25 मार्च
सुविचार -
धर्म हा सर्वांनी पाळला पाहिजे. पण तो सद्धर्म पाहिजे. अधर्म नको. - डॉ. आंबेडकर.
कथाकथन -
होळी पौर्णिमा -
फाल्गुनी पौर्णिमेला 'होळी पौर्णिमा' असे म्हणतात. या सणाला शिमगा, होलिका, हुताशनी महोत्सव, कामदहन अशी इतर नावे आहेत. या दिवशी लोक आपल्या अंगणात गोवऱ्या रचून (पाच गोवऱ्या) होळी पेटवितात. तिची पूजा करतात. तिला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य अर्पण करतात व शंखध्वनी करीत प्रदक्षिणा घालतात. हा होलिकोत्सव कसा सुरु झाला याबद्दलच्या ज्या तीन-चार पौराणिक कथा आहेत, त्यापैकी एक अशी आहे की, हिरण्यकश्यपू नावाचा एक अतिशय क्रूर राक्षस होता. त्याचे दुसरे वैशिष्ट्य असे की देवांचे नुसते नाव जरी कानी पडले तरी त्याच्या अंगाची लाहीलाही होई. पण, त्याचे नशीब असे की, त्याचा मुलगा प्रल्हाद हा निष्ठावंत देवभक्त निघाला देवाचे नाव घेऊ नकोस' असे त्याला वारंवार सांगूनही जेव्हा तो ऐकेना, तेव्हा भडकून गेलेल्या हिरण्यकश्यपूने त्याला जीवे मारण्याचे अनेक प्रयत्न केले. पण, ते निष्फळ ठरले. अखेर त्याने प्रल्हादला आपल्यासारखीच क्रूर असलेली आपली बहीण होलिका हिच्या स्वाधीन केले व त्याला मारायला सांगितले होलिका राक्षसीने प्रल्हादाच्या नकळत एक मोठे अम्निकुंड पेटविले आणि त्यात जाळण्यासाठी त्याला त्या अग्निकुंडात नेले. पण, ती त्याला त्या अम्निकुंडाकडे ढकलणाचा प्रयत्न करू लागली असता त्या अम्निकुंडाच्या ज्वाला लागून तिच्याच कपड्यांनी पेट घेतला आणि त्यात भाजून तिचा अंत झाला. प्रल्हादाला मात्र कुठल्याही तऱ्हेची इजा झाली नाही. ते पाहून लोकांनी हर्षभरित होऊन दुष्ट होलिकेच्या नावाने बोंबा मारल्या. वाईटावर चांगल्याचा विजय होतो, हा सदेश देणारा हा होलिकोत्सव तेव्हापासून सुरू झाला. आपल्या हातूनही काया-वाचा-मनाने ज्या काही वाईट गोष्ट घडल्या असतील त्या जळून नष्ट व्हाव्यात हाच या होळीच्या मागचा हेतु आहे. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असते. त्याला धूलिवंदन असेही म्हणतात. हा दिवस रग, गुलाल, होळीची राख एकमेकांच्या अंगावर उडवून आनंदात साजरा करतात. तर ज्या गावच्या लोकांचे आपल्या गावावर खरेखुरे प्रेम असते व गावच्या स्वच्छतेवर गावातल्या प्रत्येकाचे आरोग्य अवलंबून आहे, या गोष्टीची ज्यांना जाणीव असते असे बरेच लोक या दिवशी ग्रामसफाई करतात.
-दिनविशेष -
काळ' साप्ताहिक सुरु केले: १८९८ - शिवराम महादेव परांजपे हे 'काळ' कर्ते परांजपे म्हणून प्रसिध्द आहेत. प्रखर राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक, पत्रकार व प्रभावी वक्ते जन्म कुलाबा जिल्ह्यातील महाड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण महाड येथे झाले. माध्यमिक शिक्षण रत्नागिरी व पुणे येथे तर उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन आणि डेक्कन कॉलेजात झाले. १८८४ मध्ये जगन्नाथ शकरशेट शिष्यवृत्ती मिळवून ते मॅट्रिक झाले. ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिले विद्यार्थी. उत्कृष्ट देशाभिमानाच्या प्रेरणेने त्यांनी 'काळ' हे साप्ताहिक सुरु केले. याच पत्रातील काही लेखांच्या आधारे सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला. या खटल्यात त्यांना १९ महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली. तथापि १५ महिन्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानतर सरकारने त्यांच्याकडून मागितलेला दहा हजार रुपयांचा जामीन ते देऊ न शकल्याने त्यांना काळ साप्ताहिक बंद करावे लागले. काळातील निवडक निबंधाचे दहा खंडही सरकारने जप्त केले. पुढे मुबई प्रांतातील काँग्रेस सरकारने या खंडावरील बदी उठविली. आपल्या अमोघ वाणीने, ज्वलत लेखणीने आणि सुस्पष्ट विचारसरणीने जनमानसात परकीय सत्तेविरूध्द असंतोष निर्माण केला. ध्येयवादी पत्रकार म्हणून आजही ते अनेकांच्या समोर आदर्श आहेत.
सामान्यज्ञान-
कस्तुरीमृग स्वतः जेलीसारखी असते. मादीला तिचा गंध दोन किलोमीटर वरून देखील येतो.
No comments:
Post a Comment