Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 4 April 2021

मानवता हाच खरा धर्म

          मानवता हाच खरा धर्म



या भारतात बंधुभाव नित्य वसू दे। दे वरचि असा दे।

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे।
मतभेद नसू दे।
सकळास कळो मानवता राष्ट्रभावना
या शब्दात संत तुकडोजींनी मानवताधर्माचे मर्म सांगितले आहे. सार्वजनिक सत्यधर्म मध्ये महात्मा जोतीबा फुले म्हणतात. 'स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या सर्वांच्या निर्मिकाने निर्माण केलेल्या प्राणिमात्रापैकी मानव र्त्रीपुरुषांमध्ये कोणत्याच तन्डेची आवडनिवड न करता त्यांचे खाणेपिणे व लेणेनेसणे याविषयी कोणत्याच प्रकारचा विधिनिषेध न करता त्यांच्याबरोबर शुद्ध अंतःकरणाने आचरण करतात त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.' हे मानवताधर्माचे लक्षण होय .
हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, सिख, पारसी हे मानवाचे खरे धर्म नव्हेत. मानवता हाच मानवाचा खरा धर्म होय मानवताधर्माचे पहिले लक्षण म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य होय प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. मग ती स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही जातीतील वा धर्मातील असो. म्हणजेच मानवता धर्म धार्मिक स्वातंत्र्याबरोबरच राजकीय, सामाजिक आर्थिक, शैक्षणिक या सर्वच स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन वगैरे प्रत्येक धर्मात व्यक्तिवर बंधने घातली आहेत. माणसांनी कसे वागावे याचे त्यांनी कायदे केले आहेत. हिंदु धर्मात तरी ही बंधने विशेष स्वरूपात आढळतात अस्पृश्यता जातिभेद, कुणी शिक्षण घ्यावे आणि कुणी घेऊ नये हे धर्मग्रंथानीठरवले आहे. त्यामुळे व्यक्तिविकास व त्याद्वारा राष्ट्रविकास खुंटला मानवताधर्मात स्वातंत्र्य असल्याने विकास साधतो स्वातंत्र्याप्रमाणेच समता हा मानवता धर्माचा दूसरा पैलू आहे. इतर प्रत्येक धर्म आपल्यापेक्षा दुसऱ्या धर्माला हीन लेखतो. प्रसंगी एवढ्या एका कारणाने धर्म-युधेही झाली आहेत मानवताधर्मात सर्व माणसे सारखीच व सारख्याच प्रतिष्ठेची मानली जातात.
एखादी व्यक्ती बुद्धिमान व कर्तबगार असूनही केवळ विशिष्ट जातीत जन्मल्या बरोबर अस्पृश्य ठरते, दलित ठरते सार्वजनिक विहिरीवर तळयावर सर्वांना पाणी भरायची मोकळीक असताना तिलाच केवळ त्यापासून वंचित केले जाते. त्यांचे नाव उच्चारताच इतरांच्या मनात हीनतेची भावना निर्माण होते. केवळ वर्णाने काळा म्हणून गोरी माणसे त्यांचे सारे हक्क सरळसरळ नाकारतात त्यांच्या हक्कासाठी एखादा महात्मा झगडला की त्याला गोळ्या घालून ठार करण्यात येते. सारी माणसे परमेश्वराची लेकरे आहेत असा मुखातून उद्घोष करायचा आणि एका माणसाने दुसऱ्याच्या हातचे खायचे प्यायचे नाही, रोटीबेटी व्यवहार करायचा नाही, असे प्रत्यक्षात वागायचे त्या व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षांना पायदळी तुडवायचे. आजही या चित्रात फारसा बदल झालेला नाही.
