Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 4 April 2021

ग्रथांची थोरवी

                     ग्रथांची थोरवी



डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणतात," सर्व जगावर चालणारी एकमेव सत्ता म्हणजे ग्रंथसत्ता होय" विनोबा भावे यथार्थपणे म्हणतात ज्ञानाची संपदा देतात आणि व्यक्तीप्रमाणेच समाजाला निरोगी बनवतात. म्हणूनच ज्ञानेश्वरानी देखील ग्रंथकारांकरिता पसायदान मागताना म्हटले आहे. आणि ग्रंथोपजी विये। विशेषी लोकी इये। दृष्टादृष्ट विजये। होआवे जी।। ही जगात परिवर्तन घडवून आणणारी शक्ती होय." भेदभाव नसतो. আनवाच खरे गुरू ग्रंथ हेच होत कारण ते निस्वार्थ असतात आणि ानादवस आपल्या कल्याणाची चिंता वाळगन आपल्याला निस्पृह सल्ला देणारा प्रामाणिक व प्रेमळ गुरू फक्त ग्रंथच होय.

प्ंध आपल्या संकटात आणि आपत्तीत मार्गदर्शन करतात परिस्थितीने भांबावलेला माणूस ग्रंथाकडे धाव घेतो. ग्रंथ त्याला या औदासीन्यातून बाहेर काढतो. त्याला नवजीवन देतो त्याच्या समस्या चुटकीसारख्या सुटतात ग्रंथांच्या सहवासात माणसाला नवजीवन लाभते, कारण कोणत्याही ग्रंथालयात जेव्हा आपण पदार्पण करतो. तेव्हा जणू साऱ्या विश्वाची विद्वत्ता नि प्रतिभा आपले अत्यंत आपुलकीने स्वागत करीत आहे असे वाटते. ग्रंथालयातील लाकडी व लोखंडी आसनांबा तपस्क्यांप्रमाणे शांत बसून राहणारी ही ग्रंथसंपदा पाहिली की, मन कसे मोहरून येते. बागेतील हजारो सुवासिक पुष्पांवरून भ्रमणाच्या भ्रमराची जशी तारांबळ उडावी तशी वाचकांची तारांबळ उडते. त्या वातावरणाने आपल्या मनावर जादू केली असते. गुरूच्या सहवासात माणूस जसा दुःख विसरतो आणि आनंद मिळवतो, तसेच ग्रंथाच्या अंतरंगाचे दर्शन घेताना वाचकही त्याच्या नवलस्ष्टीत स्वतःला हरवून घेतो आणि ज्ञानसागरात डुबून आनंद लुटतो प्रंथ हळुवारपणे उचलावा, अलगद त्याला हातात बाळगावे. त्याची पाने चाळावी आणि मग त्या पानातून उद्भवणाऱ्या रम्यनगरीत फेरफटका मारावा यासारखा सुसंस्कृत मनाला दुसरा निर्भळ आनंद नाही तो पाने चाळता चाळता आपण वर्तमानकाळातन भूत वा भविष्यकाळात केव्हा उडी घेतो, भोवतालच्या दैनंदिन सृष्टीचा निरोप घेऊन ग्रंथांतील अद्भूत सृष्टीत केव्हा प्रवेश करतो, काही कळत नाही सहज म्हणून हाताला लागलेला गृंथ चाळावा, तर त्यातून आपल्याला दुनियेतील आतापर्यंत अज्ञात असलेल्या कितीतरी गोष्टींचे दर्शन घडते. स्वा. सावरकरांनी लिहिलेले 'सत्तावनचे स्वातंत्र्य समर' हे पुस्तक ठघडून आपण वाचू लागलो की नकळत शरीराला वर्तमानकाळातच ठेवून मन सव्वाशे वर्षे मागे जाते आणि विविध भावनांचे तांडव मनात निर्माण करते. लो टिळकांनी मंडालेच्या कारागृहात लिहिलेला गीतारहस्य हा ग्रंथ तर मानवी जीवनाचे रहस्य उलगडून देऊन जीवनपथ कसा आक्रमण करावा याचे उद्बोधक मार्गदर्शन करतो जणू ग्रंथांच्या रूपाने टिळकांचाच आपल्याशी सुसंवाद सुरू असल्याचा प्रत्यय आपल्याला येतो गुरू काय किंवा ग्रंथ काय जशी भावना तसे फळ देतात. त्यामुळेच त्यांच्या सात्निध्यात मन सदैव समाधानी असते; प्रसन्न असते. कोणीही या, केव्हाही या आणि त्यांच्या सुखद सहवासाचा मनसोक्त आनंद लुटा असा जणू त्यांचा समग्र समाजाला संदेश असतो गुरूंच्या सात्रिध्यात जशी जीवनाची रहस्ये कळू लागतात. तद्वतच या ग्रंथांच्या सहवासात जीवनाची कधी न उलगडलेली रहस्ये आपोआपच उलगडू लागतात. न पाहिलेली कितीतरी नवीन क्षितिजे ग्रंथांच्या सहवासाने दिसू लागतात मानवी जीवनाच्या अनादिकालापासून सुरू झालेल्या प्रवासाचे स्वरूप आणि आपल्याच मनात दडून बसलेले राग लोभ, दया, माया, त्वेष, त्याग शुंगार, वैर इत्यादी नानाविध भावनांचे स्पष्ट दर्शन, गुरूप्रमाणेच हे ग्रंथही घडवून देतात जगात होऊन गेलेल्या अभूतपूर्व घडामोडी राज्यक्रांत्या, जलप्रलयांचे इतिहास, कोलंबसासारख्या साहसी पर्यटकांचे संघर्षमय झुंजार जीवन, पशूपेक्षाही क्रूर अशा रानटी मानवांच्या जीवनपद्घती, हिमालयाच्या उंच व निसर्गसुंदर गिरीशिखरांवरील भव्य सौंदर्य आणि सागराच्या उत्तुंग लाटांनी मरणप्राय संकट निर्माण झाले असताना त्या संकटावर मात करू पाहणारी मनुष्याची दुर्दम्य जीवनाकांक्षा अशा कितीतरी अज्ञात गोष्टींचे हे ग्रंथगुरू आपल्याला दर्शन घडवितात. प्राचीनकाळी गुरुकुलपद्घतीत लहान मुलांवर सुसंस्कार घडण्यासाठी त्यांना गुरुगृही पाठविण्यात येई. सांप्रत काळात या मुलांना लहानपणापासूनच ग्रंथांच्या सहवासात ठेवले तर या प्राचीन गुरुत्रमाणे हे ग्रंथ सुद्धा मुलांवर उत्तम संस्कार करतील, त्यांना जीवन जगण्याचा आदर्श घालून देतील. ग्रंथ मानवी मनाला उन्नत करतात, अंतःकरण विशाल करतात, अनुभवाचे अमृत देतात.ज्ञानाची संपदा देतात आणि व्यक्तीप्रमाणेच समाजाला निरोगी बनवतात. म्हणूनच ज्ञानेश्वरानी देखील ग्रंथकारांकरिता पसायदान मागताना म्हटले आहे.

आणि ग्रंथोपजी विये। विशेषी लोकी इये। दृष्टादृष्ट विजये। होआवे जी।।

No comments:

Post a Comment