Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 4 April 2021

साहित्याचे सामर्थ्य

               साहित्याचे सामर्थ्य



विज्ञान व आत्मज्ञान याहून श्रेष्ठ अशी जगाची जडण-घडण करणारी शक्ती म्हणजे साहित्य होय विनोबा भावे सर्व क्रांत्यामागे ग्रंथसत्ता होती- डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे,

मी आणि मरेकर या लेखात गंगाधर गाळगीळांनी साहित्याच्या सामर्यांचা स्वानुभव सांगितला आहे गाडगीळ म्हणतात की मर्ेकरांच्या 'काही कविता जेव्हा मी शांतपणे वाचल्या तेव्हा त्यांचा माझ्या मनावर विलक्षण परिणाम झाला. मला आठवते की मी झपाटल्यासारखा चालत सुटलो क्वीन्स रोडवरून रेक्लमेशनवर गेलो. तेथून थेट चौपाटीपर्यन चालत राहलो. रस्त्यातली प्रत्येक गोष्ट मला वेगळी दिसत होती. सगळ्या अनुभवविश्वाचेच मला एक वेगळे दर्शन घडत होते वस्तू कशा दिसतात व अनुभव कसे असतात याविषयीच्या ज्या काही सांकेतिक कल्पनांचा अजूनही माझ्या मनावर पगडा होता, त्या संगळया उद्ध्वस्त झाल्या. साहित्याचा आपल्या जीवनावरील परिणाम स्पष्ट करताना 'अक्षरे चुरगाळिता मो या कवितेत ना. धों. महानोर म्हणतात, अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो अन् उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो. विज्ञान, आत्मज्ञान व साहित्य या जगाच्या जीवनाला आकार देणाऱ्या तीन शक्ती आहेत. विज्ञान ही जगाच्या जीवनाला रूप देते तर आत्मज्ञान जीवन परिवर्तन करते आणि संपूर्ण जगाचे परिवर्तन घडवून आणते. वाल्मिकी, व्यास, शेक्सपिअर, होमर, शंकराचार्य, रविंद्रनाथ इ. साहित्यिकांनी आपल्या साहित्यनिर्मितीने समाजजीवन बदलल्याची साक्ष इतिहासात मिळते. परमेश्वराचे रौद्र किंवा शिवस्वरूप प्रकटविण्याचे सामर्थ्य विज्ञानात आहे. आत्मज्ञान प्रसविणारे संतमहात्मे लोकजीवनाला कलाटणी देतात परंतु साहित्यामध्ये एवढे सामर्थ्य असते की, ते विज्ञानाला मागे टाकून सरळ हृदयावरच प्रहार करीत असते. साहित्य ही संयोजक शक्ती आहे तिचे कार्य आतल्या आणि बाहेरच्या जगाला जोडणाच्या कडीसारखे असते. ती विज्ञान आणि आत्मज्ञान यांचा संयोग करते. क्रांतदर्शी विचारवंतांच्या साहित्याच्या प्रेरणेनेच जगात मोठमोठ्या क्रांत्या झाल्या आहेत. साहित्य म्हणजे सरस्वतीची साक्षात वाणीच. ही पवित्र वाणी लोकांच्या अंतःकरणातील पाप धुवून त्याला निर्मळ

करीत असते. जगाचे पोषण करण्याचे व जीवनाला सतत सोबत करण्याचे सामर्थ्य एकटया साहित्यात आहे. साहित्य प्रसवणारे साहित्यिक हे परमेश्वराचे दुत आहेत. परमेश्वरकृपेनेच त्यांना हा साहित्यप्रसाद प्राप्त झालेला असतो. म्हणूनच या साहित्यात जनतेचे पाप धुवून त्यांना सन्मार्गावर नेण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच मार्गदर्शनासाठी समाजाला साहित्यिकाकडेच पाहावे लागते यादृष्टीने साहित्यिकावर फार मोठी नैतिक जबाबदारी आली आहे साहित्यिकांनी सदैव आपल्या सद्सद्विवेकबुद्धीच्या सल्ल्यानेच साहित्य निर्माण करावे. त्यांनी आपली बुद्धी वा वाणी विकली तर जगाचे जीवन धोक्यात येईल तसेच साहित्यिकांनी कोणाचेही गुलाम न बनता तटस्थ वृत्तीने वागावे म्हणजेच ते जगाला सुयोग्य मार्गदर्शन करू शकतील अशाप्रकारे साहित्य हे जगाचा आधार पोषक प्रेरक मार्गदर्शक प्रकाश, खरा मित्र व हितचिंतक आहे. ते क्रांतीची स्वप्ने रंगविणारे व समाजाचे मलीन मन स्वच्छ व सुंदर करणारे एक सक्षम साधन आहे. साहित्य आणि मानवी जीवन यांचा अन्योन्य संबंध आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मानवी जीवनातूनच साहित्याची निर्मिती होते व श्रेष्ठ अशा साहित्यामुळे मानवी जीवनाचा परिपोष घडून येतो. हिंदूंची गीता, ख्रिश्चनांचे बायबल व मुसलमानांचे कुराण हे ग्रंथ आजही समाजाला प्रेरणा देणारे साहित्य म्हणून महत्त्वाचे आहेत साहित्याच्या ठिकाणी समाजजीवन घडविण्याचे सामर्थ्य आहे याची जाणीव असल्यानेच ऑस्ट्रियाच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या इटलीला मॅझिनी या इटलीच्या महान देशभक्ताने आपल्या यंग इटली' या वृत्तपत्राद्वारे जागृत केले व इटलीला स्वतंत्र करू इच्छिणाऱ्या वीर गॅरिबॉल्डीच्या तरवारीमागे इटलीच्या जागृत वीरवृत्तीचे बळ उभे केले. महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांच्या 'केसरी नेही अशीच जागृती घडवून आणली आगरकरांच्या 'सुधारका ने महाराष्ट्रातील सुधारणावादाला जन्म दिला. शि में परांपजे यांनी 'काळंया नियतकालीकातून ज्वलंत लेख लिहून इंग्रज राज्यकर्त्यांची झोप उडवून दिली. शब्द वा शब्दातील शक्ती हे साहित्याचे वाहन असल्याने आजचे वृत्तपत्राद्वारे होत असलेले नवसमाज निर्मितीचे महान कार्य म्हणजे पर्यायाने साहित्याच्या सामर्थ्याचा होत असलेला प्रभावी आविष्कारच होय। आध्यात्मिक आनंदात रंगणाऱ्या संतांना देखील साहित्याच्या सामर्थ्याची अनुभवसिद्ध प्रचीती आली होती. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू । तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव। शब्दे चि गौरव पूजा करू ।

No comments:

Post a Comment