हा देश माझा
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ||॥ध्रु०॥
हा उंच हिमालय माझा, हा विशाल भारत माझा या गंगा यमुना, शेती, धरती, बाग बगीचा माझा अभिलाषा याची धरता, कुणी नजर वाकडी करता त्या मरण द्यावया स्फुरण, आपुले बाहू पसरू द्या रे ॥१॥
हे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला हे बंद का उत्पात, थांबवा आपुला घात सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहीसा अर्थ येऊ द्या रे ॥२॥
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती परी अभंग असू द्या सदैव, आपुली माणुसकीची नाती द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी संदेश शेष जे द्वेष मनातील, वाहून जाऊ द्या रे ॥३॥
हा देश माझा...
-सेनापती बापट
No comments:
Post a Comment