Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday, 4 July 2026

6 वी मराठी १० सुगंधी दृष्टी - ना. ग. गोरे

 १०


सुगंधी दृष्टी - ना. ग. गोरे




१. प्रश्नोत्तरे

(1)* प्रश्न १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा :


(१) सुगंध पेटीचा एक एक खण जणू उघडत चालला होता, असे लेखकाने कशाला म्हटले आहे? उत्तर : लेखकाने एकदा डब्यात मोगऱ्याचे कलम लावले. त्यावर एक कळी मोहरली. लेखक उत्सुकतेने पाहत होता. मुगाच्या दाण्याएवढी ती कळी हळूहळू टपोर झाली. संध्याकाळी कळीच्या कुंडीतली एक पाकळी बाजूला झाली. थोड्या वेळाने दुसरी पाकळी, मग तिसरी पाकळी येऊ लागली. तेव्हा सुगंध पेटीचा एक एक खण जणू उघडत चालला होता, असे लेखक म्हणतो..


(२) निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभे राहून जगाला दाखवत असतो, असे लेखकाला कावाटते ?


-लांचे सूक्ष्म उत्तर : निशिगंधाची डौलदार फुले हिरव्यागार छडीवर ओळीने लागतात. निशिगंध स्वभावाने लाजाळू नाही. आपला रंग, आपला गंध, आपली पेट तो लपवत नाही. म्हणून निशिगंध आपले वैभव चवड्यावर उभे राहून जगाला दाखवत असतो, असे लेखकाला वाटते.


(३) लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे? उत्तर : गुलाबाचा स्वाब एकदम वेगळा आहे. तो सगळे लाड करून घेतो. गुलाबाला वाटेल ती जागा चालत नाही. पाणी कमी किंवा जास्त झालेले त्याला सोसत नाही. वेळच्या वेळी खत घालावे लागते. गुलाबाच्या झाडाची पूर्ण निगा केली की, प्रसन्नपणे ते असे फुलते की, मनुष्य सगळे कष्ट विसरून जातो. गुलाबाचे आकार, रंग व गंध याला सीमा नसते

४) लेखकाला सकाळी पारिजातकाखालून जाताना पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखे का वाटते?

 उत्तर : पावसाच्या पाण्याचा अंगावर शिडकावा झाला की, पारिजातकाच्या निरिच्छ व रांगड्या झाडाला हिरवे वर्षाय रोमांच फुटतात. बुंध्यापासून शेंड्यापर्यंत त्यावर सुगंधाची झुंबरे लटकतात. साऱ्या भूमीवर या वृक्षाची उदारता खोडाच अंथरलेली असते. म्हणून सकाळी पारिजातकाखालून जाताना लेखकाला पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखे वाटते.


मुक्तोत्तरी प्रश्न



(2)* (१) तुम्हांला कोणकोणती फुले जास्त आवडतात? ती का आवडतात ?

उत्तर : यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुद्दयांचा उपयोग करावा.


(3)* (२) तुमच्या मते, फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे? 

उत्तर : (कायम फुलत राहणे. दुसऱ्यांना सुवासाचे व सौंदर्याचे दान करत राहणे, लोकांसाठी झिजणे. परोपकार करणे.)


(4)* (३) या पाठात गुलाबाला राजेश्री; तर निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे, का ते सांगा.

उत्तर : गुलाबाची मिजास और आहे. त्याचे खूप सोपस्कार पार पाडावे लागतात. त्याच्या स्वाभाविक ऐटीमुळे त्याला 'राजेश्री' म्हटले आहे. निशिगंधाची डौलदार फुले हिरव्यागार छडीवर ओळीने टोकापर्यंत लागलेली असतात. ती छडीवर फुलल्यामुळे निशिगंधाला 'गुलछडी' म्हटले आहे.


