Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday, 6 January 2022

नाम व नामाचे प्रकार

नाम



एखाद्या प्राण्याच्या,वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे

म्हणतात.


नामाचे प्रामुख्याने ३ प्रकार पडतात .

१ ) सामान्य नाम – एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामन्य नाम .

उदा . शहर , नदी , मुलगा , मुलगी इ .

 

२ ) विशेष नाम – जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा , प्राण्याचा किवा वस्तूचा बोध करते , त्याला विशेष नाम म्हणतात .

उदा . गंगा , हिमालय , पुणे , अनुजा , सतीश इ .

 

३ ) भाववाचक नाम  - ज्या नामामुळे प्राणी किवा वस्तुमधील  गुण , भाव अथवा धर्म याचा बोध होतो त्या नावाला भाववाचक नाम म्हणतात .

उदा . दुखः , धैर्य , कीर्ती , चांगुलपणा , आनंद इ .


No comments:

Post a Comment