Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 6 March 2021

बोधकथा- दृष्टाला कधीही आश्रय देऊ नये.

         दृष्टाल कधीही आश्रय देऊ नये



 : एकदा बोधिसत्व काशीराष्ट्रात एका खेडेगावात जन्मला होता. अध्ययन पूर्ण झाल्यावर त्याने विवाह केला. त्याला एक मुलगा झाला. पण थोड्याच दिवसांनी त्याची बायको मरण पावली. बोधिसत्वाला काही करमेना, मुलगा चालू बोलू लागल्यावर बोधिसत्व त्याला घेऊन हिमालयात जाऊन राहिला तेथे त्यानं एक सुंदर पर्णकुटी बांधली. तेथे अग्निहोत्राची उपासना करून तो कालक्रमणा करू लागला.

 एक दिवस हिमालयावर गारांचा खूप पाऊस पडला. त्यामुळे एक वानर थंडीने गारठून गेला. तो कोठेतरी विस्तव सापडतों काय याचा शोध घेऊ लागला. फिरता फिरता तो बोधिसत्वाच्या पर्णकुटीसमोर आला. पर्णकुटीत होमकुंड पेटलेलं पाहून त्याला आनंद झाला. पण दारातच बोधिसत्वाचा मुलगा बसलेला होता. त्यामुळे होमकुंडाजवळ जायला तो घाबरला. मग त्यानं एक युक्ती केली. तिथून जवळच असणाऱ्या पूर्णकुटीत एक तपस्वी राहात होता. तो काही दिवसांपूर्वीच मरण पावला होता. त्यामुळे त्याची वर्कलं, कमंडलू वगैरे वस्तू तिथेच पडून होत्या. माकडान ती वर्कल अगावर घातली. हातात कमंडलू घेतला नि बोधिसत्वाच्या पर्णकुटीत दारात येऊन उभा राहिला. त्याला पाहून बोधिसत्वाचा मुलगा धावत जाऊन म्हणाला, बाबा, अहो एक बुटके तपस्वी आपल्या दारात आले आहेत. चला, आपण आदरसत्कार करून त्याना आश्रमात घेऊन येऊ. नाहीतरी तुम्ही फळ आणण्यासाठी अरण्यात गेलात की मी इथे एकटाच असतो. मलाही त्यांची सोबत होईल नि आम्ही दोघेही बरोबर अध्ययन करू, 

         बोधीसत्व बाहेर येऊन पहातो तो तपस्व्याचा वेष घेतलेला एक माकड ऐटीत उभा असलेला दिसला. तो मुलाला म्हणाला, 'बाळा, हाच तो तापस का? मुलगा म्हणाला, 'होय बाबा, हाच तो तापसकुमार याची नि माझी ओळख झाली तर मला फार आनंद होईल. बोधिसत्व म्हणाला, 'बाबा रे, घाई करू नकोस, हा तापसकुमार नसून तापसाचा वेष घातलेला दृष्ट माकड आहे. ज्ञानी माणसाच तोंड याच्यासारखं विचित्र कधीच नसत. याला जर आपण आश्रमात घेतला तर हा सर्व आश्रमाची नासधूस करील. त्याला घालवून देणचं चांगल !' बोधिसत्वाने होमकुंडातल एक जळक कोलीत घेऊन त्या माकडावर फेकलं. तेव्हा मात्र माकड घाबरलं, वल्कलं नि कमंडलू तिथेच टाकून पळून गेलं.

No comments:

Post a Comment