Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday, 24 June 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 


सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते ?

 - खान अब्दुल गफार खान

 

सावरकर बंधूंनी नाशिक येथे १९०४ मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली ?

अभिनव भारत


'दिन-ए-इलाही' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ? 

- अकबर


 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळविण्यासाठी कोणी सत्याग्रह केले होते ?

-साने गुरूजी


 कोणास आद्य क्रांतीकारक म्हणून ओळखले जाते ? -वासुदेव बळवंत फडके


 'डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया' ची स्थापना कोणी केली?

- वि.रा.शिंदे 

 

 कोणी 'पीपल्स एज्युकेशन' सोसायटीची स्थापना केली ?

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


गुरू गोविंदसिंग हे शिखांचे कितवे गुरू होते ?

-दहावे


शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणूका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ?

- मोरो त्र्यंबक पिंगळे 


 होमरूल चळवळीशी कोण संबंधित होते ? 

- डॉ. अॅनी बेझंट


'उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा पाया खचला' असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते?

-सविनय कायदेभंग


 छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले ?

-इ .स.१८८४


 कोणत्या वर्षीचा मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो ?

-१९०९


 कोणी इंग्रजाविरुध्द कुका चळवळ उभारली होती?

-गुरू रामसिंग


३० डिसेंबर ......रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली ?

-१९०६


कायमधारा पध्दत कोणी सुरू केली ?

-लॉर्ड कॉर्नवॉलिस


मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?

-दर्पण


 शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक हे कोणी लिहिले?

-महात्मा फुले


कैसर-ए-हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती ?

-पंडिता रमाबाई


 दिनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते?

- मुकुंदराज पाटील


"शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप।' हे कोणी म्हटले आहे?

-संत रामदास

 

No comments:

Post a Comment