Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Friday 19 April 2024

General Knowledge in Marathi



 महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत?

- नरहरी झिरवळ 


ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य कोणाचे ?

-ग्रामपंचायत सचिव


 अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती अंबानी यांच्या निवास्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली ? - -जिलेटिन


महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा आहेत. 

-३४


इंडियन इंडीपेडन्स लीगची स्थापना कोणी केली?  -रासबिहारी बोस


वसंतराव नाईक समितीने  या घटकास पंचायतराज  व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले आहे?

- जिल्हा परिषद 


जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिध्द सचिव ..... हे असतात.

-उपमुख्य कार्यकारी अधिकारी


महाराष्ट्रात ग्रामपंचायत मध्ये कमाल व किमान सदस्य संख्या किती असते?

-७ ते १७


 जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकिय अधिकारी कोण असतो ?

-मुख्य कार्यकारी अधिकारी


महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पध्दतीची सुरुवात केव्हा झाली ? 

-१ मे १९६२


महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दफ्तर कोण सांभाळतो ?

- तलाठी


 विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?

- ६ वर्षे


ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्षे आहे ?

 - १८

 

कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणता येईल ? 

- लॉर्ड रिपन


पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी

कोण असतो ?

-गटविकास अधिकारी


भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो?

 -१८

 

खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो?  

-ग्रामसेवक


बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था स्तरीय आहे ? 

-तीन 


जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?

-मुख्य कार्यकारी अधिकारी

No comments:

Post a Comment