Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday, 7 March 2021

ग्लोबल वॉर्मिंग : चिंता व चिंतन

      ग्लोबल वॉर्मिंग : चिंता व चिंतन 

माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, एकीकडे एकविसाव्या शतकामध्ये जग प्रचंड वेगाने प्रगती करत आहे, तर दुसरीकडे या प्रगतीच्या वेगातूनच निर्माण झालेल्या एका समस्येने संपूर्ण जगावर भीतीचे सावट निर्माण केले आहे. ही समस्या म्हणजे 'ग्लोबल वॉर्मिंग' होय. खरं तर ग्लोबल वॉर्मिंग हा चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे. 

सूर्यापासून निघालेली किरणे वातावरणातून पृथ्वीवर येत असताना त्यातील घातक अतिनील किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यानंतर सूर्यकिरणे पृथ्वीवर येत असतात. पृथ्वीवर आलेल्या या उष्णतेपैकी बरीचशी उष्णता जमीन खेचून घेते. काही उष्णता वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी वापरतात व इतर राहिलेली उष्णता वातावरणातून पुन्हा अवकाशात फेकली जाते. पण कार्बन डायऑक्साईडसारखे वायू पुन्हा फेकलेल्या किरणांतील उष्णता धरून ठेवतात, परिणामी वातावरणातील तापमानात वाढ होत राहते.

 सध्या वाढत्या प्रदूषणामुळे ओझोनचा थर विरळ होत आहे. त्यामुळे अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे पुन्हा अवकाशात फेकणारी उष्णता धरून ठेवली जात आहे. कोळसा, जंगलतोड, कारखाने व वाहनांतील धूर म्हणजेच वोते प्रदूषण यांसारख्या अनेक घटकांचा परिणाम म्हणून जागतिक तापमान आज वाढतच चालले आहे.

वाढत्या तापमानाचे अनेक अनिष्ट परिणाम मानवजातीच्या समोर आव्हान । म्हणून उभे राहत आहेत. बर्फ वितळू लागल्याने समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. समुद्राकाठची वस्ती व शेतजमीन पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऋतुमानात बदल होऊन पर्जन्याच्या प्रमाण वितरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे शेतजमिनीतून होणारे उत्पन्न घटत आहे. 'फियान'सारखी प्रचंड वादळे निर्माण होत आहे

No comments:

Post a Comment