Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 24 May 2021

आईची शिकवण

                 आईची शिकवण 



         शाळेत जाताना आई आपल्या लाडक्या मुलाला म्हणाली, "बाळ! तुला मी आज डब्यात दोन लाडू देत आहे. एक तू खा व दुसरा तुझ्या गरीब मित्राला दे.' “ठीक आहे !" असे म्हणून,तो मुलगा आईचा निरोप घेऊन शाळेत गेला. मधल्या सुट्टीत त्याने मोठा व थोडा जास्त ताजा वाटणारा लाडू आपल्या मित्राला दिला आणि स्वतः मात्र, छोटा खाल्ला. घरी आल्यावर आईने विचारले, “माधव, तुझ्या मित्राला तू कोणता लाडू दिलास? छोटा की मोठा?” माधव म्हणाला, “आई, तूच मला एक दिवस शिकवले होतेस की, चांगली गोष्ट नेहमी दुसन्याला द्यावी. त्याप्रमाणे मोठा व चांगला लाडू मित्राला दिला, छोटा मी खाल्ला.' आईला आपल्या मुलाची नकळत परीक्षा घ्यावयाची होती. त्याचा स्वभाव पाहावयाचा होता. तिच्या परीक्षेला तो उतरला. ती म्हणाली, 'शाब्बास ! दुसन्याला जास्त देण्यात व स्वतःला कमी घेण्यात आनंद असतो, हा आनंद काही वेगळाच असतो." "आई! आज मी त्या आनंदाचा अनुभव घेतला!" मुलाच्या त्या बोलण्याने आईची मनोमन खात्री झाली की, पुढील आयुष्यात हा कोणी तरी महान बनेल. खरोखरच त्या मुलाने मोठेपण नाव कमावले व तो प्रख्यात न्यायाधीश व समाजसुधारक झाला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या लहानपणीची ही वरील गोष आहे. आपले आपण खाणे ही प्रकृती आहे. दुसऱ्याचे ओढून खाण ही विकृती आहे, तर स्वतः भुकेलेले असतानाही आपले दुसऱ्या देणे ही संस्कृती आहे.

1 comment: