Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 6 July 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 



इ .स १९०८ मधील टिळकांवरील खटल्यामध्ये त्यांचेवकिलपत्र ....... यांनी घेतले होते ?

-बॅ. महमद अली जीना


'चले जाव' चळवळीतील भूमीगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले?

-जयप्रकाश नारायण


 कुष्ठरोगी निवारण व पुनर्वसनाच्या कार्यासाठी आळंदीजवळ डुडुळगाव येथे चालवल्या जाणाऱ्या ....... संस्थेशी डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडीत आहे?

-आनंदग्राम


'अनाथांची मान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांची कोणती संस्था आहे? 

-सन्मती बाल निकेतन, हडपसर, पुणे 


संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात - यांनी सुरू केली ?.

-रघुनाथ धोंडो कर्वे


मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?

-दर्पण (१८३२)


'गिताजंली' या काव्यसंग्रहाचा कवी कोण ?

-रविंद्रनाथ टागोर


कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजेची पध्दत

अंमलात आणली?

-लॉर्ड वेलस्ली


कोसबाडच्या टेकडीवरून' हे आत्मवृत्त कोणी लिहिले आहे? 

- अनुताई वाघ 


जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला?  -रुक्मिणी स्वयंवर आणि सीता स्वयंवर


साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला ?

-छ . राजाराम राजे


थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मुळचे कोणत्या तालुक्यातील होते?

-कराड


प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे?

-भोराप्या


पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी नसे ?

-मुजुमदार


कोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली ?

-१७०८


ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळ गाव कोणते?

 - कण्हेरखेड


संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते ?

-सामवेद

No comments:

Post a Comment