भाषाभ्यास व व्याकरण


(5)* प्रश्न १. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :


सुवास = सुगंध


कष्ट = श्रम


बिऱ्हाड = कुटुंब


मोठी= अवाढव्य


(6)* प्रश्न २. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :


निरुपायX उपाय


प्रसन्न X अप्रसन्न


उदार x अनुदार, कंजूष


पांढराशुभ्र x काळेकुट्ट


(7)* प्रश्न ३. पुढील शब्दाला 'दा' प्रत्यय लागून तयार होणारे नवीन शब्द लिहा :


उदा., दहा - दहादा, पाच पाचदा.


(१) एक - एकदा (२) शंभर - शंभरदा (३) हजार - हजारदा.


(8)* प्रश्न ४. डौल - डौलदार यांसारखे 'दार' प्रत्यय लागून तयार होणारे नवीन शब्द लिहा :


उत्तर : (१) ऐटदार (२) डेरेदार (३) रुबाबदार (४) ढंगदार.


(9)* प्रश्न ५. पुढील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा :


१) घसघशीत• _मेहनत केल्यामुळे पवनशेठला धंदयात या वेळी घसघशीत नफा झाला.


(२) रांगडा_संपत पहिलवान शरीराने रांगडा आहे.


(३) उदारता - उदारता हा माणसाचा सद्गुण आहे.


(४) टिपून मारणे - पोलिसांनी दरोडेखोरांना टिपून मारले.• 


(10)प्रश्न ७. पुढील शब्द पाहा :


वास वास्तव्य, वास गंध. -


उच्चार एकच असलेले, पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या, लिहा, त्यांचे अर्थ समजून घ्या.


उत्तर : (१) तीर - बाण, तीर किनारा.


(२) पाणी - जल, पाणी - तेज.


(३) मान आदर, मान शरीराचा अवयव. 

(४) बोट - होडी, बोट- शरीराचा अवयव.


(11)२. लेखन विभाग


(१) पारिजातकाचे फूल तुमच्याशी बोलते आहे, अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्ये लिहा.


मी पारिजातकाचे फूल बोलतेय... ।

उत्तर:

मुलांनो, मी तुमचे आवडते फूल पारिजातक ! मला 'प्राजक्त' असेही म्हणतात. सकाळी सकाळी मी तुमच्या अंगणात फुलते. माझा दरवळ सर्वत्र पसरतो नि तुम्हांला प्रसन्न करतो. माझ्या पाकळ्यांचा रंग पांढराशुभ्र आहे. माझ्या देठाचा रंग केशरी आहे. मला फार काळ फांदीवर राहता येत नाही. मी झाडाच्या पायथ्याशी टपटपतो. आम्ही भावंडे झाडाखाली सडा अंधरतो. ती नक्षी फार सुरेख असते. आम्ही आमच्या गंधाचे व आयुष्याचे दान तुम्हाला दरदिवशी देतो. तुमचे आयुष्य आमच्यासारखे सुगंधित व प्रसन्न राहो, हीच आमची सदिच्छा !


(12)* (३) पुढे चार चित्रे दिलेली आहेत. त्यांचा सहसंबंध लावून तुमच्या शब्दांत कथा तयार करा


उत्तर : एक बदक तलावात एकटेच पोहत होते. पोहता पोहता त्याने आकाशात पाहिले. आकाशात त्याला काही ढंग तरंगताना दिसले. नंतर त्याने पाहिले की, काही पक्षी उंच आकाशात झेपावत आहेत. नंतर त्याच्या लक्षात आले की, एक पतंग आकाशात वाऱ्यावर लहरतो आहे. बदक मनात म्हणाले 'हे सर्वजण किती भाग्यवान ! हे उंच आकाशात विहरू शकतात. मला मात्र असे उंच उडता येत नाही. का बरे !' बदकाने पंख फडफडवले. उडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला उंच झेप घेता येईना. एव्हाना आकाशातले ढग दिसेनासे झाले. पक्षी दूर उडून गेले. पतंग धरतीवर कोसळला. बदकाने विचार केला शकणार नाहीत. आपणच खरे भाग्यवान !! ' 'हे तळेच आपले घर आहे. ढग, पतंग किंवा पक्षी पाण्यात जगू' शकणार नाहीत. आपणच खरे भाग्यवान !! '

No comments:

Post a Comment