Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday, 23 March 2021

संस्कारमोती( सुविचार, बोधकथा, दिनविशेष, सामान्यज्ञान)

 दिनांक १९ मार्च



सुविचार 

सन्मार्गावर चालताना अडचणींवर मात करून निर्भयतेने पुढे जाणे यातच खरा पुरूषार्थ आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजेच तो बंड करून उठेल - डॉ. आंबेडकर. > 

कथाकथन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : 

     भारतभूमीच्या क्षितिजावर अनेक तेजस्वी तारे चमकले. काही तान्यांचे रूपांतर उल्कात होऊन काळाच्या उदरात ते लोप पावले. परंतु एका अलौकिक ताऱ्याने आपले तेज दिवसेन्दिवस वाढवतच नेले. तो तारा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. बाबासाहेबांचे मूळ नाव भीमराव सकपाळ होते. पुढे शाळेतील आंबेडकर गुरूजींमुळे ते बाबासाहेब आंबेडकर झाले. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे गावचे. त्यांचे वडील लष्करात होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू नावाच्या गावी झाला. बाबासाहेबांच्या आईचे नाव भीमाबाई म्हणून त्यांचे पाळण्यातील नाव 'भीम' असे ठेवण्यात आले. भीमाची बुध्दी प्रखर, सतेज, तरतरीत अशी होती. मोडेन पण वाकणार नाही, असा स्वभाव होता. गरीबीमुळे त्यांचे मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण कसेबसे झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजानी त्यांची प्रखर बुध्दिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठविले. तेथे एम.ए.पी.एच्.डी. करून ते इग्लंडला गेले. तेथे ते एम्.एस्सी. झाले व बार अॅट लॉ ही पदवी घेऊन मायदेशी परतले. त्यांना पदोपदी अपमान, अवहेलना सहन कराव्या लागल्या. त्यानंतर ते सयाजीराव महाराजांचे लष्करी कार्यवाह म्हणून काम पाहू लागले. शाह महाराजांच्या मदतीने त्यांनी १९२० साली मूकनायक नावाचे पाक्षिक काढले. 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची एक संस्था स्थापन केली. रायगड जिल्ह्यातील महाड येथे अस्पृश्य परिषद भरली होती. हजारो लोक आले होते तेथील हजारो वर्षांची चाल मोडून २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचे पाणी सर्वांनी प्राशन केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि बाबासाहेब कायदामंत्री झाले. त्यांनी लिहिलेला 'दी अनटचेबल्स' हा इंग्रजी ग्रंथ प्रसिध्द झाला. विचार न पटल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि बौध धर्माच्या विचार - प्रचारात ते गढून गेले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी बौध्दधर्माची दीक्षा घेतली. बहुजनांचे कैवारी व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब ६ डिसेंबर १९५६ रोजी हा महामानव सर्वांना सोडून बुध्दचरणी विलीन झाला.




दिनविशेष -

 चवदार तळे सत्याग्रह -

 १९२७: पाणी म्हणजे जीवन. निसर्गाने पाण्याच्या रूपाने सर्वांसाठी आपली कृपा जणू उधळून दिली आहे. हे पाणी काही वर्षापूर्वी अस्पृश्यांना नाकारले जात होते. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्तद्वार नव्हते. दलितेध्दारक ब्राबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी अभूतपूर्व बंड केले. त्यांनी दलितांच्या प्रचंड समुदायाचे नेतृत्व केले आणि महाडचे चवदार तळे सर्वांसाठी खुले केले. ते स्वत पायऱ्या उतरून खाली गेले. खाली वाकून ओंजळभर पाणी प्यायले आणि अन्य अस्पृश्यांना त्यांनी धाडसाने पाणी घ्यायला प्रवृत्त केले. अस्पृश्योध्दाराच्या चळवळीत या सत्याग्रहाचे फार महत्व आहे. आपणही माणूस आहोत. आपल्या हक्कासाठी आपण झगडले पाहिजे याची नवी जाणीव या घटनेने अस्पृश्यांना झाली.

No comments:

Post a Comment