांच्यावर चाललेली नाही। नव्या युगाचे संस्कार टोकन त्यांना आकार आलेला नाही मला हे विधान अर्धसत्य वाटते शिक्षणाचे दुहेरी संस्कार होत असतात एक अटळ संस्कार व दुसरे अपेक्षित संस्कार शिक्षणाचे काही संस्कार अपरिहार्य अटळ असे असतात. त्याने आधुनिक माणूस घडतो म्हणून तर महात्मा फुले शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे माहेरघर होय असे म्हणतात. विष्णुशास्त्री चिपळूणकर इंग्रजी विद्येला वाघिणीचे दूध मानतात डॉ बाबासाहेब आंबेडकरही सांगतात की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही 'विद्यार्थ्यानो जागृत व्हा' या लेखात डॉ. आंबेडकर लिहितात तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस झाले पाहिजेत.

No comments:

Post a Comment