दिनांक२२ मार्च
सुविचार-
सुविचार - • दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वाच्छिल तो ते लाहो, प्राणिजात ।। - संत ज्ञानेश्वर • अंत करणाची सुंदरता विचारातून प्रगट होते ० अंतकरणाची शुध्दी प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम व सतत अभ्यास आवश्यक आहे.
कथाकथन -
ज्ञानी व अज्ञानी - आगगाडीचा प्रवास करीत असताना एका प्राध्याकाला आपल्या शेजारी एक अडाणी शेतकरी बसला असल्याचे आढळून आल स्वत च्या ज्ञानाची घमंड बाळगणारा तो प्राध्यापक थोड्याच वेळात त्या अडाणी शेतकऱ्याची यटटा करून आजूबाजूला बसलेल्या प्रवाशाची करमणूक करू लागला थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला, साहेब, काही झाल तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी, तरी सुध्दा ला गाडीतला वेळ चागला जावा, म्हणून आपण एकमेकाना कोडी घालू या. मी अडाणी व गरीब असल्याने, कोड सोडविण्यात जर मी हरलो तर, मी तुम्हाला फक्त पाचच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात, तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपयेच द्यायचे, आहे कबूल ? हे ऐकून तो प्राध्यापक आनंदला, आणि अवतीभवतीच्या सहप्रवाशावर छाप मारायला ही सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे. असा विचार करून त्या शेतकऱ्याला म्हणाला, 'तुझी कल्पना मला मान्य आहे. पहिल कोड तू मला घाल शेतकऱ्याने विचारल, 'ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय, आणि बसला असताना फक्त एकच पाय असतो, असा पक्षी कोणता या कोड्याच उत्तर देता न आल्यान प्राध्यापक काहीसा ओशाळन म्हणाला, 'बाबा रे मी हरलो, हे घे २५ रूपये, आणि या कोड्याच उत्तर तू मला साग प्राध्यापकान दिलेल्या २५ रूपयापैकी २० रूपये स्वत च्या खिशात टाकन उलेले ५ रूपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला, 'मलासुध्दा या कोड्याच उत्तर देता येत नाही, म्हणून मी हरल्याचे पाच रूपये तुम्हाला देत आहे. एका अडाणी शेतकर्याने हातोहात चकविल्यामुळे फजित पावलेला तो प्राध्यापक झटकन तिथून उठला व दुसऱ्या डब्यात गेला.
सुविचार -
दिनविशेष -
मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना - १९७० पै. हमीदभाई दलवाई या भारतीय मुस्लिम नागरिकाने आणि तळमळीच्या कार्यकर्त्याने आपल्या बाधवाच्या उन्नतीसाठी मुस्लिम सत्यशोधक मडळाची स्थापना करून एका महत्त्वाच्या कार्याचा शुभारंभ केला. पुढील पाच महत्वाच्या गोष्टींच्या पूर्ततेसाठी झटण्याचे कार्य या मंडळाने मनापासून हाती घेतले १) देशात समान नागरी कायदा त्वरेने व्हावा. २) मुस्लिम स्त्रियांना पुरूषासमान हक्क मिळावेत. ३) तोडी तलाक देणे कायद्याने बद व्हावे ४) भारतीय समाजात प्रबोधनाच्या मार्गानेि इहवादाची मूल्ये रूजवली जावीत. ५) उर्दूचा हट्ट सोडून मुस्लिमानी प्रादेशिक भाषेतून शिक्षण घ्यावे या मंडळाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी तलाक पीडित महिलाचे मेळावे घेऊन त्याच्या व्यथा वेदनाना वाचा फोडली अज्ञान, धर्माधता या गोष्टी दूर होऊन समाजाची उन्नती व्हावी या उदात्त हेतूने मंडळाने काम चालू ठेवले.
सामान्यज्ञान
निसर्गाचे प्रत्येक प्राण्याच्या संख्येवर नियंत्रण असते मासाहारी प्राणीसुध्दा भूक लागल्याशिवाय प्राणी मारत नाही. एखाद्या प्राण्याची संख्या वाढणे, कमी होणे किया तो पृथ्वीवरून नष्ट होणे हा निसर्गचक्राचा नियम आहे. जगलात एका प्राण्याचे नियंत्रण दुसरा प्राणी करीत असतो. • मुबईला नेहरू सेंटरतर्फे वरळी येथे एक भव्य वातानुकूलित तारामंडळ उभारण्यात आले आहे. ते जानेवारी १९७७ मध्ये सुरू करण्यात आले. त्याच्या घुमटाचा व्यास सुमारे २३ मीटर आहे व तिथे ५८३ प्रेक्षक बसण्याची सोय केलेली आहे तेथील उपकरणाने कोणत्याही ठिकाण कोणत्याही दिवसाचे, कोणत्याही वेळी नुसत्या डोळ्यांनी दिसणारे आकाश दाखविता येते
No comments:
Post a Comment