धर्माच्या नावाखाली खून, लूटालूट, हत्त्या करायची, गरीब निरपराध्यांचे बळी घ्यायचे, आजवर ज्यांना आपण सख्खे भाऊ समजत आलो त्यांना व त्यांच्या घरांना आग लावून पेटवून द्यायचे पंजाब आज पेटला आहे. कनिष्क विमानात बसलेल्या प्रवाशांनी कुणाचे काहीच बिघडवले नव्हते. पण विमानात बाँबस्फोट करून त्या सर्व निरपराध प्रवाशांना अतिरेक्यांनी मारले. धर्म म्हणतो, माणसावर प्रेम करा पण धर्माच्या नावाखाली ही माणसे रक्तपात करीत आहेत. कारण मानवता हाच खरा धर्म होय, हे आपण विसरलो आहोत. स्वातंत्र्य व समतेबरोबरच बंधुत्व हेही मूल्य मानवताधर्म जोपासते. आपण सारी ईश्वराची लेकरे आहोत ते सारेच धर्म म्हणतात पण प्रत्यक्षात मात्र इतरांचा खून करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. मानवताधर्मात हिंसेला स्थान नाही. प्रेम व सहिष्णुता हे मानवताधर्माचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
न्याय हे मूल्य मानवताधर्म जोपासतो. सर्वाना समान संधी मिळावी. सर्वांना न्याय मिळावा ही मानवताधर्माची शिकवण आहे. स्त्रियांना पुरुषांहून वेगळे आणि खालचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आले आहेत. हिंदूतील सती जाण्याची प्रथा, मुस्लिमातील पडदा पद्धती ही याचेच प्रतीक आहे. अशा त-हेचे काही अन्याय आज बंद झाले असले तरी अजूनही मुस्लिम स्त्रियांना काही चित्रपट पाहण्याची पाकिस्तानात बंदी आहे. मानवधर्मात हे अन्याय केले जात नाही. पण आम्ही मानवताधर्म विसरल्यामुळे जिकडेतिकडे अन्यायाचेच चित्र दिसत आहे. नाडलेल्या शेतकऱ्याला कर्ज द्यायचे आहे त्याचे व्याज वाढवून वाढवून शेवटी त्याची जमीन घशाखाली घालायची ही सावकारांची रीतच आहे महात्मा फुलेंपासून तो इंदिरा गांधीपर्यंत अनेक सुधारकांनी शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला पण आजही सावकार गरीबांना लुटतोच आहे. पूर्वी मालगुजार, जमीनदार हे लोक तर गरीबांना निव्वळ जनावराप्रमाणे वागवायचे वेठबिगारी ही त्यातलीच पद्धत आहे.
तेलात भेसळ, तूपात भेसळ, हळद आणि मिरचीत देखील भेसळ यामुळे माणसाचे आरोग्यच बिघडते, पण व्यापारी लोक एवढ्यावरच थांबत नाहीत. बनावट औषधे तयार करून मूळ औषधाऐवजी विकतात. कितीतरी माणसांचे आणि बालकांचे त्यांनी प्राण घेतले आहेत. राष्ट्राला कंगाल करणारे आणि नव्या पिढीला करपून टाकणारे हे तस्कर पाहून वाटते, माणसा माणसा कधी होशील माणूस?
काळाबाजार करणारे तर ठिकठिकाणी आहेत. आजवर व्यापारी लोक काळाबाजार करत पण आता शिक्षकासारख्या पवित्र पेशातही काळा बाजार आला आहे.
देवता म्हणून जिची पूजा करावी त्या स्त्रीवर होणारे बलात्कार अजून थांबलेले नाहीत जिला आदिशक्तीचे रूप मानले तिची ढोरावासराप्रमाणे भर बाजारात होणारी विक्री अजन थांबली नाही गृहलक्ष्मी म्हणून जिचा आदर करावा तिला हुंड्यापायी छळणे आणि नंतर पेटवून देऊन, जाळून टाकणे हेही अजून संपले नाही सत्य हा मानवताधर्माचा प्राण आहे. आजवर ज्यांनी सत्य सांगितले त्या कुणाला क्रसावर चढवण्यात आले कुणाला लोकांनी विषप्राशन करायला लावले, कुणावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. गवसलेले सत्य बोलायला मानवताधर्मात मात्र बंदी नसते विश्वात्मकता हा मानवताधर्माचा आणखी एक पैलू होय सारीच ईश्वराची लेकरे म्हणन जनाच्या कल्याणासाठी आपले शरीर झिजवावे, सत्यासाठी आपल्या देहाचा उपयोग करावा असे मानवताधर्म सांगतो
पवित्र सुखदुःखाची गाणी, वेदातील साऱ्या मंत्राहून
पवित्र साधा मानवप्राणी, श्रीरामाहून श्रीकृष्णाहून
पवित्र मज पोलादी ठोसा, अन्यायाच्या छातीवरचा
पवित्र मजला आणिक गहिवर, माणुसकीचा, माणुसकीचा
हा मानवांचा खरा धर्म मानवताधर्म होय.

No comments:

Post a Comment