Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday, 15 January 2026

दहवी मराठी १४. काळे केस

 १४. काळे केस 


कृती २ : (आकलन कृती)


(१) कारणे शोधा :


(i) लेखकांना स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही;    - 


  कारण  - लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.



(ii) लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; 


  कारण   - तो माणूस स्वत:च्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.





(२) पुढील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :  



  (i) केसभर विषयांतर     -   अगदी थोडेसुद्धा विषयांतर.



  (ii) केसांत पांढरं पडण्याची लागण  - केस पांढरे होणे

 


  (iii) केसांचा बुजलेला पांढरेपणा   - कलप लावल्यामुळे पिकलेल्या केसांचा पांढरेपणा दयनीय दिसतो.






कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)


• (२) प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र  असते, याबाबतचे तुमचे मत स्पष्ट करा.


         उत्तर :  प्रत्येकाची विचार करण्याची सवय वगैरे वेगवेगळी असते हे मला आता पटू लागले आहे. आम्ही विद्यार्थी म्हणजे मोठे लेखक नव्हेत. लेखकांना विविध प्रकारे विचार करावा लागतो. आम्हांलाही तसा विचार करावा लागतो का? मी माझे नीट निरीक्षण केले आहे. होय, विचार करावा लागतो. लेखकांनी हे असे इथे का म्हटले आहे? आपण असे कधी म्हणतो का? यावर कोणता प्रश्न येऊ शकेल ? त्याचे उत्तर कसे तयार करायचे? असे अनेक प्रश्न मला पडतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. हे सर्व म्हणजे आमचा अभ्यास हा विचार करण्याचाच भाग आहे.

         मला माझा अभ्यास रात्री करायला खुप आवडते, सर्व जग सि झालेले असते. कुठेही खरटखुट्ट होत नाही, आपण आणि आपला अभ्यास, मग कितीही जागरण करावी लागली, तरी मला त्याचा थोडासुद्धा त्रास होत नाही, माझी एक मैत्रीण आहे. तिला सकाळी लवकर उठून, आंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसायला आवडते, सकाळी चार वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत ती अलग श अभ्यास करू शकते, आमच्या एका मित्राला संध्याकाळी कूल खेळून आल्यानंतर आंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते, आमच्यापैकी काही जणांना दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यासाला चसणे आवडते, कारण काय, तर सकाळी वर्गात शिकवलेले मनान ताजे असते! विशेष म्हणजे त्या त्या वेळी ज्याचा त्याचा अभ्यास चांगला होतो, म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि बैक वेगवेगळी असते, हेच खरे. 





कृती १: (आकलन कृती)


 (२) आकृत्या पूर्ण करा :


  (i) | तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकांना दिसलेली दृश्ये 


       - भिंतीच्या व कौलारांच्या उंचसखल व उभ्या आडव्या रांगा समोर दिसतात.

      

       - पावसाळ्यात दिशा धूसर बनतात.

       

       - कधी कधी पाऊस रिमझिमतो.

       

       - कधी कधी पाऊस धोधो कोसळतो.






(ii) लेखक सर्वकाळ  विचार करताना शोधतात त्या गोष्टी


     - नव्या नव्या कल्पना


    - अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द . 




कृती २ : (आकलन कृती) 


(१) पुढील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :


 (i) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड 


      -    प्रकाशामुळे चमकणारे झाड 







कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 


  (१) लेखकांनी खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्यावरून केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.


        उत्तर : खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी, आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत, हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात. पण कलप लावणे हे काम जिकिरीचे असते. खर्चिक, वेळखाऊ आणि कंटाळवाणे असते. कधी कधी ते राहन जाते. अर्धवट पांढरे-तांबूस केस माणसाचे रूप दयनीय बनवतात. शिवाय कलपाचा एक वाईट परिणामही होतो. कलपामुळे सगळेच केस विलक्षण वेगाने पांढरे होत जातात. चांगले करायला जाता जाता वाईट घडते ते हे असे. 

        वास्तविक, दिवसागणिक आपले वय वाढत  जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो, याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट, आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील.




(२) परगावी गेल्यानंतर लेखकांना आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा. 


        उत्तर : लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे, तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळले-बागडलेले लोक भेटायचे. जुन्या आठवणी निघायच्या. जुन्या आठवणी काढून सर्वजण आपला जुना काळ जागवायचे. सर्वच माणसे तसेच करतात. बालपणीच्या काळात निव्र्व्याजपणा असतो. त्या वेळच्या कृतींमध्ये डावपेच नसतात. एक प्रकारचा निर्मळपणा •असतो. लेखक आणि त्यांचे जुने स्नेही जुन्या आठवणी काढून काढून त्या निर्मळपणाचा आनंद घेऊ पाहायचे..

         जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जाते. कोण कोण काय काय करतो ही माहिती दिली-घेतली जाते. लेखकांकडे आकर्षक बाब होती. त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात. पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. कलपामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकांच्या एका स्नेह्याची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे, लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी, याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला. लेखकांनी थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली.

No comments:

Post a Comment